ट्रायकडून एअरटेल डीटीएच कंपनीला नोटीस

याचा मोठा फटका केबल ऑपरेटर आणि डीटीएच कंपन्यांना बसला आहे.

Updated: Feb 8, 2019, 11:38 AM IST
ट्रायकडून एअरटेल डीटीएच कंपनीला नोटीस

नवी दिल्ली: भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणकडून (ट्राय) एअरटेल डीटीएच कंपनीला नोटीस पाठविण्यात आली आहे. १ फेब्रुवारीपासून ट्रायने दूरसंचार नियमात बदल केला आहे. मात्र, नव्या नियमामुळे ग्राहकांची गैरसोय होत असल्याचे एअरटेल डीटीएच कंपनीचे म्हणणे आहे. ग्राहकांना डीटीएच आणि केबल ऑपरेटरला गरजेपेक्षा जास्त पैसे द्यावा लागत असल्याचे ट्रायच्या लक्षात आले. त्यामुळे ट्रायने या संदर्भात नवीन नियम लागू करण्याचे निर्णय घेतला. या नियामामुळे ग्राहकांना त्यांच्या आवडीचे टीव्ही चॅनल निवडण्याचे पर्याय उपलब्ध झाला आहे.

याआधी ग्राहकांना केबल किंवा डीटीएचची सेवा पुरवणाऱ्या कंपन्यांना दरमहा ३०० ते ४५० रुपये मोजावे लागत होते. यामध्ये ग्राहकांना नको असलेल्या टीव्ही चॅनलचाही समावेश असायचा. ट्रायच्या नव्या नियमामुळे ग्राहकांना त्यांच्या आवडीचे चॅनल निवडता येणार आहे. ग्राहकांना १३० रुपये + निवडलेल्या टीव्ही चॅनलचे पैसे द्यावा लागणार आहेत.  ग्राहकांना नको असलेल्या चॅनलचे पैसे देण्याची गरज भासणार नाही. त्यामुळे याचा मोठा फटका केबल ऑपरेटर आणि डीटीएच कंपन्यांना बसला आहे. परंतु, या नव्या नियमामुळे ग्राहकांची गैरसोय होत असल्याचे विधान करणाऱ्या एअरटेल कंपनीला ट्रायने नोटीस पाठवली आहे. तसेच या नियमांमुळे ग्राहकांना काय अडचण निर्माण होत आहे? याची संपूर्ण माहिती देण्याचा आदेश ट्रायने एअरटेल कंपनीला दिला आहे. सुरुवातीला डीटीएच आणि केबल ऑपरेटर यांनी या नियमाच्या विरोधात आवाज उठवला होता. परंतु ट्रायने डीटीएच आणि केबल सेवा देणाऱ्यांचा युक्तिवाद फेटाळून लावला होता.