)
आजकाल फोटो ट्रेंडची सोशल मीडियावर भलतीच क्रेझ आहे. दर दहा दिवसांनी नवा नवा फोटो ट्रेंड येतो. कधी साडी ट्रेंड तर कधी नॅनो बनाना ट्रेंड, या ट्रेंडच्या नादात आपण आपली प्रायव्हसी धोक्यात आणलीय. जेव्हा तुम्ही फोटो ट्रेंडमध्ये सहभागी होता तेव्हा नकळत तुमच्या फोनमधील फोटो गॅलरी तुम्ही कुणासाठी तरी खुली करुन देता. या फोटो ट्रेंडचे साईड इफेक्ट किती धोकादायक आहेत हे सांगणारा आमचा स्पेशल रिपोर्ट
सोशल मीडियावर सध्या साडी ट्रेंडनं धुमाकूळ घातलाय. जी तरुणी उठते ती साडी ट्रेंडचा फोटो पोस्ट करते... स्वतःला रेट्रो लूकमध्ये पोस्ट करुन काहीजण लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस पाडून घेतायेत. हे एवढ्यावरच थांबलेलं नाही. अनेकजणांना नॅनो बनाना ट्रेंडचं वेड लागलंय. प्रत्येकजण आपल्या वैयक्तिक फोटोंना 3D लूक देतायेत. एवढंच नाही तर काहींनी आपल्या पाळीव कुत्र्यांना आणि पाळीव मांजरांनाही या ट्रेंडमध्ये ऍड केलंय. हौस म्हणून आपण यापूर्वीही अनेक फोटो ट्रेंडमध्ये सहभागी झाला असाल.... पण सावधान यावेळी तुम्ही फोटो ट्रेंडमध्ये सहभागी होऊन मोठी चूक केली नाही ना?कारण जेमिनी ट्रेंडबाबत अनेक गोष्टी आता समोर येऊ लागल्यात.
जेमिनी AIचा वापर करुन तुम्ही जेव्हा फोटो तयार करता हा फोटो तयार करताना तुम्ही गुगलच्या ताब्यात तुमचा फोटो डेटा दिल्याची चर्चा सुरु झालीये. काही वापरकर्त्यांनी जेमिनी एआयला त्यांना पासपोर्टसाईज फोटो देऊन पूर्ण साईजचा फोटो तयार करण्यास सांगितला. जेमिनी एआयनं तो फोटो बनवला. पण पूर्णाकृती फोटो तयार करताना हातातलं घड्याळ, हातातली अंगठी, हातातला फोन असे सगळे बारकावे जसेच्या तसे दिले. हे बारकावे जेमिनीनं स्वकल्पनेतून दिले नव्हते. तर एआयनं हे बारकावे तुमच्याच फोन ड्राईव्हवर आणि गुगल फोटो स्टोअरमधील फोटोंच्या आधारे बनवल्याचा अंदाज वर्तवण्यात येतोय.सोशल मीडियावरील झलक भावनानी या युजरनं एक फोटो साडी ट्रेंडसाठी जेमिनीवर अपलोड केला. अपलोड केलेल्या फोटोत तिच्या हाताच्या बाह्या झाकल्या गेलेल्या होत्या. पण जेव्हा एआय फोटो जनरेट झाला त्यावेळी तिच्या डाव्या खांद्यावरचा तीळ फोटोत स्पष्टपणं दिसत होता. एआयनं विना परवानगी तिचे गुलल ड्राईव्हमधील फोटो विनापरवानगी वापरले का असा प्रश्न निर्माण झालाय.
गुगल ट्रेंडमधील फोटो बनवताना तुमच्या आधीच्या फोटोंचा वापर करत असल्याचं तज्ज्ञ सांगतात. कारण आपण अजाणतेपणी गुगलचं ऍप जेव्हा तुमच्या गॅलरीचा ऍक्सेस मागतं तेव्हा तुम्ही त्याला परवानगी दिलेली असते.
यातून आणखी एक चर्चा सुरु झालीये. साडी ट्रेंड किंवा नॅनो बनाना AI ट्रेंडमुळे अनेकांचा डेटा गुगलकडे जमा झालाय. एआय तुम्हाला साडी नेसवू शकतो तर एआय तुमचे नग्न फोटो बनवू शकतो अशी चर्चा सोशल मीडियावर सुरु झालीये. जर जेमिनी एआयवर असे फोटो तयार झाले तर सोशल मीडियावर तर वादळ येईल... आताच काही टेक्नोसॅव्ही युजर्सनं सोशल मीडियावर या शंका उपस्थित करण्यास सुरुवात केलीये.
कोणतीही दुर्घटना घडण्यापूर्वी सावधगिरी बाळगणं गरजेचं असतं. त्यामुळंच गुगलची किंवा कोणतीही सोशल मीडिया ऍप वापरताना तुमच्या मोबाईलचा ऍक्सेस त्यांना देऊ नका. जेव्हा कोणतंही ऍप तुमच्या फोटो गॅलरीचा किंवा मोबाईल नंबरप डिरेक्टरीचा ऍक्सेस मागतं तेव्हा ते देऊ नका नाहीतर भविष्यात तुमच्या वैयक्तिक माहितीचा दुरुपयोग होऊ शकतो.
सोशल मीडियावर कोणताही फोटो ट्रेंड आल्यावर मागचं पुढचं काही न पाहता त्या ट्रेंडमध्ये सहभागी होऊ नका.... मित्रानं फोटो केला म्हणून तुम्हीपण ट्रेंड फोटो केलाच पाहिजे असं काहीच नाही. डोळे झाकून अनुकरण करणार तर तुमचा तोटा होणार त्यामुळं डोळस राहा... राहा खबरदार.
FAQ
1) सोशल मीडिया फोटो ट्रेंड म्हणजे काय आणि सध्या कोणते ट्रेंड व्हायरल आहेत?
सोशल मीडिया फोटो ट्रेंड हे अॅप्स किंवा AI टूल्स वापरून सेल्फी किंवा वैयक्तिक फोटोंना एडिट करून शेअर करण्याचे फॅड आहेत. दर दहा दिवसांनी नवीन ट्रेंड येतो, ज्यात साडी ट्रेंड (रेट्रो साडी लूक), नॅनो बनाना ट्रेंड (3D फिगराईन-स्टाइल पोर्ट्रेट्स) आणि जेमिनी AI-जनरेटेड इमेजेस समाविष्ट आहेत. इन्स्टाग्रामवर लाखो लोक साडी ट्रेंडमध्ये सहभागी होत आहेत, ज्यात फोटो अपलोड करून AI ने बॉलीवूड-स्टाइल साडी इफेक्ट्स जोडले जातात. हे ट्रेंड मजेदार असले तरी प्रायव्हसी धोके वाढवतात.
2) नॅनो बनाना ट्रेंड म्हणजे काय?
नॅनो बनाना हे गुगलच्या जेमिनी 2.5 फ्लॅश इमेज टूलचे नाव आहे, जे सेल्फींना 3D प्लास्टिक-जसे फिगराईन्स किंवा रेट्रो साडी पोर्ट्रेट्समध्ये बदलते. वापरकर्ते फोटो अपलोड करून प्रॉम्प्ट देतात (उदा. "साडी नेसलेली रेट्रो लूक"), आणि AI २५ सेकंदात इमेज तयार करते. हे ट्रेंड गेल्या महिन्यात लाँच झाले आणि ५०० दशलक्षाहून अधिक इमेजेस तयार झाल्या आहेत. पाळीव प्राण्यांच्या फोटोंनाही यात जोडले जाते, पण प्रायव्हसी चिंता वाढवते.
3) जेमिनी AI फोटो एडिटिंग कसे काम करते?
जेमिनी AI हे गुगलचे जनरेटिव्ह AI टूल आहे, जे फोटो अपलोड करून प्रॉम्प्टवरून नवीन इमेज तयार करते. उदाहरणार्थ, पासपोर्ट-साईज फोटो देऊन पूर्णाकृती फोटो मागितल्यास, AI हातातील घड्याळ, अंगठी किंवा फोन सारखे बारकावे जोडते. हे बारकावे वापरकर्त्याच्या गुगल फोटो किंवा ड्राईव्हमधील इतर फोटोंवरून घेतले जाऊ शकतात, कारण अॅप गॅलरीचा ऍक्सेस मागते. वापरकर्त्यांनी परवानगी दिली असल्यास AI हे डेटा वापरते.