)
Prepaid Mobile Recharge : प्रत्येक महिन्याला रिचार्ज करणे हा एक धोक्याला त्रास आहे, मागील काही दिवसांमध्ये मोबाईल रिचार्जचे प्लॅन्स देखील महागले आहेत. त्यामुळे कोणता रिचार्ज आपल्या खिशाला परवडणार आहे हे आपल्याला रिचार्ज करताना परवडत नाही. आज तुमच्यासाठी तुमच्या खिशाला परवडणारे प्लॅन्स घेऊन आलो आहोत हे प्लॅन्स तुमच्या खिशाला परवडणारे तर आहेतच त्याचबरोबर तुम्हाला प्रत्येक महिन्याला रिचार्ज करायची गरज पडणार नाही. कमी किमतीत दीर्घ वैधता देणारे काही प्रीपेड प्लॅन्स उपलब्ध आहेत. यापैकी काही प्लॅन्स 150 ते 180 दिवस चालतील यामध्ये तुम्हाला कॉलिंग, डेटा आणि एसएमएससारखे फायदेही मिळतील. कोणते पाच प्लॅन्स आहेत जे तुम्हाला फायदेशीर आहेत यासंदर्भात जाणून घ्या.
बीएसएनएलच्या 165 दिवसांच्या प्लॅनबद्दल तुम्हाला माहिती आहे का? बीएसएनएल 897 रुपयांमध्ये 165 दिवसांता प्रीपेड प्लॅन देत आहे, यामध्ये वापरकर्त्यांना सर्व नेटवर्क्सवर अनलिमिटेड कॉलिंग, एकूण 24 जीबी डेटा आणि प्रति दिन 100 एसएमएस मिळणार आहेत. डेटा संपल्यानंतर इंटरनेटचा वेग 40 केबीपीएस पर्यंत कमी होतो.
बीएसएनएलच्या 997 रुपयांच्या प्लॅनमध्ये तुम्हाला 150 दिवस वैधता असणार आहे, या प्लॅनमध्ये वापरकर्त्यांना दररोज 2 जीबी डेटा मिळणार आहे. एवढेच नाही तर या प्लॅनमध्ये अनलिमिटेड कॉलिंग आणि दररोज 100 एसएमएस देखील असणार आहेत आणि डेटा मर्यादा संपल्यावर, स्पीड 40 केबीपीएस पर्यंत कमी होतो.
हे ही वाचा
वीआयचे काही प्लॅन बरेच महाग आहेत, हा प्लॅनदेखील 1000 रुपयांच्या प्लॅनपेक्षा महाग आहे पण याची वैधता ही 180 दिवस आहे. यामध्ये वापरकर्त्यांना कोणते फायदे मिळणार आहेत, यासंदर्भात जाणून घ्या. या प्लॅनमध्ये सर्व नेटवर्क्सवर अनलिमिटेड कॉलिंग, एकूण 15GB डेटा आणि 1800 SMS ची सुविधा मिळणार आहे. महत्वाचे म्हणजे डेटा संपल्यानंतर, प्रति MB 50 पैसे शुल्क आकारले जाते.
जिओचा 899 रुपयांचा खास प्लॅन आहे, तो तुमच्या मोबाईलमध्ये 90 दिवस चालेल. यामध्ये तुम्हाला प्रत्यके दिनी 2 जीबी डेटा आणि त्याव्यतिरिक्त 20 जीबी डेटा मिळणार आहे. एवढेच नाही तर तुम्हाला यामध्ये अनलिमिटेड कॉलिंग आणि दररोज 100 एसएमएसची सुविधाही उपलब्ध असणार आहे. या प्लॅनमध्ये वापरकर्त्यांना अनलिमिटेड 5जी डेटा, जिओहॉटस्टार, जिओटीव्ही, जिओ एआय क्लाउड आणि गूगल जेमिनी प्रो यांसारख्या सुविधांचाही मिळणार आहेत, त्यामुळे ग्राहकांना त्याचा मोठा फायदा होणार आहे.
जिओने एक प्रीमियम प्लॅन सुरु केला आहे, यामध्ये वापरकर्त्यांना जास्त फायदे मिळणार आहेत. वापरकर्त्यांना 999 रुपयांच्या प्लॅनमध्ये कोणकोणते फायदे मिळणार यासंदर्भात सविस्तर जाणून घ्या. जिओने प्रीमियम प्लॅनमध्ये वापरकर्त्यांना अनलिमिटेड कॉलिंग आणि दररोज 100 एसएमएस त्याचबरोबर 2 जीबी डेटा म्हणजेच एकूण 196 जीबी डेटा वापरकर्त्यांना मिळणार आहे. या प्रिमियर प्लॅनमध्ये अनलिमिटेड ५जी डेटा, जिओहॉटस्टार, जिओटीव्ही, जिओ एआय क्लाउड आणि गूगल जेमिनी प्रो चा ॲक्सेस देखील उपलब्ध आहे, डेटा मर्यादा संपल्यानंतर, स्पीड 64 केबीपीएस पर्यंत कमी होतो.