नवी दिल्ली : हुंडाई कंपनीनं त्यांची नवीन सॅन्ट्रो कार लॉन्च केली आहे. या नव्या गाडीची लांबी आणि रुंदीही जुन्या गाडीपेक्षा जास्त आहे. गाडीमध्ये १७.६४ सेंटीमीटरचं टचस्क्रीन इंफोटेनमेंट सिस्टीम देण्यात आली आहे.


द ऑल न्यू सॅन्ट्रो


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कंपनीनं या नव्या गाडीला द ऑल न्यू सॅन्ट्रो असं नाव दिलं आहे. दिल्लीमध्ये झालेल्या एका कार्यक्रमात कंपनीनं ही गाडी लॉन्च केली. पहिल्यांदा हुंडाई सॅन्ट्रो २४ सप्टेंबर १९९८ लॉन्च झाली होती. पॉवर स्टियरींगचा वापर करण्यात आलेली सॅन्ट्रो ही त्यावेळची पहिली गाडी होती.


लॉन्चिंग आधीच २३,५०० सॅन्ट्रो बूक


लॉन्चिंग आधीच २३,५०० नव्या सॅन्ट्रोचं बूकिंग झालं होतं. या गाडीमध्ये अनेक फर्स्ट फिचर्सचा वापर करण्यात आला आहे. सॅन्ट्रोला १.१ लीटर पेट्रोल इंजिन देण्यात आलंय. यामध्ये सीएनजीचा पर्यायही उपलब्ध आहे. नवीन सॅन्ट्रोमध्ये ऑटोमेटिकचा पर्यायही आहे.


१७.६४ सेंटीमीटरचं टचस्क्रीन इंफोटेनमेंट सिस्टीम


नवीन सॅन्ट्रोला कंपनीनं नव्या प्लॅटफॉर्मवर तयार करण्यात आलं आहे. या गाडीची लांबी आणि रुंदीही वाढवण्यात आली आहे. गाडीला १७.६४ सेंटीमीटरचं टचस्क्रीन इंफोटेनमेंट सिस्टीम देण्यात आली आहे. नवीन सॅन्ट्रोला रियर एसी वेंटही आहे.


सगळ्या वेरिएंटमध्ये एबीएस आणि ड्रायव्हर एअर बॅग


या गाडीच्या सगळ्या वेरिएंटमध्ये एबीएस आणि ड्रायव्हर एअर बॅग देण्यात आली आहे. गाडीसोबत ३ वर्षांचा रोड असिस्टंट आणि ३ वर्षांची वॉरंटी आहे. १.१ लीटरच्या पेट्रोल इंजिनवर ५,५०० आरपीएमवर ६९ पीएस पॉवर आहे. तर सीएनजी इंजिनची पॉवर ५९ पीएस आहे.


बेस वेरिएंटची किंमत ३,८९,९०० रुपये


५ स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशन आणि एएमटी व्हर्जनला २०.३ किमी प्रती लीटरचं मायलेज आहे. तर सीएनजी वेरिएंट ३०.४८ किमी प्रती किलोग्राम मायलेज देईल, असा दावा कंपनीनं केला आहे. गाडीला ५ वेरिएंट डिलाईट, ERA, मेग्ना स्पोर्ट्स आणि ASTA वेरिएंटमध्ये लॉन्च करण्यात आलं आहे. गाडीच्या बेस वेरिएंटची किंमत ३,८९,९०० रुपये आहे. तर टॉप वेरिएंट ५,४५,९०० रुपयांना आहे.


नवी सॅन्ट्रो ७ रंगांमध्ये


नवीन सॅन्ट्रोचं लॉन्चिंग बॉलीवूड अभिनेता शाहरुख खानच्या उपस्थितीमध्ये करण्यात आलं. यावेळी त्यानं सॅन्ट्रोबद्दलच्या त्याच्या आठवणी सांगितल्या. या गाडीला ७ आकर्षक रंगांमध्ये लॉन्च करण्यात आलं.


या गाड्यांशी टक्कर


हॅचबॅक सेगमेंटमध्ये सॅन्ट्रो ही पहिली गाडी आहे ज्याला टचस्क्रीन इंफोटेनमेंट सिस्टीम देण्यात आली आहे. ही नवी सॅन्ट्रो हुंडाईच्या दुसऱ्या गाड्या इऑन आणि ग्रांड आय १०सोबत जागा बनवेल. या गाडीची टक्कर मारुतीची सलेरियो, वॅगनआर, रिनॉल्ट क्विड, टाटा टियागो आणि डटसन गो शी असेल.