Auto News : काही कार कंपन्यांचं नावच त्यांच्या विश्वासार्हतेचं प्रमाण असतं. अशाच कार कंपन्यांच्या यादीत येणारं एक नाव म्हणजे मारुति सुझुकी (Maruti Suzuki ). नुकतीच या कंपनीकडून एक एसयुव्ही लाँच करण्यात आली. विक्टोरिअस (Victoris ) असं या नव्या मॉडेलचं नाव असून कारप्रेमींना या कारनं भलतंच वेड लावलं आहे. कारण लाँच होताच या कारला 30000 हून अधिक कारची बुकिंग मिळाली आहे. यामध्ये सर्वाधिक अर्थात 50 टक्क्यांहून अधिक कार या पेट्रोल वर्जनच्या आहेत.
Maruti Arena नेटवर्कअंतर्गत कंपनीची ही एसयुव्ही लाँच करण्यात आली असून, ही कार ग्रँड विटाराचं अपग्रेडेट वर्जन म्हणून सादर करण्यात आलं आहे. यामध्ये काही असे फिचर आहेत जे कारला प्रिमियम आणि टेक फ्रेंडली ठरवतात. Victoris ही Maruti Suzuki ची एक अशी एसयुव्ही आहे ज्यामध्ये Level 2 ADAS (Advanced Driver Assistance System) देण्यात आलं असून, या तंत्रज्ञानाअंतर्गत ही कार आपोआपच ब्रेक, लेन असिस्ट, ट्रॅफिक अलर्ट अशा सुविधांसह स्मार्ट ड्रायव्हिंगची मुभा देते. कंपनीच्या दाव्यानुसार ही कार एक 'फ्यूचर रेडी SUV' असून त्यामध्ये सुरक्षा, आरामदायी प्रवास आणि तंत्रज्ञान यांचा मेळ साधण्यात आला आहे.
कंपनीच्या माहितीनुसार आतापर्यंत या कारला 30000 बुकिंग मिळाले असून, जवळपास 53 टक्के बुकिंग पेट्रोल आणि हायब्रिड वर्जनसाठी मिळालं आहे. तर, 11000 बुकिंग सीएनजी वेरिएंटला मिळाली आहे. थोडक्यात सध्या सर्वाधिक पसंती ही पेट्रोल वर्जनला मिळत आहे. ADAS फीचर असणारी ही कार स्मार्ट आणि सुरक्षित ड्रायव्हिंगचा अनुभव देणाऱ्या ग्राहकांसाठी एक उत्तम पर्याय आहे.
Maruti Victoris मध्ये कंपनीनं तीन पॉवरट्रेन पर्याय दिले असून, 1.5 लीटर माइल्ड-हाइब्रिड पेट्रोल इंजिन,1.5-लीटर स्ट्रॉन्ग-हाइब्रिड पेट्रोल इंजिन, 1.5-लीटर पेट्रोल + CNG (अंडरबॉडी टँक) देण्यात आलं आहे. तिन्ही इंजिन बेस प्लॅटफॉर्मवर विविध गरजांना अनुसरून ट्यून करण्यात आलं आहे. या कारला ह्युंडई क्रेटा, किआ सेल्टोस, टोयोटा हायरायडर, स्कोडा कुशाक अशा कारची टक्कर आहे. मारुतिची ही दमदार कार 12.49 लाख रुपये (बेस मॉडेल) आणि ₹23.64 रुपये (टॉप मॉडेल) इतक्या किमतीला विक्रीसाठी उपलब्ध असल्याचं म्हटलं जात आहे.
मारुति सुझुकी विक्टोरिस एसयुव्ही म्हणजे काय आणि ती कधी लाँच झाली?
मारुति सुझुकी विक्टोरिस ही कंपनीची नवीन मिड-साइज एसयुव्ही आहे, जी ग्रँड विटाराच्या आकारमानात पूरक मॉडेल म्हणून सादर करण्यात आली आहे. ती मारुति अरेना नेटवर्क अंतर्गत उपलब्ध आहे
विक्टोरिस एसयुव्हीला किती बुकिंग मिळाल्या आहेत आणि कोणत्या व्हेरिएंटला सर्वाधिक पसंती?
लाँच झाल्यापासून विक्टोरिसला 30000 हून अधिक बुकिंग मिळाल्या आहेत. यापैकी 50 टक्क्यांहून अधिक (सुमारे 53%) बुकिंग पेट्रोल आणि हायब्रिड व्हेरिएंटसाठी आहेत, तर 11000 बुकिंग सीएनजी व्हेरिएंटसाठी मिळाल्या आहेत.
विक्टोरिसमध्ये कोणती प्रमुख फिचर्स आहेत?
विक्टोरिसमध्ये लेव्हल 2 एडीएएस (अॅडव्हान्स्ड ड्रायव्हर असिस्टन्स सिस्टम) आहे, ज्यात ऑटोमॅटिक ब्रेकिंग, लेन असिस्ट, ट्रॅफिक अलर्ट यांसारख्या सुविधा आहेत. ती प्रिमियम आणि टेक-फ्रेंडली आहे, ज्यात सुरक्षा, आराम आणि तंत्रज्ञानाचा मेळ आहे.
सायली पाटील या 'झी 24 तास डिजीटल'मध्ये सिनियर सब एडिटर पदावर कार्यरत असून, त्यांना पत्रकारिता क्षेत्रातील 11 वर्षांचा अनुभव आहे. त्यांनी 'लोकमत', 'लोकसत्ता' या वृत्तपत्रांसाठी काम केलं. 'लोकसत्ता'मधील 'VIVA' या जीवनशैली विषयावर आधारित पुरवणीसाठी त्यांनी लिखाण केलं पुढे त्यांनी लोकसत्ता डिजीटलसाठी काम केलं. त्यांनी 'एबीपी माझा' च्या डिजीटल टीमसोबत कामाचा अनुभव घेत 2021 मध्ये पुन्हा एकदा 'झी 24 तास डिजीटल'मध्ये रुजू होत विविध विषयांवरील बातम्यांमध्ये योगदान दिलं. मनोरंजन आणि Lifestyle विषयांतील सुरुवातीचा अनुभव आणि त्यानंतर राजकारण, आरोग्य, प्रवास, राज्यस्तरीय बातम्यांमध्येही त्यांचा हातखंड आहे. सिनेमांचं समीक्षण, राष्ट्रीय स्तरावरील वृत्त, जागतिक स्तरावरील घडामोडी, हवामान वृत्त आणि खगोलशास्त्राश, पुरातत्त्वं विभागाच्या संशोधनासंदर्भातील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रुची आहे. भटकंती, सिनेमा, विज्ञान, खाद्यसंस्कृती हे त्यांच्या विशेष आवडीचे विषय आहेत.
...Read MoreBy accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.