मुंबई : अमेरिकनं कंपनी हार्ले डेव्हिडसननं त्यांच्या ४ नव्या बाईक भारतमध्ये लॉन्च केल्या आहेत. दिल्लीमधल्या शोरूममध्ये या बाईकची किंमत ११.९९ लाख रुपये ते १८.९९ लाख रुपयांपर्यंत आहे. हार्ले डेव्हिडसननं ११.९९ लाख रुपयांमध्ये स्ट्रीट बॉब, १३.९९ लाख रुपयांमध्ये फॅट बॉब, १७.४९ लाख रुपयांमध्ये फॅट बॉय आणि १८.९९ लाख रुपयांमध्ये हेरिटेज क्लासिक या बाईक लॉन्च केल्या आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हार्ले डेव्हिडसन भारतामध्ये १४ मॉडेल विकते आणि देशभरात कंपनीचे २७ डिलर आहेत. या मोटरसायकलना १,७५४ सीसी Milwaukee-Eight 107 V-Twin इंजिन लावण्यात आलं आहे. या मोटरसायकलला न्यू एलईडी हेडलॅम्प्स, न्यू इंस्ट्रमेंट क्लस्टर, कीलेस इगनिशन आणि यूएसबी पोर्ट असणार आहे.