close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

OnePlus 7T Pro सेल ऑफर्ससह विक्रीसाठी उपलब्ध

आजपासूनच या फोनची खरेदी करता येऊ शकते

Updated: Oct 12, 2019, 02:56 PM IST
OnePlus 7T Pro सेल ऑफर्ससह विक्रीसाठी उपलब्ध

मुबंई : OnePlus ने नुकताच OnePlus 7T Pro लॉन्च केला. आजपासून भारतात हा फोन विक्रीसाठी उपलब्ध झाला आहे. आजपासूनच या फोनची खरेदी करता येऊ शकते. हा कंपनीचा फ्लॅगशिप स्मार्टफोन आहे. 

OnePlus 7T Pro sale - 

वन प्लस ७ टी प्रो (OnePlus 7T Pro) आज दुपारी १२ वाजल्यापासून वन प्लसच्या अधिकृत वेबसाइटवर आणि अॅमेझॉन इंडियावर विक्रीसाठी उपलब्ध करण्यात आला आहे. 

या फोनच्या एका  वेरिएन्टची किंमत ५३ हजार ९९९ रुपये इतकी आहे. याशिवाय हा स्मार्टफोन केवळ एका Haze Blue रंगात खरेदी करता येणार आहे. 

OnePlus ने OnePlus 7T Pro चं खास McLaren Edition लॉन्च केलं आहे. या फोनची किंमत ५८ हजार ९९९ हजार रुपये इतकी आहे. हा फोन ५ नोव्हेंबरपासून विक्रीसाठी उपलब्ध होणार आहे.

OnePlus 7T Pro सेल ऑफर्स - 

हा फोन खरेदी करताना एचडीएफसी (HDFC)बँकेच्या कार्डवर रक्कम भरल्यास ३ हजार रुपयांचा इन्स्टंट डिस्काउंट मिळणार आहे. याशिवाय अन्य कार्डवर १५०० रुपयांचा डिस्काउंट मिळणार आहे. फोन नो कॉस्ट इएमआयवरही खरेदी करता येऊ शकतो.

OnePlus 7T Pro काय आहेत वैशिष्ट्ये - 

- ६.६७ इंची डिस्प्ले

- ऑक्टा कोर क्वॉलकॉम स्नॅपड्रगन ८५५ प्लस प्रोसेसर (octa-core Qualcomm Snapdragon 855 Plus Processor)

- ८ जीबी रॅम

- २५६ जीबी इंटरनल स्टोरेज

- ४०८५ mAh बॅटरी बॅकअप

- अॅन्ड्रॉइड १० ऑपरेटिंग सिस्टम (Android 10 Operating system)

- ४८ मेगापिक्सल + १६ मेगापिक्सल + ८ मेगापिक्सल ट्रिपल रियल कॅमेरा सेटअप

- १६ मेगापिक्सल पॉप-अप सेल्फी कॅमेरा