Emergency Alert System Test : केंद्र सरकारने सेल ब्रॉडकास्ट सिस्टीम सुरु केली आहे याचा अर्थ अशा की जेव्हा कधी भूकंप, पूर, चक्रीवादळ किंवा सुरक्षेचा धोका यांसारखी मोठी आपत्ती नागरिकांना अलर्ट दिला जाईल, पण हे सिस्टीम कसे काम करते यासंदर्भात सविस्तर जाणून घ्या.

Emergency Alert System Test : केंद्र सरकारने 'सेल ब्रॉडकास्ट सिस्टीम'ची घोषणा केली तेव्हापासून अनेकांमध्ये भितीचे वातावरण आहे. अनेकांचे अलार्म वाजले तर काही मोबाईलचे अलार्म वाजलेच नाही. या लेखामध्ये तुम्हाला सेल ब्रॉडकास्ट सिस्टीम नक्की काय आहे? हे कसे काम करते जर कमी नेटवर्क असल्यास तुमचा अलार्म वाजेल का? याबद्दल माहिती देणार आहोत. केंद्र सरकारने सेल ब्रॉडकास्ट सिस्टीम सुरु केली आहे याचा अर्थ अशा की जेव्हा कधी भूकंप, पूर, चक्रीवादळ किंवा सुरक्षेचा धोका यांसारखी मोठी आपत्ती आल्यास, तेव्हा तुम्हाला सरकारकडून थेट तुमच्या फोनवर एक मोठा आपत्कालीन इशारा पाठवण्यात येईल. पण जेव्हा तुम्ही एखाद्या अशा ठिकाणी असाल जेथे तुम्हाला अजिबात नेटवर्क नसेल त्याठिकाणी तुम्हाला हा इशारा मिळणार का?
केंद्र सरकारच्या "सेल ब्रॉडकास्ट सिस्टीम"चे वैशिष्ट्ये सविस्तर सांगायचे झाले तर हा इशारा म्हणजेच आपत्कालीन संदेश प्रणाली कुठे काम करणार नाही, ते जाणून घ्या. जेव्हा तुमच्या मोबाईलला अजिबात सिग्नल/नेटवर्क नसेल किंवा तुम्ही तुमचा मोबाईल बंद केला असले तर तुम्हाला अलर्ट मिळणार नाही. त्याचबरोबर जर तुमचा मोबाईल नेटवर्कमध्ये नसल्यास तुम्हाला अलर्टचा इशारा मिळू शकणार नाही. जर तुमच्या मोबाईलमध्ये जुने फिचर किंवा तुमचा मोबाईल जुना असेल तर या इशारा मिळणार नाही. फोनमध्ये जर तुम्ही एखादी सेटिंग केली असल्यास म्हणजेच सेटिंग्जमध्ये इमर्जन्सी अलर्ट्स मॅन्युअली बंद केले असेल तर अलर्ट पोहोचणार नाही.
हे ही वाचा
केंद्र सरकारने भविष्याचा विचार करत ही सेवा सुरु केली आहे, सर्वसामान्य जनतेकडून ही सेवा नियमितपणे वापरली जाणारी सेवा आहे. जर कधी भूकंप, पूर, चक्रीवादळ किंवा कोणताही सुरक्षेचा धोका निर्माण झाल्या हा थेट फोन तुम्हाला सरकार आपत्कालीन इशारा पाठवणार आहे. त्यामुळे हे एक प्रभावी साधन मानले जात आहे.
या सिस्टीमचा मोठा फायदा नागरिकांना होऊ शकतो. यासाठी इंटरनेट कनेक्शन किंवा विशेष ॲपची गरज नाही, ही सिस्टीम थेट टॉवर्सवरून संपूर्ण परिसरामध्ये प्रसारित केले जाते. त्यामुळे जर तुम्हाला नेटवर्क जरी स्लो असल्यास तरिही तुम्हाला हा इशारा दिला जाणार आहे. या सिस्टीमचा मोबाईल नंबरशी कोणताही संबंध नाही जर तुमच्या मोबाईलमध्ये कोणतेही सिम कार्ड नसल्यास आपत्कालीन सूचना तुमच्या फोनवर येतील.