फक्त लाखाभराचं डाऊन पेमेंट; अन् छानशी फॅमिली कार तुमची, EMI चं गणित अगदी सुटसुटीत

Auto News : खिशाला परवडणारी कार खरेदी करण्याच्या विचारात असणाऱ्या अनेकांसाठी अगदी किमान डाऊन पेमेंटमध्ये थेट घरीच आणता येऊ शकते. कर्जाच्या हप्त्याचं नेमकं गणित कसं असेल हेसुद्धा पाहा....   

सायली पाटील | Updated: Feb 25, 2026, 02:43 PM IST
फक्त लाखाभराचं डाऊन पेमेंट; अन् छानशी फॅमिली कार तुमची, EMI चं गणित अगदी सुटसुटीत
(छाया सौजन्य- टाटा मोटर्स)/ auto news Tata Nexon CNG on emi Affordable budget India

Auto News : कार खरेदी करण्याच्या चर्चेमध्ये काही मुद्दे कायमच केंद्रस्थानी असतात. इथं सर्वात महत्त्वाचा मुद्दा असतो तो म्हणजे कारसाठी येणाऱ्या खर्चाचा. मायलेज आणि फिचरसह कारसाठी येणारा खर्च अनेकांसाठी तितकाच महत्त्वाचा ठरतो. अशाच खिशाला परवडणाऱ्या कारच्या शोधात असणाऱ्या आणि चौकोनी कुटुंबासाठी योग्य पर्याय असणाऱ्या कारनं सध्या अनेकांनाच दिलासा दिला आहे. 

Add Zee News as a Preferred Source

हेसुद्धा वाचा : Car Fire Outbreak: 20 रुपयांच्या पाण्याच्या बाटलीमुळं कारमध्ये माजेल आगडोंब; संकट लक्षात घ्या 

परवडणाऱ्या किमतीतील ही SUV दैनंदिन प्रवासासाठी उत्तम असून, तिच्यासाठी काढलेल्या कर्जाचा फार भारही येत नाही, ही कार आहे Tata Nexon CNG. टाटा नेक्सॉनची एक्स शोरुम किंमत 8.23 लाख रुपये इतकी असून, ही कार उत्तम परफॉर्मन्ससाठी ओळखली जाते. दिल्लीमध्ये या कारची ऑन रोड किंमत जाते 9.31 लाख रुपये. या किमतीत आरटीओ आणि इंन्शुरन्सचा समावेश आहे. तर, फक्त 1 लाखांच्या डाऊनपेमेंटवर 8.31 लाखांच्या कर्जासह ही कार थेट घरी आणता येते. 

कसं आहे खर्चाचं गणित?

बँकेनं टाटा नेक्सॉनसाठी 9 टक्के इतक्या व्याजदरानं कर्ज दिल्यास 5 वर्षांसाठीचा मासिक कर्जाचा हप्ता ठरतो 17,585 रुपये. हा आकडा अंतिम नसून तुमच्या भागात कारच्या खर्चाचं Exact calculation जाणून घेण्यासाठी जवळच्या टाटा डीलरशिपशी संपर्क साधणं उपयुक्त ठरेल. 

इंजिन आणि मायलेजचा सुरेख मेळ... 

Tata Nexon CNG मध्ये 1.2 लीटर टर्बोचार्ज्ड पेट्रोल इंजिन देण्यात आलं असून, या कारच्या सीएनजी मोडमध्ये 100 बीएचपी पॉवर आणि 170 एनएम इतका टॉर्क जनरेट होतो. ही भारतातील पहिली अशी एसयुव्ही आहे ज्यामध्ये ट्विन-सिलेंडर टेक्नोलॉजीचा वापर करण्यात आला आहे. नेक्सॉन CNG पेट्रोल मोडमध्ये 17 किमी प्रती लिटर आणि पूर्ण सीएनजी मोडमध्येही तितकंच मायलेज देते. Tata Nexon CNG फुल सीएनजी टँकमध्ये 800 किमीपर्यंतचा प्रवास करण्यास सक्षम असल्याचा दावा कंपनी करते. ज्यामुळं लाँग ड्राईव्ह असो किंवा महामार्गांवरील प्रवास, नेक्सॉन एक समाधानकारक पर्याय आहे असंच पाहायला मिळत आहे. 

About the Author

Sayali Patil

सायली पाटील या 'झी 24 तास डिजीटल'मध्ये सिनियर सब एडिटर पदावर कार्यरत असून, त्यांना पत्रकारिता क्षेत्रातील 11 वर्षांचा अनुभव आहे. त्यांनी 'लोकमत', 'लोकसत्ता' या वृत्तपत्रांसाठी काम केलं. 'लोकसत्ता'मधील 'VIVA' या जीवनशैली विषयावर आधारित पुरवणीसाठी त्यांनी लिखाण केलं पुढे त्यांनी लोकसत्ता डिजीटलसाठी काम केलं. त्यांनी 'एबीपी माझा' च्या डिजीटल टीमसोबत कामाचा अनुभव घेत 2021 मध्ये पुन्हा एकदा 'झी 24 तास डिजीटल'मध्ये रुजू होत विविध विषयांवरील बातम्यांमध्ये योगदान दिलं. मनोरंजन आणि Lifestyle विषयांतील सुरुवातीचा अनुभव आणि त्यानंतर राजकारण, आरोग्य, प्रवास, राज्यस्तरीय बातम्यांमध्येही त्यांचा हातखंड आहे. सिनेमांचं समीक्षण, राष्ट्रीय स्तरावरील वृत्त, जागतिक स्तरावरील घडामोडी, हवामान वृत्त आणि खगोलशास्त्राश, पुरातत्त्वं विभागाच्या संशोधनासंदर्भातील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रुची आहे. भटकंती, सिनेमा, विज्ञान, खाद्यसंस्कृती हे त्यांच्या विशेष आवडीचे विषय आहेत. 

...Read More