मोटोरोलाच्या One Power स्मार्टफोनचे फिचर्स लीक

...

Updated: Jun 9, 2018, 03:28 PM IST
मोटोरोलाच्या One Power स्मार्टफोनचे फिचर्स लीक title=
File Photo

मुंबई : Motorola कंपनीच्या One Power या स्मार्टफोनचे स्पेसिफिकेशन लीक झाल्याचं वृत्त समोर येत आहे. हे स्पेसिफिकेशन एका शीटवर आहेत ज्यावर One Power या स्मार्टफोनचा उल्लेख आहे. पाहूयात काय आहेत One Power स्मार्टफोनचे फिचर्स...

प्रसारमाध्यमांमध्ये आलेल्या वृत्तानुसार, One Power या स्मार्टफोनमध्ये 6.2 इंचाचा फुल एचडी + डिस्प्ले देण्यात आला आहे. स्नॅपड्रॅगन 636 प्रोसेसर, 4GB रॅम आणि 64 GB स्टोरेज देण्यात आला आहे. यापूर्वी आलेल्या वृत्तानुसार, One Power फोनमध्ये नॉच असल्याचं बोललं जात होतं तसेच सेल्फी आणि इतर सेंसर असल्याचं म्हटलं होतं.

कॅमेऱ्याचा विचार करता या फोनमध्ये ड्युअल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. या फोनमध्ये 12+5 MP कॅमेरा देण्यात आला आहे. फ्रंट कॅमेरा 8 MP चा आहे. तर या फोनमध्ये 3780 mAh ची बॅटरी देण्यात आली आहे. हा स्मार्टफोन टर्बो चार्जिंग सपोर्ट करेल. 

One Power या स्मार्टफोनच्या किंमती संदर्भात अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाहीये. मात्र, येत्या तीन महिन्यांत हा फोन बाजारात लॉन्च होणार असल्याचं बोललं जात आहे.

One Power या फोनमध्ये ड्युअल रियर कॅमेरा सेटअप आणि फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आलं आहे. त्यासोबतच फोनमध्ये बॅटविंग लोगो देण्यात आला आहे. ड्युअल रियर कॅमेरा अॅपल आयफोन एक्स प्रमाणे वर्टिकल आकारात असणार आहे. तसेच फोनच्या खालील बाजूला स्पीकर ग्रील आणि यूएसबी टाईप-सी असल्याचं बोललं जात आहे.