Auto News: भारतातील रस्ते आणि भारतीयांची वाहन चालवण्याची एकंदर शैली पाहता अनेकांची कायमस्वरुपी पसंती मिळवणारा एक बाईक ब्रँड ठरला तो म्हणजे, (Royal Enfield) रॉयल एनफिल्ड. पण, याच ब्रँडला टक्कर देणारा आणखी एक ब्रँड मागील काही वर्षांमध्ये भारतीय तरुणाई आणि बाईक प्रेमींमध्ये चांगलाच लोकप्रिय ठरताना दिसत आहे.
लूकपासून ते अगदी किंमत आणि फिचर्सपर्यंत हा ब्रँड काही अंशी एनफिल्डच्या जवळपास असल्यानं किमतीच्या शर्यतीत मात्र एनफिल्डवरही मात करताना दिसत आहे. हा ब्रँड म्हणजे ट्रायम्फ मोटरसायकल इंडिया. ट्रायम्फनं नुकतंच बहुप्रतिक्षित अशा Scrambler 400 XC बाईकला भारतात लाँच केलं असून त्याची सुरुवातीचीच किंमत 2.94 लाख इतकी निश्चित केली आहे. Scrambler 400 X पेक्षा ही किंमत 27000 रुपयांनी जास्त आहे.
असं असलं तरीही या जास्तीच्या रकमेत कंपनीनं ट्यूबलेस स्पोक व्हील्स आणि काही अद्ययावत तंत्र असणारी उपकरणंही बाईकशी जोडली आहेत, ज्यामुळं बाईकचं हे मॉड्युल खास ठरत आहे. कंपनीकडून इंडिविज्युअल स्पोक व्हील्सचाही खुलासा करण्यात आला असून ते एनफिल्डच्या तुलनेत खिशाला परवडणाऱ्या दरात उपलब्ध आहेत असं म्हटलं जात आहे.
बाईकिंग क्षेत्रातील जाणकार आणि अनुभवी व्यक्तींच्या मते Triumph Scrambler 400 XC ही बाईक तिच्या किमतीच्या तुलनेत व्हॅल्यू फॉर मनी असून तिची चाकं हीच बाईकची जमेची बाजू ठरत आहेत. याशिवाय रग्ड डिझाईन, लो मेंटनन्स खर्च, कमाल बिल्ड क्वालिटी आणि सुरक्षेसाठी देण्यात आलेल्या अद्ययावत साधनांमुळं ही बाईक पैसा वसूल ठरेल यात शंका नाही.
सायली पाटील या 'झी 24 तास डिजीटल'मध्ये सिनियर सब एडिटर पदावर कार्यरत असून, त्यांना पत्रकारिता क्षेत्रातील 11 वर्षांचा अनुभव आहे. त्यांनी 'लोकमत', 'लोकसत्ता' या वृत्तपत्रांसाठी काम केलं. 'लोकसत्ता'मधील 'VIVA' या जीवनशैली विषयावर आधारित पुरवणीसाठी त्यांनी लिखाण केलं पुढे त्यांनी लोकसत्ता डिजीटलसाठी काम केलं. त्यांनी 'एबीपी माझा' च्या डिजीटल टीमसोबत कामाचा अनुभव घेत 2021 मध्ये पुन्हा एकदा 'झी 24 तास डिजीटल'मध्ये रुजू होत विविध विषयांवरील बातम्यांमध्ये योगदान दिलं. मनोरंजन आणि Lifestyle विषयांतील सुरुवातीचा अनुभव आणि त्यानंतर राजकारण, आरोग्य, प्रवास, राज्यस्तरीय बातम्यांमध्येही त्यांचा हातखंड आहे. सिनेमांचं समीक्षण, राष्ट्रीय स्तरावरील वृत्त, जागतिक स्तरावरील घडामोडी, हवामान वृत्त आणि खगोलशास्त्राश, पुरातत्त्वं विभागाच्या संशोधनासंदर्भातील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रुची आहे. भटकंती, सिनेमा, विज्ञान, खाद्यसंस्कृती हे त्यांच्या विशेष आवडीचे विषय आहेत.
...Read More|
RCB
(20 ov) 250/3
|
VS |
CSK
207(19.4 ov)
|
| Royal Challengers Bengaluru beat Chennai Super Kings by 43 runs | ||
| Full Scorecard → | ||
|
SRH
(20 ov) 156/9
|
VS |
LSG
160/5(19.5 ov)
|
| Lucknow Super Giants beat Sunrisers Hyderabad by 5 wickets | ||
| Full Scorecard → | ||
|
RR
(20 ov) 210/6
|
VS |
GT
204/8(20 ov)
|
| Rajasthan Royals beat Gujarat Titans by 6 runs | ||
| Full Scorecard → | ||
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.