Instagram, You Tube व्हिडीओतून कमाई करायच्या विचारात आहात? कुठे मिळतो बक्कळ पैसा?

Instagram, You Tube Videos : इन्स्टाग्राम किंवा युट्यूबच्या माध्यमातून पैसे कमवण्याच्या विचारात असाल तर त्यातील तुमच्या फायद्याचं माध्यम कोणतं? पाहा...   

सायली पाटील | Updated: Dec 31, 2024, 12:46 PM IST
Instagram, You Tube व्हिडीओतून कमाई करायच्या विचारात आहात? कुठे मिळतो बक्कळ पैसा? title=
instagram or you tube which social media platform lets you earn more know details

Instagram, You Tube Videos : गेल्या काही वर्षांमध्ये इंटरनेटची वाढती लोकप्रियता आणि त्याची उपलब्धता यामुळं सोशल मीडिया अर्थात समाजमाध्यमांच्या वापरातही लक्षणीयरित्या वाढ झाली. सुरुवातीला कमालीचं प्रसिद्धीझोतात असणारं फेसबुक या शर्यतीत मागे पडलं असलं तरीही त्याचं जोडीदार असणारं इन्स्टाग्राम (Instagram) मात्र दणकून सुरु राहिलं. 

इथं इन्स्टाग्रामवर फोटो आणि व्हिडीओंसह मागोमागच Reel चा धुमाकूळ सुरू असतानाच तिथं कैक वर्षांपासून वापरात असणाऱ्या युट्यूबवरही Short Videos चा ट्रेंड सुरू झाला आणि पाहता पाहता content Creation साठी ही दोन माध्यमं अनेकांसाठीच हक्काचं आणि कमान खर्चात कमाल प्रसिद्धी देणारं साधन ठरली. बरेच इन्फ्लूएन्सर आणि कंटेंट क्रिएटर या माध्यमातून सध्या बक्कळ कमाई करताना दिसतात. इन्स्टाग्रामच्या तुलनेत युट्यूबवर कमाईचे कैक पर्याय उपलब्ध आहेत. पण, यासाठीही काही निकष मात्र गजेचे आहेत. 

इन्स्टाग्रामवरी कमाईचं गणित 

इन्स्टाग्रामवर ब्रँड स्पॉन्सरशिप हे कमाईचं मुख्य माध्यम असून फॉलोअर्स (Followers) ची संख्या मोठी असल्यास कंपन्या त्यांचे प्रोडक्ट प्रमोट करण्यासाठी अर्थात त्यांच्या प्रसिद्धीसाठी या अकाऊंटना प्राधान्य देतात. 

हेसुद्धा वाचा : NASA च्या दुर्बिणीनं टीपला ताऱ्यांचा जन्म होतानाचा क्षण; Photo भारावणारे... 

एफिलिएट मार्केटिंगच्या माध्यमातूनही इन्टाग्रामचा वापर प्रसिद्धीसाठी करता येतो. इथं प्रत्येक विक्रीवर अकाऊंट होल्डरला कमिशन मिळतं. इतकंच नव्हे, तर इन्स्टाच्या शॉपिंग फिचरवर युजर्सना त्यांची उत्पादनंही विकता येतात. 

युट्यूबवर काय आहे पैशांचं गणित? 

युट्यूब व्हिडीओवर येणाऱ्या जाहिरातीच्या माध्यमातून पैसे मिळण्यास सुरुवात होते. चॅनल सब्र्सक्राईब करणाऱ्यांना चॅनलकडून विशेष सेवा दिली जाते, जिथं त्यांना एक्सक्लुझिव्ह कंटेंट पाहता येतो. अनेक ब्रँड इन्स्टाग्रामप्रमाणे त्यांचे प्रोडक्ट प्रसिद्धीझोतात आणण्यासाठी युट्यूबर्सशी करारबद्ध होत इथंही मोठा आर्थिक व्यवहार चालतो. 

युट्यूब असो किंवा इन्स्टाग्राम. कोणत्याही माध्यमातून आपला कंटेंट प्रेक्षकांपर्यंत आणताना त्यामध्ये सातत्य राखलं जाणंही तितकंच महत्त्वाचं असून, याच सातत्याच्या बळावर वरील समाजमाध्यमांनी अनेकांना लोकप्रियतेच्या शिखरावर नेऊन ठेवलं आहे.