Sex After COVID Vaccine: लस घेण्याआधी जाणून घ्या...महिला-पुरुषांनी सेक्सच्या बाबतीत हे कटाक्षाने टाळावे

देशभरात कोरोना व्हायरसच्या संक्रमणाची दुसरी लाट आली आहे. ज्यात मृत्यू संख्या वाढली आहे. 

Updated: Apr 6, 2021, 07:35 PM IST
Sex After COVID Vaccine: लस घेण्याआधी जाणून घ्या...महिला-पुरुषांनी सेक्सच्या बाबतीत हे कटाक्षाने टाळावे

मुंबई : देशभरात कोरोना व्हायरसच्या संक्रमणाची दुसरी लाट आली आहे. ज्यात मृत्यू संख्या वाढली आहे. सध्या कोरोना व्हॅक्सीन देण्याचं काम देखील जोरात सुरु आहे. पण व्हॅक्सीनविषयी अनेक प्रश्न लोकांच्या मनात आहेत. सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे कोरोना व्हॅक्सिन घेतल्यानंतर, सेक्स करणे किती सुरक्षित आहे, तसेच कोरोना व्हॅक्सीन घेतल्यानंतर किती दिवसांनी सेक्स करणे योग्य असू शकतं, याविषयी वैद्यकीय क्षेत्रातील तज्ञांनी काही मतं मांडली आहेत.

गर्भवती महिला आणि जे काही दिवसातच मुल जन्माला घालण्याविषयी विचार करत असतील, त्यांनी लस घेण्याआधी एकदा तरी महिला डॉक्टरांचा सल्ला घ्यावा, गर्भवती महिलांनी लस घेऊ नये हे स्पष्ट आहे.

कोविड व्हॅक्सीनेशन घेतल्यानंतर सेक्स किती सुरक्षित?

सोशल मीडियावर सध्या कोविडशी संबंधित अनेक गंभीर विषयावर चर्चा सुरु आहेत. एक चर्चा ही कोव्हिड व्हॅक्सीनशी संबंधित आहे. देशात आतापर्यंत ७ कोटी लोकांना कोरोना व्हॅक्सीनचा डोस लावण्यात आला आहे. तरी देखील व्हॅक्सीन घेतल्यानंतर कोणत्या बाबतीत आणि कशी काळजी घ्यावी यावर चर्चा सुरुच आहे. 

सुरूवातीला कंडोमचा वापर केला पाहिजे

अजून केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने याविषयी कोणतीही अधिकृत गाईडलाईन जारी केलेली नाही. पण आरोग्याशी संबंधित काही तज्ञांच्या मते पहिल्या आणि दुसऱ्या डोसनंतर काही दिवस सेक्स दरम्यान कंडोमसारख्या गोष्टींचा वापर केला पाहिजे.

काही आठवड्यांपर्यंत काळजी घ्या

Indian Express मधील बातमीनुसार गाझियाबादमधील कोलंबिया आशिया हॉस्पिटलचे अंतर्गत औषधी विभागाचे प्रमुख डॉ. दीपक वर्मा यांनी याविषयी काही महत्त्वाचे मुद्दे मांडले आहेत. डॉ.वर्मा यांनी दिलेल्या माहितीनुसार, SARS-CoV2 एक नोवेल वायरस (Novel Virus) आहे. 

ही वॅक्सीन या व्हायरसला बेअसर करण्यासाठी बनवण्यात आली आहे, पण याचे दुरगामी परिणाम काय होतील याविषयी काहीही सांगता येणार नाही. हे देखील सांगणे कठीण आहे की, वॅक्सीन घेतल्यानंतर सेक्स केल्यावर संबंधित पुरुष आणि महिलेच्या आरोग्यावर किती परिणाम झाला आहे. पण व्हॅक्सीन घेतल्यानंतर साधारण महिनाभर कंडोमसारख्या साधनांचा वापर करा.

गर्भ निरोधक गोष्टींचा वापर करा

डॉ. दीपक यांनी आपला सल्ला कायम ठेवत कोव्हिड व्हॅक्सिनेशन (COVID Vaccination) केल्यानंतर २ ते ३ आठवडे कंडोम (Condom) सारख्या गर्भनिरोधक (Contraceptive)गोष्टींचा वापर करा.महिलांनी कोरोना व्हॅक्सीन घेण्याआधी महिला डॉक्टरचा सल्ला घ्यावा, तसेच पुढील प्लॅनिंगही विषयी देखील चर्चा करावी.