गावाकडच्यांची आवडती बाईक महागली; 70 kmpl चं मायलेज देणारी ही दुचाकी आता किती रुपयांना मिळतेय?

Auto News : गावाकडे गेल्यावर रस्त्यारस्त्यावर ही बाईक दिसतेच दिसते... फक्त महाराष्ट्रच नव्हे, तर महाराष्ट्राबाहेरच्या भागातही या बाईकला कमाल पसंती... ओळखलं ना?

सायली पाटील | Updated: Apr 12, 2025, 11:06 AM IST
गावाकडच्यांची आवडती बाईक महागली; 70 kmpl चं मायलेज देणारी ही दुचाकी आता किती रुपयांना मिळतेय?
Hero Passion Plus New Price colour features latest update

Auto News : भारतात शहरी भागाची वाट सोडून खेड्यापाड्याच्या दिशेनं गेलं असता काही गोष्टी एकसारख्याच पाहायला मिळतात. मग ते तुम्ही देशातील कोणत्या एका खेड्यात जा किंवा राज्यातल्या. अशीच एक सर्रास दिसणारी गोष्ट म्हणजे दुचाकी, त्यातही हीरो मोटर कॉर्प कंपनीची दुचाकी. अवजड सामान वाहणं असो, शेतमाल नेणं किंवा अगदी इतर कोणतंही काम असो, हीरो मोटर कॉर्पच्याच बाईक गावच्या रस्त्यांवर चालताना दिसतात.

खिशाला परवडणारी किंमत आणि चांगलं मायलेज या दोन गोष्टी या बाईकच्या जमेच्या बाजू असून, मध्यमवर्गीयांसाठी दैनंदिन वापरासाठी ही बाईक एक उच्चम पर्याय आहे. मागील कैक वर्षांपासून या बाईकला दुचाकीस्वारांनी पसंती दिल्याचं पाहायला मिळालं आहे. याच कंपनीच्या बाईकमधील एक मॉडेल म्हणजे हीरो पॅशन प्लस.

कंपनीची सर्वाधिक विकली जाणारी दुचाकी अशीही या बाईकची ओळख असून आता मात्र ती खरेदी करताना काही मंडळींना दोनदा विचार करावा लागणार आहे. कारण, लवकरच कंपनीकडून बाईकच्या दरात वाढ केली जाणार आहे. बाईकमध्ये OBD-2B एमिशन नॉर्म्स अपडेट करण्यात आले अ,सून, त्याच कारणानं या बाईकच्या किमतीत काही अंशी वाढ करण्यात आली आहे. नव्या दरासोबतच कंपनीनं बाईकच्या रंगांमध्येही काही बदल केल्याचं पाहायला मिळत आहे.

किती रुपयांनी वाढले बाईकचे दर?

कंपनीच्या माहितीनुसार हीरो पॅशन प्लसच्या किमतीत 1750 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. आधी याच बाईकची किंमत 7990 रुपये इतकी होती. आता हीच किंमत एक्स शोरून 81651 रुपयांवर पोहोचली आहे. बाईकच्या इंजिनमध्ये तूर्तास कोणतेही बदल करण्यात आलेले नाहीत. आधीप्रमाणंच ही बाईक 97.2 cc, सिंगल सिलेंजर असून याच बाईकच्या इंजिनचा वापर कंपनी स्प्लेंडर प्लस आणि HF डीलक्समध्येही करते ही लक्षात घेण्याजोगी बाब. या इंजिननं 8,000 rpm वर 8.02 PS चॉ पॉवर आणि 6,000 rpm वर 8.05 Nm चा टॉर्क जनरेट करते.

राहिला मुद्दा बाईकच्या रंगांचा तर, आता कंपनी दोन नव्या रंगात ही बाईक विक्रीसाठी उपलब्ध करणार आहे. यामध्ये ड्युअल टोन बॉडी पेंट स्कीमचा वापर करण्यात आला असून, काळ्या रंगासह लाल रंगाचे एसेंट्स आणि काळ्या रंगासह निळ्या रंगाचे एसेंट्स दिले जातील. किंमत आणि रंग वगळता बाईकचा लूक किंवा इतरही बदल कंपनीनं केलेला नाही. तेव्हा किफायतशीर बाईक खरेदीच्या विचारात असाल तरह हा पर्याय उत्तम ठरु शकतो.