More Than One Crore Earning To Homeless Man: कोणाचं नशीब कसं बदलू शकतं सांगता येत नाही. अर्थात अशा वाक्याने सुरु होणाऱ्या अनेक सकारात्मक बातम्या तुम्ही यापूर्वी वाचल्या असतील. मात्र आज आपण अशा एका व्यक्तीबद्दल बोलणार आहोत ज्याचा या वाक्याला साजेसा उलटा प्रवास झाला आहे. म्हणजेच महिन्याला लाखो रुपये कमवणाऱ्या या व्यक्तीवर आता अचानक छोटी-मोठी काम करुन दोन वेळेच्या जेवणाची सोय करण्याची वेळ आली आहे. धक्कादायक बाब म्हणजे भविष्यात हे तुमच्यासोबतही होऊ शकतं असा इशारा या व्यक्तीने दिलाय. त्याच्यासोबत नेमकं घडलंय काय जाणून घेऊयात...
एकेकाळी फेसबुकची मातृक कंपनी असलेल्या मेटाव्हर्स कंपनीमध्ये महिन्याला 10 लाख रुपयांपेक्षा अधिक पगार असलेल्या व्यक्तीचं नाव आहे शॉन! शॉनचा वार्षिक पगार दीड लाख अमेरिकी डॉलर्स म्हणजेच भारतीय चलनानुसार वर्षाला 1 कोटी 28 लाख रुपये इतका होता. सॉफ्टवेअर इंजनिअर असलेला शॉन आज 42 वर्षांचा असून सध्या तो एका ट्रकमध्येच वास्तव्यास आहे. तो सध्या जगण्यासाठी फूड डिलेव्हरी बॉय आणि ई-बेवर वस्तू विकण्याची कामं करतो. शॉनला माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात दोन दशकांहून अधिक काळाचा अनुभव असूनही त्याला एप्रिल 2024 मध्ये अचानक नोकरीवरुन काढून टाकण्यात आलं.
तेव्हापासून म्हणजेच मागील 15 महिन्यांपासून शॉन नोकरीच्या शोधात आहे. त्याने या 15 महिन्यांमध्ये 800 हून अधिक कंपन्यांमध्ये नोकरीसाठी अर्ज केला असून त्याला मुलाखतीसाठी 10 हूनही कमी कॉल आले आहेत. अनेक ठिकाणी एआय रोबोट्सच्या माध्यमातून छाणणी करताना त्याला ऑफर न देताच त्याचा अर्ज वगळला जातोय.
नक्की वाचा >> दिवसाचा पगार 22 लाख रुपये, 23 कोटी TVP.. भारतातील सर्वात श्रीमंत कर्मचारी; ही व्यक्ती आहे कोण? काय काम करते?
शॉन त्याच्यावर ही वेळ येण्यासाठी जनरेटिव्ह एआयची अल्पावधीत झालेली वाढ कारणीभूत असल्याचं सांगतो. एआय तंत्रज्ञान आयटी क्षेत्रामध्ये एआय मानवी प्रतिभेला पूर्णपणे रिप्लेस करत असल्याचं शॉनचं मत आहे. स्वतःला 'एआय मॅक्सिमलिस्ट' म्हणवणारा शॉन तत्वतः टेक्नोलॉजिचा वापर झाला पाहिजे अशा मताचा आहे. मात्र सध्या ज्या पद्धतीने तंत्रज्ञान वापरलं जातंय त्यावर त्याचा आक्षेप आहे. एआयचा वापर लोकांच्या क्षमता वाढवण्याऐवजी त्यांच्या जागी पर्याय शोधण्यासाठी केला जात आहे. "एआयमुळे निर्माण झालेली नोकऱ्यांमधील सध्याची शांतता ही अधिक खोलवर परिणाम करणारी आणि भयानक आहे," असं शॉनने 'फॉर्च्यून'ला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं आहे. एकेकाळी नावीन्यता आणि वेगवेगळ्या संधींसाठी ओळखल्या जाणाऱ्या क्षेत्रातील वाढत्या बेरोजगारीसाठी एआयचा वाढता प्रभाव कारणीभूत असल्याचं शॉनचं म्हणणं आहे.
मेटाव्हर्ससारख्या ट्रेंडिंग तंत्रज्ञानावर आता एआयचा प्रभाव वाढताना दिसतोय, असं निरिक्षण शॉनने नोंदवलं आहे. कंपन्या कर्मचाऱ्यांना कामावर कायम ठेवण्याऐवजी खर्च कमी करण्याला प्राधान्य देत आहेत. शॉनचा असा विश्वास आहे की कॉर्पोरेट धोरणांमध्ये दूरदृष्टीचा आभाव आहे. एआयच्या माध्यमातून आहे त्या कर्मचारी संख्येत नवीन उपक्रम राबवण्याऐवजी लोकांना नोकऱ्यांवरुन काढून टाकण्यावर अधिक लक्ष केंद्रित करत आहेत, असं शॉन सांगतो. "आज मी ज्या ठिकाणी, उद्या तिथे बरेच जण असतील," अशा इशाराही शॉनने दिला आहे.
मागील 15 महिन्यांमध्ये अनेक आर्थिक अडचणींचा सामना करत असलेला शॉन उत्पन्नाचे नवीन मार्ग शोधत आहे. शॉन सध्या टेक्निकल सर्टिफिकेशन अथवा कमर्शिअल ड्रायव्हिंग लायसन्ससारख्या माध्यमातून ठराविक रक्कम महिन्याच्या शेवटी हाती पडेल अशी नोकरी शोधत आहे. आपल्याकडे असलेलं कौशल्य अधिक वाढवण्यासाठी किंवा ते पॉलिश करण्यासाठी आवश्यक असलेलं शिक्षण घेण्यासाठी त्याला सध्या पैशांची कमतरता भासत आहे.

शॉनबरोबर जे काही घडलं आहे ती त्याची एकट्याची गोष्ट असली तरी भविष्याच्या दृष्टीने इशारा देणारी आहे. जबाबदारपणे कामाच्या ठिकाणी केलेलं जबाबदारीचं नियोजन आणि मानवाला केंद्रस्थानी ठेऊन संतुलित विकासाचा विचार न करता एआयवर भर दिल्यास निर्माण होणारं असंतुलन हे बेरोजगारीची समस्या अजून गंभीर करु शकतं, हे उदाहरणातून स्पष्ट होत आहे.
स्वप्निल घंगाळे हे मागील 12 वर्षांहून अधिक काळापासून डिजिटल पत्रकारितेमध्ये सक्रीय आहेत. 'महाराष्ट्र टाइम्स', 'लोकसत्ता' यासारख्या नामांकित कंपन्यांमध्ये त्यांनी यापूर्वी काम केलेलं आहे. राजकीय बातम्यांबरोबरच ताज्या घडामोडी, ट्रेण्डींग/ व्हायरल, टेक्नोलॉजी, क्रीडा, मनोरंजन अशा सर्वच क्षेत्रातील बातम्यांमध्ये हातखंडा आहे. अवांतर वाचनाबरोबरच बातम्यांव्यतिरिक्त सोशल मीडियावर लिहायची आवड आहे. फावल्या वेळात चित्रपट पाहणे, भटकंती करायला आवडतं. बातमी अचूक असावी असा त्यांचा कटाक्षाने प्रयत्न असतो. सध्या ते 'झी 24 तास'मध्ये 'डेप्युटी न्यूज एडिटर' म्हणून कार्यरत आहेत.
...Read More
LIVE|
NZ
0/0(0 ov)
|
VS |
SA
|
| Full Scorecard → | ||
|
CYP
(20 ov) 136/8
|
VS |
AUT
140/3(16.3 ov)
|
| Austria beat Cyprus by 7 wickets | ||
| Full Scorecard → | ||
|
OMA
(20 ov) 136/8
|
VS |
NEP
140/3(16.3 ov)
|
| Match Postponed | ||
| Full Scorecard → | ||
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.