)
Mobile Charging: आजकाल स्मार्टफोन हा आपल्या आयुष्याचा अविभाज्य घटक बनला आहे. मनोरंजन असो किंवा ऑफिसचं काम चुटकीसरशी स्मार्टफोनच्या माध्यमातून केले जाते. मात्र अनेकदा लोक स्मार्टफोन वापरण्यात चुक करतात त्याचा परिणाम खतरनाक होऊ शकतो. अशातच काहीजण फ्रीजच्यावर स्मार्टफोन चार्जिंगसाठी ठेवतात. सुरुवातीला ही एक सामान्य बाब जाणवू शकते. मात्र यामुळं घराची सुरक्षा धोक्यात येऊ शकते. फ्रीजच्या वर स्मार्टफोन चार्जिंग करण्यासाठी का ठेवू नये, हे जाणून घेऊया.
फ्रीजच्यावर फोन चार्जिंगसाठी का ठेवू नये?
फ्रीजच्यावरील तापमान सातत्याने गरम असते. जेव्हा फ्रीज कुलिंग करत असतो तर त्याच्या मागचा हिस्सा आणि वरच्या बाजूचे तापमान खूप अधिक असते. अशावेळी जेव्हा तुम्ही चार्जिंगसाठी मोबाईल तिथे ठेवताय तर त्याचा परिणाम बॅटरीवर होऊ शकतो. फोन चार्जिंगला लावल्यानंतर बॅटरीचे तापमान सर्वसाधारणपणे वाढते अशातच फ्रीजचे तापमानही वाढलेले असेल तर अशावेळी ब्लास्ट होण्याची किंवा आग लागण्याचा धोका वाढू शकतो.
रिपोर्ट्सनुसार, मोबाईलची बॅटरी सुरक्षित ठेवण्यासाठी नेहमी वेंटिलेशन असलेल्या ठिकाणीच फोन चार्ज करण्यासाठी ठेवा. फ्रीज, टिव्ही, इन्व्हर्टर किंवा कोणत्याही इलेक्ट्रॉनिक डिव्हाईसच्यावर फोन चार्जिंग करण्यासाठी ठेवणे हे सुरक्षेच्या दृष्टीने धोकादायक आहे. कारण या उपकरणातून निघाणारे तापमानामुळं मोबाईलच्या बॅटरी परफॉर्मन्सवर फरक पडू शकतो आणि बॅटरीची क्षमतादेखील कमी होते.
या व्यतिरिक्त अनेक लोक मोबाईल चार्जिंगला लावून विसरून जातात. किंवा तासनतास तो मोबाईल तिथेच असतो. यामुळं ओव्हरचार्जिंगचा धोका वाढतो. ओव्हरचार्जिंग आणि पृष्ठभागाचे तापमान अधिक असल्याने बॅटरीला नुकसान पोहोचू शकते आणि त्यामुळं शॉर्ट सर्किट किंवा ब्लास्ट होऊ शकतो. अशा घटना अनेकदा घडल्या असून यामुळं घरात आग लागल्याचेही उदाहरण समोर आले आहेत.
मोबाईल चार्जिंगला लावताना तो नेहमी रुम टेंपरेचरवर ठेवावा. चार्जिंगला ठेवताना फोन कधीच गादी, उशी किंवा कपड्याच्या खाली ठेवू नये. यामुळं बॅटरीच्या क्षमतेवर परिणाम होऊ शकतो. तसंच, बनावट चार्जरचा वापर अजिबात करु नये. बनावट चार्जरला योग्य व्हॉल्टेज पोहोचत नाही त्यामुळं बॅटरी खराब होऊ शकते.
(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)