Auto News : कार खरेदी... कोणासाठी हा लक्झरी किंवा जीवनशैलीचा एक भाग असतो, तर कोणासाठी ही गरज असते. कुटुंबाला सामावून घेणारी, चांगलं इंजिन असणारी आणि समाधानकारक मायलेज देणारी कार हवी, अशीच अनेकांची इच्छा असते. तर, काही मंडळी फक्त आपल्याकडे अमुक एक कार हवी, इतक्याच एका इच्छेतून कार खरेदी करतात. आता या दोन्ही निकषांना पूर्ण करत मायलेचमध्ये तर षटकार मारणारी एक कार थेट टाटा मोटर्सला तगडं आव्हान देणार आहे.
TATA मोटर्सच्या 'पंच' (TATA Punch)ला थेट स्पर्धा ठरु पाहणारी कार मायक्रो एसयुव्ही श्रेणीत सादर होण्यासाठी सज्ज झाली आहे. मारुती सुझुकीच्या या कारची सध्या चाचणी सुरू असून, याचदरम्यान काही कारप्रेमींनी ही कार हेरली आहे. ही कार म्हणजे फ्राँक्स हायब्रिड (Fronx Hybrid). सध्याची आकडेवारी पाहिल्यास दर महिन्याला फ्राँक्सच्या 20000 युनिट्सची विक्री होते. या कारचे फिचरही तितकेच दमदार.
मारुतीच्या नव्या एसयुव्हीमध्ये तिचं इंजिन हीच जमेची बाजू असेल. ज्यामध्ये कंपनीनं 1.2 लीटर पेट्रोल हायब्रिड इंजिन दिलं आहे. माध्यमांच्या माहितीनुसार ही कंपनी 40 किमी प्रतिलीटर इतकं मायलेज देऊ शकते. असं झाल्यास ही भारतातील सर्वाधिक इंधन बचत करणारी आणि मायलेज देणारी एसयुव्ही ठरेल. मायलेजशिवाय सध्या कंपनीकडून फ्लेक्स फ्यूल आणि सीएनजी व्हेरिएंटवरही काम सुरू आहे.
सुरक्षित प्रवासाच्या बाबतीतसुद्धा ही कंपनी सध्या टाटाला टक्कर देत असून, कंपनीनं त्याच धर्तीवर तयारीसुद्धा सुरू केली आहे. नवी Fronx Hybrid अधिक भक्कम आणि बळकट अशाच रितीनं तयार केली जात आहे. ज्यामुळं सेफ्टी रेटिंगमध्ये या कारला 5 स्टार रेटिंग मिळाल्यात आश्चर्य वाटायला नको,. 6 एअरबॅग, इलेक्ट्रॉनिक स्टेबिलिटी कंट्रोल (ESC), उत्तम क्रॅश प्रोटेक्शन असे फिचर या कारला पंचच्या बाजूलाच आणून उभं करत आहेत.
कारचे अंतरंगसुद्धा प्रभावी ठेवण्यासाठी कंपनी कार्यरत आहे. ज्यामध्ये या नव्या हायब्रिड एसयुव्हीत मोठं टचस्क्रीन इंन्फोटेन्मेंट सिस्टीम, डिजिटल क्लस्टर आणि कनेक्टेड कार टेक्नोलॉजीसुद्धा दिली जाऊ शकते. मारुती सुझुकी या कारला 'टॉल बॉय' स्टांस देत असून, त्याचे चौकोनी व्हील आर्च, फ्लॅट सनरुफ अशी डिझाईन इतर हॅचबॅकहून या कारला वेगळा लूक देते. अशी ही कार यंदाच्या वर्षअखेरीस किंवा पुढच्या वर्षाच्या सुरुवातीपर्यंत भारतात लाँच केली जाऊ शकते.
टाटा पंच ही कार तिच्या उत्तम लूकसाठी ओळखली जाते. 5 स्टार सेफ्टी रेटिंग असल्यामुळं सध्या भारतात या कारला बरीच मंडळी पसंती देत आहेत. त्यामुळं मारुतीच्या फ्राँक्सनं मायलेजची अपेक्षा पूर्ण केल्यास पंचला तडडी टक्कर मिळेल यात वाद नाही. ज्यामुळं आता टाटा मोटर्सकडून याचं उत्तर देण्यासाठी पंचमध्ये नवे बदल केले जातात की एखादं नवं मॉडेलच सादर केलं जातं हे पाहणं औत्सुक्याचं असेल.
सायली पाटील या 'झी 24 तास डिजीटल'मध्ये सिनियर सब एडिटर पदावर कार्यरत असून, त्यांना पत्रकारिता क्षेत्रातील 11 वर्षांचा अनुभव आहे. त्यांनी 'लोकमत', 'लोकसत्ता' या वृत्तपत्रांसाठी काम केलं. 'लोकसत्ता'मधील 'VIVA' या जीवनशैली विषयावर आधारित पुरवणीसाठी त्यांनी लिखाण केलं पुढे त्यांनी लोकसत्ता डिजीटलसाठी काम केलं. त्यांनी 'एबीपी माझा' च्या डिजीटल टीमसोबत कामाचा अनुभव घेत 2021 मध्ये पुन्हा एकदा 'झी 24 तास डिजीटल'मध्ये रुजू होत विविध विषयांवरील बातम्यांमध्ये योगदान दिलं. मनोरंजन आणि Lifestyle विषयांतील सुरुवातीचा अनुभव आणि त्यानंतर राजकारण, आरोग्य, प्रवास, राज्यस्तरीय बातम्यांमध्येही त्यांचा हातखंड आहे. सिनेमांचं समीक्षण, राष्ट्रीय स्तरावरील वृत्त, जागतिक स्तरावरील घडामोडी, हवामान वृत्त आणि खगोलशास्त्राश, पुरातत्त्वं विभागाच्या संशोधनासंदर्भातील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रुची आहे. भटकंती, सिनेमा, विज्ञान, खाद्यसंस्कृती हे त्यांच्या विशेष आवडीचे विषय आहेत.
...Read More
LIVE|
GT
210/4(20 ov)
|
VS |
DC
147/4(15.1 ov)
|
| Full Scorecard → | ||
|
OMA
(20 ov) 163/7
|
VS |
SCO
151/9(20 ov)
|
| Oman beat Scotland by 12 runs | ||
| Full Scorecard → | ||
|
RR
(11 ov) 150/3
|
VS |
MI
123/9(11 ov)
|
| Rajasthan Royals beat Mumbai Indians by 27 runs | ||
| Full Scorecard → | ||
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.