Tips to choose perfect ceiling fan for fome : एप्रिल महिन्यात देशातील बहुतांश भागाला पावसानं झोडपलं. तर, मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यातही ढगाळ वातावरण पाहायला मिळालं होतं. परिणामी महाराष्ट्रासह भारतातही तापमानाचा आकडा तुलनेनं कमीच नोंदवला गेला. मे महिनाही असाच पावसाळी जातोय का? असे प्रश्न उपस्थित होत असतानाच सूर्यदेवानं त्यांचं खरं रुप दाखवण्यास सुरुवात केली आणि पाहता पाहता उकाडा जाणवू लागला. बस्स, मग....? मग सर्वांनीच घरात असणाऱ्या सिलींग फॅनच्या रेग्युलेटरचा कान पिळण्यास सुरुवात केली. तुम्हीही त्यातलेच ना? 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

AC मुळं वाढणाऱ्या बिलाची चिंता नाही, किंवा मग कुलरमध्ये सतत पाणी ओतण्याची कटकट नाही. एक बटण दाबून पंखा सुरु केला की विषयच संपला. त्यामुळं अनेकजण घरात पंखा लावणं उत्तम समजतात. पण, तुम्हाला माहितीये का कोणताही पंखा आणून घरात लावला, म्हणजे प्रश्न सुटतो असं नाही. 


हेसुद्दा वाचा : उन्हाळा सुरू झाला रेsss; महाराष्ट्राच्या 'या' भागात Heat Wave चा यलो अलर्ट 


पंख्यांच्या कंपन्या, त्यांचे डिझाईन, आकार, रंग, त्यांची फिरण्याची क्षमता, मोटर पॉवर या सर्व गोष्टी पंखा खरेदी करण्यापूर्वीत लक्षात घेणं गरजेचं असतं. घराच्या कोपऱ्याकोपऱ्यापर्यंत हवा पोहोचवू शकेल अलाच पंखा निवडण्याकडे सर्वांचा कल असतो. पण, इथं बरेचजण चुकतात. कोणताही पंखा खरेदी करा, यामध्ये सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे पंख्याचं पातं. साधारणत: पंख्याला 3 पाती असतात. हल्लीकडे 4 आणि 5 पाती असणारे पंखेही बाजारात पाहायला मिळतात. 


चला जाणून घेऊया 3, 4 आणि 5 पातीच्या पंख्यांमधील फरक....


3 पातीचा पंखा हा कमी उपकरणांमध्ये कमाल वेगानं फिरतो. यामुळं वीजबिलावरही फार परिणाम होत नाही. हा पंखा फिरतो तेव्हा फार आवाजही होत नाही. त्यामुळं लहान घरांसाठी हा एक उत्तम पर्याय आहे. 


ज्या खोल्यांमध्ये AC आहे तिथं 4 पाती असणारा पंखा लावण्याचा निर्णय योग्य ठरतो. हवेला खोलीमध्ये समप्रमाणात पोहोचवण्याचं काम हा पंखा करतो. 3 पातींच्या पंख्याच्या तुलनेत हा 4 पातींचा पंखा हळू चालतो. 


3 आणि 4 पातींच्या पंख्यांच्या तुलनेत 5 पातींचा पंखा फिरताना आवाज करतो. पण, खोलीमध्ये हवा पसरवण्यासाठी तो अतिशय सुरेख काम करतो. या पंख्यांचे डिझाईन अतिशय लक्षवेधी असतात. सहसा मोठ्या घरांमध्ये बेडरूमसाठी या पंख्यांचा पर्याय उत्तम ठरतो. घराची शोभा वाढवण्याच्या हेतूनंही या पंख्यात अनेक डिझाईन्स पाहायला मिळतात.