Most Expensive Phone In The World: माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील आघाडीची कंपनी असलेली अ‍ॅपल ही जगातील सर्वात प्रसिद्ध स्मार्टफोन निर्मिती करणाची कंपनी आहे. ही कंपनी दरवर्षी त्यांचा नवीन आयफोन बाजारात आणतात. जगातील सर्वात आधुनिक आणि महागडे स्मार्टफोन म्हणून अ‍ॅपलच्या आयफोन्सच्या वेगवेगळ्या व्हर्जन्सकडे पाहिलं जातं. मात्र या फोनच्या किमती पाहिल्यानंतर कोण हे फोन विकत घेत असेल असा प्रश्न पडतो. जगात एवढा पैसा कोणाकडे आहे की केवळ फोनसाठी एवढे पैसे खर्च करेल असा प्रश्न सर्वसामान्यांना पडल्याशिवाय राहत नाही. पण भारताबद्दल विचार करायचा झाल्यास महागडे फोन कोण वापरेल असा प्रश्न पडल्यास उत्तर म्हणून अंबानी कुटुंबाचं नाव डोळ्यासमोर येतं. 


सर्वकाही आलिशान


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रिलायन्स कंपनीचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी आणि त्यांचे कुटुंब हे केवळ भारतामधील नाही तर आशियामधील सर्वात श्रीमंत कुटुंबांपैकी एक आहे. अंबानी कुटुंबीय हे आलिशान लाईफस्टाइलसाठीही ओळखलं जातं. जगातील सर्वात महागड्या घरामध्ये म्हणजेच 'अ‍ॅण्टीलिया'मध्ये राहणाऱ्या अंबानी कुटुंबाबद्दल अनेक समज गैरसमज सर्वसामान्यांमध्ये आहेत. अनेकदा अंबानी कुटुंबाकडे असलेल्या महागड्या वस्तूंची चर्चा सोशल मीडियापासून पापाराझींपर्यंत सर्वच वर्तुळामध्ये दिसून येते. देशातील सर्वात महागड्या गाड्यांचा ताफा असो, कार्यक्रम असो किंवा एखादा दैदिप्यमान सोहळा असो अंबानींच्या आलिशान राजेशाही थाटाची चर्चा कायमच असते.


फोनच्या मागील बाजूस हिरा?


अंबानी कुटुंबाभोवती असलेले हे वलयच त्यांच्याबद्दलच्या वेगवेगळ्या गोष्टी व्हायरल करण्यास कारणीभूत ठरतं. मध्यंतरी अशीच एक बातमी व्हायरल झाली होती. या बातमीमध्ये नीता अंबानी यांच्याकडे जगातील सर्वात महागडा फोन असल्याचा दावा करण्यात आलेला. नीता अंबानी या जगातील सर्वात महागड्या स्मार्टफोनच्या मालकीण असल्याच्या या चर्चांवर सर्वसामान्यांनी सहाजिकच लगेच विश्वास ठेवला. अनेक बातम्यांमध्ये नीता अंबानींकडे गोल्ड प्लेटेड आयफोन असून या आयफोनच्या मागील बाजूस हिरा बसवण्यात आल्याचा दावाही करण्यात आला आहे.



या दाव्यांमधील सत्य काय?


जगातील सर्वात महागड्या घरात राहणाऱ्या नीता अंबानींकडे एवढा महाग फोन असूच शकतो यावर कोणीही विश्वास ठेवेल. या फोनची किंमत 400 कोटी रुपये असल्याचाही दावा केला गेला. मात्र हा दावा खरा आहे का असा प्रश्न पडला असेल तर त्याचं उत्तर नाही असं आहे. नीता अंबानींच्या नावाने व्हायरल झालेली ही बातमी पूर्णपणे खोटी असल्याचा खुलासा करण्यात आला आहे.


'रिलायन्स'मधील सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार नीता अंबानींकडे पिंक फॅल्कॉन फोन नाही. नीता अंबानी नेमका कोणता फोन वापरतात याची माहिती उपलब्ध नाही. पण त्यांच्याकडे असलेला फोन हा जगातील सर्वात महागडा आणि 400 कोटींचा फोन नक्कीच नाही हे मात्र खरं. त्यामुळे नीता अंबानी 400 कोटींचा फोन वापरतात ही अफवाच आहे.