)
मुंबई | भारतात कारप्रेमींकडून कायमच काही कंपन्यांना सातत्यानं पसंती मिळते. कार खरेदीचा मुद्दा आला, की या कंपन्यांच्या कारची चर्चा हमखास होते. ही कारनिर्माती कंपनी आहे टाटा. सध्या कार क्षेत्रामध्ये टाटा मोटर्सची सिएरा चर्चेत आहे. ज्या कारचं इलेक्ट्रीक वर्जन नुकतंच लाँच करण्यात आलं आणि ऑटोमोबाईल क्षेत्रात टाटाच्या या नव्या व्हेरिएंनं अनेकांचं लक्ष वेधलं.
विषय कार खरेदीचा असेल, तर नेमकी कोणती सिएरा खरेदी करावी हाच प्रश्न अनेकांना पडत असावा. अनेक विश्लेषकांनी या कारच्या विविध व्हेरिएंटवर भाष्य केलं. सध्या भारतामध्ये टाटाची पेट्रोल – डिझेल आणि इलेक्ट्रीक अशा व्हेरिएंटमधील कार विक्रीस उपलब्ध आहे.
टाटा सिएरा ईव्ही आणि या कारच्या पेट्रोल डिझेल व्हेरिएंटमध्ये सर्वात मोठा फरक म्हणजे या दोन्ही व्हेरिएंटची निर्मिती. सिएराचं ईव्ही व्हेरिएंट नव्या आणि अत्याधुनिक जेनरेशन-2 acti.evच्य धर्तीवर तयार करण्यात आलं आहे. थोडक्यात इलेक्ट्रीक वाहनांच्या गरजा लक्षात घेऊन ही कार तयार करण्यात आली आहे.
सिएराचं पेट्रोल आणि डिझेल मॉडेल कंपनीच्या अल्फा आणि ओमेगावर आधारित मॉडेलवर तयार करण्यात आलं आहे. या कारणामुळं दोन्ही कारची राईड क्वालिटी, बॅलेन्स आणि केबिन स्पेसमध्ये बरंच अंतर आहे.
कारप्रवासात थराराची आवड असल्यास सिएराची इलेक्ट्रीक कार उत्तम पर्याय ठरते. सिएरा ईव्ही टॉप व्हेरिएंट ड्यूल मोटर आणि ऑल व्हिल ड्राईव्ह सेटअपसह उपलब्ध असून, त्यातून 504 एनएम टॉर्क जनरेट होतं. ज्यामुळं असमान रस्त्यांवरही ही कार उत्तम ग्रिप देते.
सिएराच्या पेट्रोल डिझेल मॉडेलमध्ये मॉडर्न फ्रंट व्हील ड्राईव्ह सुविधा असून, त्यामध्ये इंजिनमधील ताकद ही पुढच्या चाकांनाच मिळते. मात्र, पेट्रोल व्हेरिएंटचं 1.5 लीटर टर्बो इंजिन, डिझेस इंडिन शहरासह महामार्गांवरील प्रवासासाठी उत्तम आहे. मात्र, ईव्हीहून कमी पॉवर जनरेट करतं.
इलेक्ट्रीक सिएरा लाँच झाल्यानंतर दोन्ही कारच्या लूकमधील फरक पाहिल्यास या दोन्ही कार अतिशय अत्याधुनिक भासतात. मात्र, लक्षपूर्वक पाहिल्यास त्यातील फरकसुद्धा लक्षात येतो. सिएराच्या ईव्ही फ्रंटमध्ये एक एनक्लोज्ड ग्रिल आणि एक स्लीक कनेक्डेट एलईडी लाईट बार मिळतो जो बराच मॉडर्न आहे. तर, पेट्रोल डिझेल कारच्या मॉडेलमध्ये इंजिन थंड ठेवण्यासाठी कारच्या पुढील बाजूस एक ट्रेडिशनल एअर वेंट आणि ग्रिल देण्यात आली आहे. याशिवाय दोन्ही व्हेरिएंटचे अलॉय व्हील्ससुद्धा अतिशय वेगळे आहेत.
टाटा सिएरा कार इतकी दर्जेदार आहे ज्यामध्ये दोन्ही व्हेरिएंटच्या फिचरमध्ये फरक पाहायला मिळतो. सिएरा ईव्हीमध्चेय ट्रिपल-स्क्रीन लेआउट, वी2एल तंत्रज्ञानाच्या मदतीनं कारमधूनच घरातील उपकरणं चालवू शकता. या कारमध्ये 540 डिग्री कॅमेरा आहे, तर कारमध्ये फ्रंट स्टोरेजसुद्धा मिळतो. कारच्या पेट्रोल डिझेल व्हेरिएंटमध्येसुद्धा मिळणारे फिचर प्रिमियम आहेत. ज्यामध्ये पॅनोरामिक सनरुफ, वेंटिलेटेड सीट मिळतात. थोडक्यात सिएराची ईव्ही सरस असली तरीही चार्जिंग स्टेशनच्या एका मुद्द्यामुळं पेट्रोल- डिझेल व्हेरिएंटच इथं बाजी मारून जातं.