Tata vs Mahindra SUV: भारतात सध्या कार खरेदी करताना एसयुव्ही मॉडेलनाच कारप्रेमींकडून पसंती मिळते. त्यातही काही कंपन्यांच्या कार प्राधान्यस्थानी हमखास असतात. अशाच श्रेणीत येतात टाटा आणि महिंद्रा अशा कंपन्यांच्या कार. या दोन्ही कंपन्या त्यांच्या मॉडेलच्या भक्कमपणासाठी ओळखल्या जातात. मात्र, तरीही त्यांचं वेगळेपणसुद्धा कारप्रेमींचं लक्ष वेधत असतं. एकिकडे महिंद्राच्या कार या त्यांच्या टँक शेप मॉडेलसह दणकटपणासाठी ओळखले जातात, तर दुसरीकडे टाटा मोटर्सच्या कार या प्रवाशांची सुरक्षितता आणि आरामदायी प्रवासासाठी सोईच्या ठरतात.
Mahindra च्या Scorpio-N, XUV700 यांसारख्या कारचे इंजिन अधिक पॉवर देतात. ज्यामुळं लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी आणि ओबडधोबड रस्त्यांसाठीसुद्धा या कार योग्य पर्याय ठरतात. तर, टाटाच्या सफारी आणि हॅरियरसारख्या कार या तुलनेत कमी पॉवर देत असल्या तरीही त्यात आरामदायी प्रवासाची हमी मिळते. शिवाय शहरातील प्रवासासाठी या कार उत्तम पर्याय ठरतात.
महिंद्राच्या कार सहसा मोठ्या बॉडीसाठी ओळखल्या जातात. ज्यामुळं त्यांची एक वेगळी ओळख आहे. तर, टाटाच्या कारचं डिझाईन अधिक स्टायलिश आणि मॉडर्न असल्यानं इथं नव्या पिढीकडूनही या कारना पसंती मिळते. सुरक्षिततेच्या बाबतीत महिंद्राला टाटा कंपनी मागे टाकते. Nexon, Safari, Harrier सारख्या कारना 5 स्टार सेफ्टी रेटिंग मिळाल्यानं अनेकांचाच या कंपनीच्या कारवर विश्वास.
महिंद्राकडूनही कार सेफ्टीच्या मुद्द्यावर लक्ष दिलं जात असून, कंपनीच्या अनेक कारमध्ये अद्ययावत यंत्रणा जोडली जात आहे. मोठं सनरुफ आणि मोठी स्क्रीन असेही पर्याय या कारमध्ये मिळतात. तर टाटाच्या कारमध्ये इन्फोटेन्मेंट सिस्टीम, आरामदायी केबिन मिळतं.
राहिला मुद्दा EV चा तर, टाटा या श्रेणीत पुढे आहे. कंपनीच्या Nexon EV, Punch EV या कार बाजारात विक्रीसाठी उपलब्ध असून त्या उत्तम रेंज देतात. तर महिंद्राकडून नवी EV लाँच केली जाणार असल्यानं त्याला आता कसा प्रतिसाद मिळतो हे पाहणं महत्त्वाचं असेल.
नेमकी कोणती एसयुव्ही खरेदी करावी या प्रश्नाचं उत्तर चालकावर अवलंबून असतं. त्यामुळं जर, कार चालवताना ऑफ रोडिंगची आवड आणि अधिक दमदार कार हवी असल्यास महिंद्राच्या कार उत्तम पर्याय आहेत. तर, कुटुंबाची सुरक्षितता आणि आरामदायी प्रवास करु इच्छिता तर, टाटा हा एक उत्तम पर्याय आहे. शहरातील दैनंदिन प्रवासासाठी आणि उत्तम मायलेजसाठी टाटाच्या कार किफायतशीर पर्याय ठरतात. मात्र मोठा प्रवास आणि मोठं कुटुंब असल्यास महिंद्राचीच निवड योग्य.
सायली पाटील या 'झी 24 तास डिजीटल'मध्ये सिनियर सब एडिटर पदावर कार्यरत असून, त्यांना पत्रकारिता क्षेत्रातील 11 वर्षांचा अनुभव आहे. त्यांनी 'लोकमत', 'लोकसत्ता' या वृत्तपत्रांसाठी काम केलं. 'लोकसत्ता'मधील 'VIVA' या जीवनशैली विषयावर आधारित पुरवणीसाठी त्यांनी लिखाण केलं पुढे त्यांनी लोकसत्ता डिजीटलसाठी काम केलं. त्यांनी 'एबीपी माझा' च्या डिजीटल टीमसोबत कामाचा अनुभव घेत 2021 मध्ये पुन्हा एकदा 'झी 24 तास डिजीटल'मध्ये रुजू होत विविध विषयांवरील बातम्यांमध्ये योगदान दिलं. मनोरंजन आणि Lifestyle विषयांतील सुरुवातीचा अनुभव आणि त्यानंतर राजकारण, आरोग्य, प्रवास, राज्यस्तरीय बातम्यांमध्येही त्यांचा हातखंड आहे. सिनेमांचं समीक्षण, राष्ट्रीय स्तरावरील वृत्त, जागतिक स्तरावरील घडामोडी, हवामान वृत्त आणि खगोलशास्त्राश, पुरातत्त्वं विभागाच्या संशोधनासंदर्भातील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रुची आहे. भटकंती, सिनेमा, विज्ञान, खाद्यसंस्कृती हे त्यांच्या विशेष आवडीचे विषय आहेत.
...Read More|
RR
(11 ov) 150/3
|
VS |
MI
123/9(11 ov)
|
| Rajasthan Royals beat Mumbai Indians by 27 runs | ||
| Full Scorecard → | ||
|
RCB
(20 ov) 250/3
|
VS |
CSK
207(19.4 ov)
|
| Royal Challengers Bengaluru beat Chennai Super Kings by 43 runs | ||
| Full Scorecard → | ||
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.