Toyota Innova Hycross vs Mahindra XEV 9S: भारतातील कारप्रेमींच्या आवडीच्या अशा Mahindra कंपनीकडून 27 नोव्हेंबरला 7 सीटर सेगमेंटमध्ये एक प्रिमियम कार लाँच करण्यात आली. पुरेसा केबिनस्पेस ही या कारची जमेची बाजू ठरत आहे. अशा या श्रेणीत ही पहिलीच कार नसून, महिंद्राच्या या मॉडेलला टक्कर देणारी कार म्हणजे टोयोटा इनोवा हायक्रॉस.
नव्या हायब्रिड पॉवरट्रेन आणि कम्फर्ट फिचरसह ही कार लाँच झाली असून, एकिकडे टोयोटाची कार आणि दुसरीकडे महिंद्राची नवी कार पाहता या दोन्ही कारमध्ये चांगलीच स्पर्धा पाहता येत आहे. तुलना केल्यास या दोन्ही कारपैकी कोणती कार ठरतेय उत्तम? पाहा...
टोयोटा इनोवा हायक्रॉसची लांची 4755 मीमी असून, महिंद्राच्या XEV 9S ची लांबी आहे 4737 मीमी. हायक्रॉसमध्ये एकूण 2850 मीमी इतका व्हिलबेस मिळतो. तर, XEV 9S चा व्हीलबेस आहे 2762मीमी. महिंद्राच्या कारला ग्राऊंड क्लिअरन्स कुलनेनं जास्त असून तो साधारण 205 मीमी इतका आहे.
कारच्या मायलेजची तुलना करायचं झाल्यास टोयोटा इनोवा हायक्रॉस कार 23-24 kmpl इतकं मायलेज देण्याचा दावा करते. तर, XEV 9S कार सिंगल चार्जमध्ये 500 किमी इतकी रेंज देते. कंपनीच्या दाव्यानुसार ही कार प्रतिकिमी 1.5 रुपये इतक्याच खर्चाव चालते. पेट्रोलच्या तुलनेत हा आकडा अगदी लहान असल्यानं इथं इंधन आणि पैशांचीसुद्धा बचत होते हे लक्षात येतंय.
| महिंद्रा XEV 9S | Toyota Innova Hycross |
| पॅनोरामिक सनरुफ | कॅप्टन सीट |
| 360 डिग्री कॅमेरा | ADAS |
| पॉवर्ड सीट | पॅनोरामिक सनरुफ |
| रिअर सीट वेंटिलेशन | सीट वेंटिलेशन |
| 5G Apps डिजिटल फिचर | 360 डिग्री कॅमेरा |
टोयोया इनोवाच्या हायक्रॉस मॉडेलची किंमत आहे 18.8 लाख रुपये. बेस मॉडेलसाठी ही किंमत असून टॉप मॉडेल 30.8 लाख रुपयांना उपलब्ध आहे. तर, महिंद्राची XEV 9S ही कार बेस मॉडेलसह 19.9 लाख रुपयांना उपलब्ध असून, कारचं टॉप मॉडेल 29.45 लाखांना उपलब्ध आहे. महिंद्राच्या कारची किंमत टोयोटाहून काहीशी कमी आणि त्यात अधिक फिचर्ससुद्धा उपलब्ध आहेत. त्यामुळं तुमच्यासाठी कोणती कार योग्य हे ठरवा आणि तसंच मॉडेल खरेदी करा... !!!
सायली पाटील या 'झी 24 तास डिजीटल'मध्ये सिनियर सब एडिटर पदावर कार्यरत असून, त्यांना पत्रकारिता क्षेत्रातील 11 वर्षांचा अनुभव आहे. त्यांनी 'लोकमत', 'लोकसत्ता' या वृत्तपत्रांसाठी काम केलं. 'लोकसत्ता'मधील 'VIVA' या जीवनशैली विषयावर आधारित पुरवणीसाठी त्यांनी लिखाण केलं पुढे त्यांनी लोकसत्ता डिजीटलसाठी काम केलं. त्यांनी 'एबीपी माझा' च्या डिजीटल टीमसोबत कामाचा अनुभव घेत 2021 मध्ये पुन्हा एकदा 'झी 24 तास डिजीटल'मध्ये रुजू होत विविध विषयांवरील बातम्यांमध्ये योगदान दिलं. मनोरंजन आणि Lifestyle विषयांतील सुरुवातीचा अनुभव आणि त्यानंतर राजकारण, आरोग्य, प्रवास, राज्यस्तरीय बातम्यांमध्येही त्यांचा हातखंड आहे. सिनेमांचं समीक्षण, राष्ट्रीय स्तरावरील वृत्त, जागतिक स्तरावरील घडामोडी, हवामान वृत्त आणि खगोलशास्त्राश, पुरातत्त्वं विभागाच्या संशोधनासंदर्भातील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रुची आहे. भटकंती, सिनेमा, विज्ञान, खाद्यसंस्कृती हे त्यांच्या विशेष आवडीचे विषय आहेत.
...Read MoreBy accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.