AI विश्वात सर्वात मोठी क्रांती, तुमचा मोबाईल बोलेल माणसांप्रमाणे; Gemini चं नवं फिचर 99 टक्के लोकांना नाही माहिती!

Google Gemini: गुगलने त्यांच्या वार्षिक डेव्हलपर्स कॉन्फरन्स गुगल आय/ओ 2025 मध्ये हे नवीन फीचर लाँच केलंय.

प्रविण दाभोळकर | Updated: May 23, 2025, 03:17 PM IST
AI विश्वात सर्वात मोठी क्रांती, तुमचा मोबाईल बोलेल माणसांप्रमाणे;  Gemini चं नवं फिचर 99 टक्के लोकांना नाही माहिती!
गुगल जेमिनी

Google Gemini: सध्या जगभरात एआयचा बोलबाला आहे. प्रत्येक गोष्टीत एआयने एन्ट्री केलीय. त्यामुळे माणसांची कामे सोपी होऊ लागली आहेत.  आता तर तुमच्या मोबाईलमध्ये तुम्हाला मोठा अविष्कार पाहायला मिळतोय. आता तुमचा फोन तुमच्याशी माणसासारखा बोलू शकतो. यासाठी तुम्हाला कोणताही महागडा आणि प्रीमियम फोन खरेदी करण्याची गरज नाही. तुम्ही तुमच्या बेसिक स्मार्टफोनमध्येही गुगलचे हे नवीन एआय फीचर वापरू शकता. काय आहे हे अॅप, याचा तुम्हाला कसा फायदा होऊ शकतो? सविस्तर समजून घेऊया. 

 फोनवरून संभाषण करा

गुगलने त्यांच्या वार्षिक डेव्हलपर्स कॉन्फरन्स गुगल आय/ओ 2025 मध्ये हे नवीन फीचर लाँच केलंय. या फीचरद्वारे तुम्ही तुमच्या फोनवरून संभाषण करू शकता. तुम्ही तुमच्या फोनचा कॅमेरा चालू करू शकता. आणि त्यात दिसणाऱ्या गोष्टींबद्दल माहिती मिळवू शकता. गुगलचे हे फीचर जेमिनी लाईव्ह या नावाने लाँच करण्यात आलंय. हे कंपनीच्या बहुप्रतिक्षित प्रोजेक्ट अ‍ॅस्ट्राचा एक भाग आहे. गुगल बऱ्याच काळापासून या फीचरवर काम करत होते. कंपनीने गेल्यावर्षी झालेल्या कार्यक्रमात हे फिचर सादर केलं होतं. 

कॅमेरा पॉइंट करा

गुगलने त्यांच्या एक्स हँडलद्वारे सांगितले की, जेमिनी लाईव्ह फीचर येत्या आठवड्यात कॅलेंडर, कीप नोट्स, टास्क आणि मॅप्स सारख्या अनेक गुगल अॅप्समध्ये उपलब्ध असेल. तुम्हाला फक्त तुमच्या फोनचा कॅमेरा पॉइंट करायचा आहे आणि जेमिनी तुमच्यासाठी सर्वकाही करेल. तुमच्या कॅलेंडरमध्ये आमंत्रणे जोडण्यापासून ते तुम्हाला दिशानिर्देश देण्यापर्यंत सर्वकाही मदत तुम्हाला यामाध्यमातून होणार आहे.

जेमिनी लाईव्ह कसे वापरावे?

हे फिचर वापरण्यासाठी तुम्हाला तुमच्या स्मार्टफोनमध्ये जेमिनी अ‍ॅप इन्स्टॉल करा.
गुगलचे हे एआय टूल प्ले स्टोअर तसेच अ‍ॅपल अ‍ॅप स्टोअरवर उपलब्ध आहे.
हे टूल डाउनलोड केल्यानंतर ते तुमच्या फोनवर इन्स्टॉल करा.
यानंतर त्याला काही आवश्यक परवानग्या द्या. जेणेकरून तो तुमच्याशी बोलण्यास तयार असेल.
नंतर जेमिनी अॅप लाँच करा आणि तळाशी असलेल्या माइकच्या शेजारी असलेल्या आयकॉनवर टॅप करा.
असे केल्याने जेमिनी लाईव्ह उघडेल आणि आता तुमचा फोन तुमच्याशी बोलण्यासाठी तयार आहे.
तुमच्या फोनचा कॅमेरा वापरण्यासाठी, तळाशी असलेल्या कॅमेरा आयकॉनवर टॅप करा.
यानंतर तुम्हाला कॅमेऱ्यात दिसणाऱ्या वस्तूकडे बोट दाखवावे लागेल.
त्यानंतर तुम्ही स्क्रीनवर टॅप करून गुगल जेमिनी वरून त्याबद्दल माहिती मिळवू शकता.

हे फिचर वापरताना आपण आपल्या ओळखीच्या इसमाशी बोलत असल्याचा भास तुम्हाला होईल. त्याप्रमाणेच तुमचा फोन तुमच्याशी संवाद साधेल. हे फिचर वापरण्यासाठी तुमच्या फोनमध्ये इंटरनेट असणे आवश्यक आहे. इंटरनेटवर उपलब्ध असलेल्या डेटाच्या आधारे तुम्ही कॅमेऱ्यात दाखवलेल्या वस्तूबद्दल माहिती तुम्हाला दिली जाईल.