7 लाखांहून कमी बजेटमध्ये 7 सीटर कार; जिच्यासोबत घेऊन फिरु शकता घर-संसार...

Auto News : दूरचा प्रवास असो किंवा जवळचा... या कारमधून जाण्याचा प्रत्येक अनुभव असेल कमाल. सहलींसाठी तर ही कार म्हणजे एक उत्तम पर्याय.   

सायली पाटील | Updated: Jul 3, 2025, 12:20 PM IST
7 लाखांहून कमी बजेटमध्ये 7 सीटर कार; जिच्यासोबत घेऊन फिरु शकता घर-संसार...
Auto news Maruti Eeco Sales 9340 Unit in June 2025 know features and price

Auto News : कार (Car Purchase) खरेदी म्हटलं की, त्या कारनं सर्वप्रथम कुठं जायचं इथपासून छोटेखानी सहली असो किंवा दूरवरचा प्रवास असो. नेमकं कुठेकुठे भटकायचं याचीच अधिक चर्चा होते. अशा सर्व चर्चांना अनेकदा फिल्मी संदर्भ मिळतात आणि मग चित्रपटांमध्ये दाखवल्या जाणाऱ्या सहली, त्यासाठीची तयारी असं एकंदर चित्रच डोळ्यांपुढे उभं राहतं. 

सहलीसाठीची तयारी म्हटलं की, कारनं जाताना सोबत नेमकं कायकाय न्यायचं इथपासून कारमध्ये कोण कुठं बसणार याबातची मतंही मांडली जातात. भारतीयांचा हाच स्वभाव, फिरण्यासाठीचं त्यांचं प्रेम आणि कुटुंबाप्रती असणारा प्राधान्यक्रम पाहता मारुती सुझुकीची एक कार या सर्वच अपेक्षा अगदी खिशाला परवडणाऱ्या खर्चात पूर्ण करते असं म्हणायला हरकत नाही. 

मारुती सुझुकीची 'मॅजिक कार' (Maruti Suzuki Eeco)

मारुती सुझुकीची अशीच एक कार म्हणजे ईको. इतक्या वर्षांनंतरही आणि बाजारात अनेक कारची उपलब्धता असतानाही बजेट कारच्या यादीत इकोची लोकप्रियता कमी झालेली नाही. एकट्या जून महिन्यात या 9340 ग्राहकांनी ही कार खरेदी केली. कंपनीच्या अनेक बेस्ट सेलर मॉडेलपैकी ही एक कार. 5, 6 आणि 7 सीटर व्हेरिएंटमध्ये ही युटीलिटी कार खरेदी करून गरजेनुसार वापरता येते. 

ईकोच्या बेस व्हेरिएंटची किंमत 5.70 लाख रुपये इतकी असून, मारुती ईकोमध्ये K सीरिजचं 1.2 लीटर पेट्रोल इंजिन मिळतं. ज्यातून 80.76 Ps पॉवर आणि 104.5 Nm पीक टॉर्क जनरेट होतं. टूर व्हेरिएंट आणि प्रसेंजर ट्रीममध्ये कारचा परफॉर्मन्स बदलतो. या कारमध्ये एकूण 11 सेफ्टी फिचर्स असून, येत्या काळात त्यात आणखी काही फिचर्ससुद्धा जोडले जाणार असल्याचं म्हटलं जात आहे. 

हेसुद्धा वाचा : सूर्यमालेत Interstellar Object ची घुसखोरी; महाकाय वस्तूमुळं वाढली धाकधूक

 

ईकोमध्ये रिवर्स पार्किंग सेंन्सर, इंजिन इमोबिलायजर, चाईल्ड लॉक, सीट बेल़्ट रिमाइंडर, इबीडी आणि एबीएस, 6 एअरबॅगचा समावेठश आहे. नुकतंच या कारमध्ये नवं स्टीअरिंग व्हील आणि एक नवं इंन्स्ट्रूमेंट क्लस्टरही देण्यात आलं आहे. जुन्या स्लायडिंग एसी कंट्रोलला कंपनीनं बदलून कारमध्ये नवं रोटरी युनिटही दिल्यानं ते अनेकांच्याच पसंतीस उतरत आहे.