नवी दिल्ली : क्रेडीट कार्डमुळे कॅशलेस शॉपिंग करणे शक्य होते. मात्र यामुळे काही नुकसान देखील होऊ शकतं. त्यामुळे खरेदी करताना या ५ ठिकाणी क्रेडीट कार्ड वापरणे टाळा.
वाढत्या महागाईबरोबरच आपल्या गरज देखील वाढल्या आहेत. त्यामुळे अचानक येणाऱ्या खर्च करण्यासाठी इमर्जन्सी फंडची खूप मदत होते. इमर्जन्सी फंडचा वापर करण्यासाठी तुमच्याकडे कमीत कमी इतके पैसे जमा झाले पाहिजेत ज्यामुळे तुम्ही ३-६ महिन्यांपर्यंतच्या गरजा आरामात पूर्ण करू शकाल. मात्र इमर्जन्सी कामासाठी तुम्ही क्रेडीट कार्ड वापरत असाल तर तुम्हाला त्याची अधिक किंमत चुकवावी लागेल.
क्रेडीट कार्डमधून पैसे काढण्याचा पर्याय असतो. मात्र त्याचा वापर असा करू नका. कारण असे केल्यास तुम्हाला इतर वेळेपेक्षा अधिक इंटरेस्ट द्यावा लागेल. क्रेडीट कार्डमधून तुम्ही जितके पैसे काढाल त्याच्यावर २.५ ते ३.५ टक्क्यांपर्यंत इंटरेस्ट द्यावा लागेल.
शेअर बाजारात गुंतवणुकीसाठी क्रेडीट कार्ड वापरू नका. कारण क्रेडीट कार्डच्या बिलाची ड्यू डेट च्या आधी गुंवणूकीची रक्कमेची किंमत कमी होते.
सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे http लिहिलेल्या वेबसाईट्स नेहमी सुरक्षित असतात. त्यामुळे खरेदी करण्यापूर्वी कंपनीबद्दल पूर्ण माहिती जाणून घ्या. त्याचबरोबर कंपनी प्रतिष्ठित असणे गरजेचे आहे. त्याचा ट्रक रेकॉर्ड चांगला असला पाहिजे.
अनेकदा आपण गरजेपेक्षा अधिक शॉपिंग करतो. अशावेळी लोक क्रेडीट कार्ड वापरतात. मात्र नंतर तुमच्यावर आर्थिक ओझं येत. त्यामुळे शॉपिंगच्या वेळेस क्रेडीट कार्डचा वापर विचार करून करायला हवा.