11 लाखांची अंतर्वस्रं, विमानात 'बेडवर ये' म्हणाली अन्...; झुकरबर्गच्या खास व्यक्तीवर गंभीर आरोप

Shocking Claim By Facebook Ex Employee: विमान प्रवासादरम्यानचा अनुभव या माजी कर्मचाऱ्याने आपल्या पुस्तकामधून सांगितला आहे. यावर 'मेटा'नेही प्रतिक्रिया नोंदवली आहे.

स्वप्निल घंगाळे | Updated: Mar 12, 2025, 10:16 AM IST
11 लाखांची अंतर्वस्रं, विमानात 'बेडवर ये' म्हणाली अन्...; झुकरबर्गच्या खास व्यक्तीवर गंभीर आरोप
पुस्तकामधून करण्यात आले धक्कादायक आरोप (फोटो सोशल मीडियावरुन साभार)

Shocking Claim By Facebook Ex Employee: फेसबुकच्या माजी मुख्य कार्यकारी अधिकारी शेर्ली सॅण्डबर्ग यांच्यासंदर्भात एक धक्कादायक खुलासा करण्यात आला आहे. शेर्ली सॅण्डबर्ग यांनी स्वत:साठी आणि त्यांच्या 26 वर्षीय महिला सहाय्यकासाठी युरोप दौऱ्याआधी तब्बल 11 लाख 30 हजार रुपये लिंगरीजवर (महिलांची अंतरवस्रांवर) खर्च केले होते. याहून अधिक थक्क करणारी बाब म्हणजे शेर्ली सॅण्डबर्ग यांनी घरी परत येताना वापरलेल्या खासगी जेटमध्ये महिला सहाय्यकाला 'बेडवर ये' असंही सांगितल्याचा दावा करण्यात आला आहे. 

कुठे केला आहे हा दावा?

फेसबुकची माजी कर्मचारी आणि शेर्ली सॅण्डबर्ग यांची माजी सहाय्यक सारा विन-विल्यम्सनेच हे दावे केले आहेत. साराने शेर्ली सॅण्डबर्ग यांच्यासंदर्भातील धक्कादायक दावे एका पुस्तकातून केले आहेत. साराने लिहिलेल्या 'केअरलेस पीपल: अ कॉशनरी टेल ऑफ पॉवर, ग्रीड अॅण्ड लॉस्ट आयडीएलिझम' या पुस्तकामध्ये शेर्ली सॅण्डबर्ग यांच्याबरोबर फेसबुकचे संस्थापक मार्क झुकरबर्ग यांच्यावरही टीका करण्यात आली आहे. फेसबुकमध्ये कार्यरत असताना शेर्ली सॅण्डबर्ग मार्क झुकरबर्गच्या निकटवर्तीय होत्या.

ही लेखिका आहे तरी कोण?

साराने 2011 पासून 2017 दरम्यान सहा वर्ष फेसबुकमध्ये काम केलं. सहा वर्षानंतर साराने फेसबुक कंपनीला सोडचिठ्ठी दिली. साराने केलेल्या दाव्यानुसार, युरोप दौऱ्यादरम्यान कारमधून फिरताना शेर्ली सॅण्डबर्ग आणि त्याचा सहकारी कारमध्ये एकमेकांच्या मांडीवर डोकं ठेऊन पडायचे. यावेळी बसलेली व्यक्ती मांडीवर पडलेल्या व्यक्तीच्या केसांमधून हात फिरवत गोंजारायची, असा दावाही या माजी कर्मचाऱ्याने केला आहे.

बेड शेअर करण्यास नकार दिल्याने...

'द न्यू यॉर्क टाइम्स'मधील पुस्तक परीक्षणामध्ये साराने पुस्तकात, 'शेर्ली सॅण्डबर्ग यांनी त्यांच्यासाठी आणि त्यांच्या सहकाऱ्यासाठी (सारासाठी) लिंगरीज खरेदी करण्यासाठी सारालाच पाठवलं होतं. यावेळी अंतरवस्रांचं बील 13 हजार अमेरिकी डॉलर इतकं झालं होतं,' असा दावा करण्यात आला आहे. खासगी विमानाने परत येत असतानाच त्या विमानात एकच बेड उपलब्ध होता. त्यामुळे शेर्ली सॅण्डबर्ग यांनी साराला बेड शेअर करण्याचा सल्ला दिला. मात्र त्याला साराने नकार दिल्याने शेर्ली सॅण्डबर्ग चांगल्याच वैतागल्याचा दावा पुस्तकात केल्याचं पुस्तक परीक्षणात म्हटलं आहे. 

या आरोपांवर फेसबुकने आता काय म्हटलंय?

मात्र फेसबुकची मातृक कंपनी असलेल्या 'मेटा'च्या अधिकाऱ्यांनी साराने केलेले दावे हे, 'कालबाह्य आणि यापूर्वी समोर आलेल्या माहितीचं हे मिश्रण असून यामध्ये कंपनीबद्दल खोटी माहिती पसरवण्यात आली आहे,' असं म्हटलं आहे. तसेच मेटाच्या अधिकाऱ्यांनी साराला कंपनीने आठ वर्षांपूर्वीच कामावरुन काढून टाकल्याचंही म्हटलं आहे. 'वाईट कामगिरी आणि विष पेरणारी वागणूक' यामुळे साराला कामावरुन काढून टाकलेलं, असा दावा मेटाच्या अधिकाऱ्यांनी केला आहे. त्यावेळी करण्यात आलेल्या चौकशीमध्ये साराने केलेले दावे हे चुकीचे आणि दुर्देवी असल्याचं तपास समितीने म्हटलं होतं, अशी आठवणही 'मेटा'च्या अधिकाऱ्यांनी करुन दिली आहे. 

मार्क झुकरबर्गचा प्रवास एक व्यक्ती म्हणून,,,

फेसबुकविरोधी कॅम्पेन करणारे तेव्हापासूनच साराला आर्थिक पाठबळ देत असून तिचं नवं पुस्तक हे याच उद्देशाने प्रकाशित करण्यात आल्याचं, मेटाचं म्हणणं आहे. द टाइममधील लेखानुसार, साराने मार्क झुकरबर्गचा प्रवास एक व्यक्ती म्हणून इंजिनिअरिंग आणि कोडींबद्दल प्रेम असणारी व्यक्ती ते राजकारण आणि लोकप्रियतेमुळे हुरळून गेलेली व्यक्ती असा झाल्याचा दावा करण्यात आल्याचं म्हटलं आहे.

कोर्टाने शेर्ली सॅण्डबर्ग यांना दिलेला इशारा

शेर्ली सॅण्डबर्ग आणि मार्क झुकरबर्ग हे 'केअरलेस पीपल' आहेत, असं साराचं म्हणणं आहे. आपल्या वागण्याचे परिणाम दुसऱ्यांनी भोगावेत अशी या लोकांची भूमिका असल्याचंही साराने म्हटलं आहे. जानेवारी महिन्यामध्येच कोर्टाने शेर्ली सॅण्डबर्ग यांना फेसबुकच्या केंब्रिज अॅनलिटीका प्रायव्हसी प्रकरणाशीसंबंधित ईमेल डिलिट केल्यावर झापलं होतं. हा डेटा जपून ठेवण्याचे निर्देश कोर्टाने शेर्ली सॅण्डबर्ग यांना दिले होते.