मुंबई : OnePlus 9 5G Offers |  जर तुम्हाला OnePlus ब्रँडचा फ्लॅगशिप फोन घ्यायचा असेल, तर OnePlus 9 5G फोन सध्या लॉन्च किंमतीपेक्षा 12 हजारने स्वस्त मिळतोय. पॉवरफुल चिपसेटसह येणारा हा फोन 30 हजारांपेक्षा कमी किंमतीत कसा खरेदी करू शकता.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हँडसेट मेकर कंपनी OnePlus  चा  OnePlus 9 5G ब्रँडचा फ्लॅगशिप स्मार्टफोन बाजारात आला आहे. जर तुम्ही या स्मार्टफोनला स्वस्तात खरेदी करू इच्छित असाल तर, तुमचं स्वप्न पूर्ण होऊ शकतं. तुम्ही या स्मार्टफोनला 30 हजार रुपयामध्येही खरेदी करू शकता. वन प्लस 9 5G ची किंमत फीचर्स आणि फोनसोबत मिळणारे ऑफर्सबाबत जाणून घेऊया...


OnePlus 9 5G Price in India


या OnePlus मोबाईल फोनचा 8 GB RAM / 128 GB प्रकार 49,999 रुपये, 


12 GB RAM / 256 GB मॉडेल 54,999 रुपये किमतीत लॉन्च करण्यात आला. 


पण सध्या हा फोन 37,999 रुपये (8 जीबी रॅम व्हेरिएंट) मध्ये लिस्ट झाला आहे, म्हणजेच कंपनी थेट लॉन्च किंमतीवर 12 हजारांची सूट देत आहे. याशिवाय फोनसोबत अनेक ऑफर्सही उपलब्ध आहेत.


ऑफर


जर तुमच्याकडे सिटीबँक कार्ड असेल तर तुम्हाला 10 टक्के सूट (रु. 3,799) मिळेल, याशिवाय बजाज फिनसर्व्ह ईएमआय कार्ड आणि ग्राहकांच्या सोयीसाठी विना-व्याज ईएमआय सुविधा मिळेल.


3799 रुपयांच्या कार्ड डिस्काउंटनंतर, एक्सचेंज डिस्काउंटच्या सुविधेशिवाय फोनची किंमत 34,200 रुपयांपर्यंत खाली येते. एक्सचेंज व्हॅल्यूनंतर, तुम्हाला हा फोन 30 हजारांपेक्षा कमी किंमतीत मिळू शकतो, परंतु एक्सचेंज व्हॅल्यू तुमच्या फोनच्या मॉडेल आणि स्थितीवर अवलंबून असते.