iphone पेक्षा कमाल? चंद्राचा अगदी स्पष्ट फोटो काढणारा 200 मेगापिक्सल कॅमेराचा 'हा' स्मार्टफोन भारतात कधी होणार लाँच?

Tech News : प्रतीक्षा संपली... आयफोनला पिछाडीवर टाकत दमदार फोटोग्राफीसाठी लोकप्रिय ठरणारा हा फोन, भारतात कधी लाँच होणार... तारीख ठरली...  

सायली पाटील | Updated: Mar 3, 2025, 02:06 PM IST
iphone पेक्षा कमाल? चंद्राचा अगदी स्पष्ट फोटो काढणारा 200 मेगापिक्सल कॅमेराचा 'हा'  स्मार्टफोन भारतात कधी होणार लाँच?
mobile Xiaomi 15 Ultra Launched Date features specifcations price

Tech News : आयफोन... अगदी कॅमेरासारखे सुस्पष्ट फोटो काढण्याचं स्वातंत्र्य हा फोन देतो आणि यासोबतच फोनमध्ये काही असे फिचर्सही युजरना मिळतात जे स्मार्टफोन वापरण्याचा अनुभवच बदलतात. आतापर्यंत आयफोनला टक्कर देणारे अनेक स्मार्टफोन बाजारात दाखल झाले. पण, त्यातही सर्वांनाच यश लाभलं असं नाही. असं असलं तरीही एक फोन मात्र इथं अपवाद ठरू शकतो. अर्थात आयफोनला टक्कर देऊ शकतो. 

शंभर दिडशे नव्हे तर तब्बल 200 मेगापिक्सल इतका कमाल कॅमेरा असणारे दोन स्मार्टफोन भारतात लवकरच लाँच केले जाणार आहेत. Xiaomi 15 आणि Xiaomi 15 Ultra असे हे स्मार्टफोनचे मॉडेल असून बार्सिलोना इथं सुरु असणाऱ्या मोबाइल वर्ल्ड काँग्रेस (MWC) 2025 मध्ये हा स्मार्टफोन लाँच करण्यात आला. ज्यानंतर कंपनीनं सोशल मीडियाच्या माध्यमातून हा स्मार्टफोन भारतात नेमका कधी लाँच केला जाणार याचीसुद्धा माहिती दिली. 

फिचर्स आणि किंमत पाहूनच घ्या... 

जागतिक स्तरावर Xiaomi 15 Ultra या फोनची किंमत दोन प्रकारच्या मेमरी स्टोरेजवर आधारित आहे. यामध्ये 16GB जीबी रॅम आणि 512GB स्टोरेज असणाऱ्या बेस मॉडेलची किंमत EUR 1,499 (जवळपास 1,36,100 रुपये)  इतकी असेल असा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे. भारतातही फोनची हीच किंमत असेल असंही सांगण्यात येत आहे. 

Xiaomi 15 Ultra 6.73  इंच WQHD+ क्वाड कर्व्ड LTPO AMOLED डिस्प्ले आणि 120Hz रिफ्रेश रेटसह उपलब्ध करून देण्यात आला असून, या फोनची 5,410mAh बॅटरी  90W  वायर्ड तर, 80W वायरलेस चार्जिंगला सपोर्ट करेल. 

हेसुद्धा पाहा : Champions Trophy 2025 : 'रोहित खेळाडू म्हणून जाडा असून त्याने...' काँग्रेसच्या महिला प्रवक्त्यांची कर्णधारावर पातळी सोडून टीका!

दमदार कॅमेरा सेटअप ही या मोबाईलची जमेची बाजू. हा कॅमेरा इतका कमाल, की कैक मैल दूर असणाऱ्या आभाळातील चंद्राचा फोटोसुद्धा अगदी सहजपणे आणि तितच्याच स्पष्ट रुपात टीपला जाऊ शकतो. 

शाओमीच्या या स्मार्टफोनला 1 इंच टाइप LYT-900 सेंसरसह 50 मेगापिक्सलचा प्रायमरी शूटर, 50-मेगापिक्सलचा अल्ट्रावाइड सेंसर, 3x ऑप्टिकल झूमसह 50-मेगापिक्सलचा सोनी IMX858 टेलिफोटो कॅमेरा 4.3x ऑप्टिकल झूमसह 200 मेगापिक्सलचा ISOCELL HP9 पेरिस्कोप टेलीफोटो कॅमेरा देण्यात आला आहे. ज्यामुळं हा फोन सॅमसंग आणि आयफोनला टक्कर देईल यात वाद नाही.