सोशल मीडियावर कार्टून फोटोंचा ट्रेण्ड; फडणवीसांसह, सचिनलाही भुरळ पाडणारं Ghibli आहे तरी काय?

Studio Ghibli-Style Art viral photos : सोशल मीडिया फीड स्क्रोल करता करता तुम्हालाही काहीतरी नवं दिसतंय का? अगदी बरोबर... हेच ते कार्टून फोटो.... 

सायली पाटील | Updated: Mar 28, 2025, 09:20 AM IST
सोशल मीडियावर कार्टून फोटोंचा ट्रेण्ड; फडणवीसांसह, सचिनलाही भुरळ पाडणारं Ghibli आहे तरी काय?
do you know Why Social Media Is Suddenly Flooded With Studio Ghibli Style AI Art

Studio Ghibli-Style Art viral photos : विज्ञान आणि तंत्रज्ञान इतक्या झपाट्यानं पुढे जात आहे की प्रत्येक दिवस काहीतरी नवं पाहायला मिळत आहे. सोशल मीडिवर हे बदल अतिशय झपाट्यानं पाहायला मिळत असून, त्यातच आता एक कमाल फिचर सर्वच नेटकरी वापरताना दिसत आहेत. या फिचरची सर्वांनाच भुरळ पडली असून, अगदी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरसुद्धा (Sachin Tendulkar) यात मागे राहिले नाहीत. 

Add Zee News as a Preferred Source

या कार्टून फोटोंना नेमकं म्हणायचं तरी काय? 

व्हायरल होणारे आणि लक्ष वेधणारे हे फोटो OpenAI ची एक नवी अपडेट असून त्याच माध्यमातून हे Ghibli-Style Art फोटो व्हायरल होत आहेत. मंगळवारीच ओपन एआयचं नवं टूल GPT-4o लाँच करण्यात आलं. ज्यानंतर लगेचच जगभरातील नेटकऱ्यांनी त्यांच्या कल्पकतेला तंत्रज्ञानाची जोड देत जणू एखादं चित्र भासावं अशी कार्टून Ghibli aesthetic मध्ये तयार करून घेतली. 

हे नवं मॉडेल एखादा फोटो किंवा एखादं दृश्य अधिक प्रभावी आणि तितक्याच कमालपणे सादर करण्याच्या उद्देशानं तयार करण्यात आलं आणि हे करत असताना त्यामध्ये जपानी अॅनिमेटर हायाओ मियाझाकी यांच्या कलेची झलकही दिसून येताच नेटकरी हैराण झाले. 

ओपन एआयची ही अपडेट Live केल्याच्या काही तासांनंतरच इतकी व्हायरल झाली की सोशल मीडियावर जणू ही लाटच आली. अनेक नेटकऱ्यांनी त्यांचे काही फोटो वापरत या टूलला तपासून पाहिलं आणि समोर आलेलं उत्तर, एक अप्रतिम कार्टून फोटो पाहून प्रत्येकजण भारावला. सेल्फी, प्राण्यांचे फोटो, काल्पनिक दृश्य, मोठे प्रसंग इथपासून अभिनेते, नेते, खेळाडू या साऱ्यांनीच हे कमाल टूल वापरून पाहिलं. 

गेल्या काही तासांपासून सोशल मीडियावर #GhibliStyle आणि #AIGhibli असे हॅशटॅगही ट्रेंड करू लागले आहेत, जिथं पाण्याच्या रंगांचा वापर करून आपण एखादं चित्र रेखाटतो तेव्हा ते नेमकं कसं दिसतं अगदी तसंच दृश्य एका क्षणात हे टूल डोळ्यांसमोर उभं करतं. 

हेसुद्धा वाचा : तुमचं सोशल मीडिया अकाऊंट Income Tax विभागाच्या रडारवर; 1 एप्रिलपासून जरा सावध राहा....

कार्टूनच्या विश्वात किंवा एका काल्पनिक जगात जगण्याची सुप्त इच्छा अनेकांचीच असते. या टूलमुळं हीच संधी सर्वांना मिळत असून ते अनोखं विश्व नेमकं कसं असेल आणि तुम्ही तिथं कसे दिसाल याचं कमाल चित्रण या टूलच्या माध्यमातून पाहायला मिळत आहे. 

चॅट जिपीटीच्या नव्या अपडेटविषयी थोडं.... 

ओपन एआयच्या चॅट जिपीटीमध्ये थेट चॅटबॉटमध्येच फोटो एडिट करण्याची मुभा युजर्सना दिली जात आहे. ज्याअंतर्गत "Images in ChatGPT" हे फिचर सर्वांसाठी उपलब्ध असून, हे टूल मोफत वापरणाऱ्यांना मात्र त्याच्या अधिकच्या वापरामुळं काही अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळं हे टूल नेमकं कसं काम करतं हे पाहण्यासाठी ते प्रत्यक्षात एकदा वापरून पाहाच... 

About the Author

Sayali Patil

सायली पाटील या 'झी 24 तास डिजीटल'मध्ये सिनियर सब एडिटर पदावर कार्यरत असून, त्यांना पत्रकारिता क्षेत्रातील 11 वर्षांचा अनुभव आहे. त्यांनी 'लोकमत', 'लोकसत्ता' या वृत्तपत्रांसाठी काम केलं. 'लोकसत्ता'मधील 'VIVA' या जीवनशैली विषयावर आधारित पुरवणीसाठी त्यांनी लिखाण केलं पुढे त्यांनी लोकसत्ता डिजीटलसाठी काम केलं. त्यांनी 'एबीपी माझा' च्या डिजीटल टीमसोबत कामाचा अनुभव घेत 2021 मध्ये पुन्हा एकदा 'झी 24 तास डिजीटल'मध्ये रुजू होत विविध विषयांवरील बातम्यांमध्ये योगदान दिलं. मनोरंजन आणि Lifestyle विषयांतील सुरुवातीचा अनुभव आणि त्यानंतर राजकारण, आरोग्य, प्रवास, राज्यस्तरीय बातम्यांमध्येही त्यांचा हातखंड आहे. सिनेमांचं समीक्षण, राष्ट्रीय स्तरावरील वृत्त, जागतिक स्तरावरील घडामोडी, हवामान वृत्त आणि खगोलशास्त्राश, पुरातत्त्वं विभागाच्या संशोधनासंदर्भातील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रुची आहे. भटकंती, सिनेमा, विज्ञान, खाद्यसंस्कृती हे त्यांच्या विशेष आवडीचे विषय आहेत. 

...Read More