)
BHIM UPI Payment's New Feature: भारतातील कोट्यवधी नागरिक यूपीआयचा वापर आपल्या दैनंदिन जीवनात आर्थिक व्यवहारांसाठी करतात. किरकोळ सामानापासुन तर मोठमोठ्या खरेदीपर्यंत यूपीआयचा वापर केला जातो. डिजिटल पेमेंटच्या जगात भारताने आणखी एक मोठी झेप घेत एक नवा फिचर आणला आहे. या फीचरच्या मदतीने तुम्ही कोणत्याही विश्वासू व्यक्तीला जसे की कुटुंबातील सदस्य किंवा मित्र यांना आपल्या खात्यातुन पेमेंट करण्याची परवानगी देऊ शकता.
खासगी माहिती राहील अगदी सुरक्षित
या नव्या फिचरअंतर्गत वापरकर्ते इच्छित असल्यास पेमेंट लिमिट सेट करू शकता किंवा प्रत्येक पेमेंटसाठी तुमची मंजुरी निश्चित करु शकता. महत्त्वाची बाब म्हणजे इतर सर्व नियंत्रण हे तुमच्याच हातात राहते आणि दुसऱ्या व्यक्तीला तुमच्या बँक खात्याची माहिती दिसत नाही.
हा फीचर वृद्ध, घरातील सदस्य किंवा ज्यांच्याकडे स्वतःचं UPI नाही अशा लोकांसाठी फारच उपयोगी ठरेल. त्यामुळे ते सहजपणे डिजिटल व्यवहार करू शकतील, आणि त्यासाठी स्वतंत्र खाते असण्याची गरज भासणार नाही.
इतकी सोपी आहे फिचर वापरण्याची पद्धत
1. BHIM UPI अॅप सुरू करा / लॉगईन करा.
2. मेन्यू किंवा होम स्क्रीनवर “UPI Circle” फीचर दिसेल त्यावर टॅप करा.
3. “Add Family or Friends” वर क्लिक करून फोन नंबर, UPI ID किंवा QR कोडद्वारे व्यक्ती जोडा.
4. “Spend with Limit” किंवा “Approval Required” यापैकी एक पर्याय निवडा.
5. रक्कम, कालावधी आणि खाते निवडा आणि UPI PIN टाकून confirm करा.
गरज पडल्यास तुम्ही त्या व्यक्तीची लिमिट बदलू शकता किंवा अॅक्सेस हटवू शकता.
BHIM UPI Circle मुळे आता डिजिटल पेमेंट आणखी सोपं, सुरक्षित आणि सर्वांसाठी उपलब्ध झालं आहे!
FAQ
1. UPI Circle म्हणजे काय?
UPI Circle हे BHIM UPI अॅपमधील नवे फीचर आहे, ज्यामुळे तुम्ही विश्वासू व्यक्तींना (जसे कुटुंबातील सदस्य किंवा मित्र) तुमच्या बँक खात्यावरून पेमेंट करण्याची परवानगी देऊ शकता. यामुळे बँक खात्यात पैसे नसले तरीही (स्वतःच्या खात्याशिवाय) ते डिजिटल पेमेंट करू शकतात.
3. कोण वापरू शकते हे फीचर?
प्रायमरी यूजरला UPI लिंक्ड बँक खाते असावे लागते. सेकंडरी यूजरला UPI खाते नसले तरी चालते – ते फक्त BHIM अॅप डाउनलोड करून तुमचा UPI ID लिंक करू शकतात. कमाल ५ सेकंडरी यूजर्स जोडता येतात.
4. सुरक्षित आहे का?
होय! सेकंडरी यूजरला तुमचे बँक तपशील दिसत नाहीत. तुम्ही लिमिट सेट करू शकता, प्रत्येक व्यवहारासाठी मंजुरी घेऊ शकता आणि कधीही अॅक्सेस कॅन्सल करू शकता. SMS अलर्ट आणि रिअल-टाइम ट्रॅकिंग उपलब्ध.