Smartphones Launching in November: नोव्हेंबर 2025मध्ये अनेक मोठ्या कंपन्या त्यांचे स्मार्टफोन्स लाँच करत आहेत. तसंच, परदेशी कंपन्या भारतीय बाजारात स्मार्टफोन लाँच करत आहेत. oneplus 15च्या धमाकेदार वापसीनंतर इंडियन ब्रँड Lava Agni 4 मिड रँजमध्ये या महिन्याच्या स्मार्टफोन लव्हर्ससाठी खास नवीन स्मार्टफोन लाँच होत आहेत. या हाय टेक गॅजेट्सचे फिचर्स आणि अन्य बाबी जाणून घेऊयात एका क्लिकवर.
वनप्लसने चीनमध्ये आधीच धुमाकुळ घातला आहे. तर, आता भारतीय बाजारात आता लाँच होतोय.
बॅटरी बॅकअप: 7300mAh ची प्रचंड बॅटरी, फ्लॅगशिप सेगमेंटमधील आतापर्यंतच्या सर्वात मोठ्या बॅटरीपैकी एक आहे. बॅटरी बॅकअपमुळं तुम्ही आरामात दिवसभर फोन चार्जिंग नाही केलात तरी आरामात चालणार आहे.
सुपरफास्ट चार्जिंग: 120W सुपर फ्लॅश चार्जिंग आणि 50W वायरलेस चार्जिंगसह, तुमचा फोन विजेच्या वेगाने रिचार्ज होईल. त्यामुळं तुम्हाला फोन चार्जिंग होण्याची वाट पाहत बसावी लागणार नाही.
यात 6.78 इंचाचा1.5 के एमोलेड डिस्प्ले आहे ज्याचा रिफ्रेश रेट 165हर्ट्झ आहे. 16 जीबी पर्यंत रॅम आणि 1 टीबी स्टोरेजसह, हा फोन परफॉर्मन्स आणि स्टोरेजच्या बाबतीत बेस्ट आहे. त्याची किंमत ₹60,000 ते ₹70,000 दरम्यान असण्याची अपेक्षा आहे
iQOO २६ नोव्हेंबर रोजी भारतात आपला नवीन फ्लॅगशिप फोन लाँच करत आहे. हा फोन गेमर्स आणि पॉवर युजर्सना नक्कीच आवडणार आहे.
अल्ट्रा-स्मूथ डिस्प्ले: 144Hz रिफ्रेश रेटसह 6.85-इंचाचा 2K AMOLED डिस्प्ले व्हिज्युअल असेल. ग्राफिक्स असो वा व्हिडिओ याबाबत हा फोन सर्वोत्तम असणार आहे.
गेमिंगसाठी बेस्टः स्नॅपड्रॅगन ८ एलिट जेन ५ प्रोसेसर आणि अॅड्रेनो ८४० GPU ने सुसज्ज, हा फोन लॅग-फ्री गेमिंग अनुभव देईल. कितीही जीबीचा गेम असेल तरीदेखील न अडखळता तुम्ही गेम खेळू शकणार आहात.
iQOO 15 मध्ये शक्तिशाली बॅटरी आहे. हार्डवेअरदेखील अपग्रेड देखील केले गेले आहेत, म्हणूनच त्याची किंमत ₹55,000 पेक्षा जास्त आहे.
भारतीय ब्रँड Lava या नोव्हेंबरमध्ये अग्नि 4 सह मिड रेंज सेगमेंटमध्ये लाँच होत आहे. पॉकेट फ्रेंडली हा फोन असणार आहे. 25 हजाराच्या आसपास या फोनची किंमती असणार आहे. तसंच, मिड-रेंज ग्राहकांसाठी हा चांगला पर्याय असेल. यात अनेक जबरदस्त फिचर्सदेखील असणार आहेत.
4nm MediaTek Dimensity 8350 चिपसेटसह हा फोन सुपरफास्ट रन होणार आहे.तसंच, मेड इन इंडिया टॅगसह चिनी ब्रँडशी स्पर्धा करणार आहे. Lava Agni 4 मध्ये 120Hz रिफ्रेश रेटसह 6.78-इंचाचा फुल एचडी+ डिस्प्ले असेल.70000mAh पेक्षा जास्त बॅटरी आणि 50MP ड्युअल रिअर कॅमेरा सेटअप आहे.
Realme भारतात आपला GT 8 Pro लाँच करण्याची तयारी करत आहे, ज्याचे टीज फ्लिपकार्ट आणि Realme वेबसाइटवर आधीच दिसत आहेत.
डिस्प्ले: 144Hz रिफ्रेश रेट आणि 7000 निट्स ब्राइटनेससह 6.79-इंचाचा QHD+ AMOLED डिस्प्ले सूर्यप्रकाशातही उत्कृष्ट दृश्यमानता प्रदान करतो.
परफॉर्मेंस: Qualcomm Snapdragon 8 Elite Gen 5 चिपसेट असणार आहे. हा फोन पावर-इफिशिएंट असून प्रत्येक काम सहजतेने हाताळता येते. 16GB रॅम, 1TB स्टोरेज आणि 120W जलद चार्जिंग सपोर्टसह 7000mAh बॅटरी त्याला एक संपूर्ण पॅकेज बनवते. त्याची किंमत सुमारे ₹60,000 असण्याची अपेक्षा आहे.
मानसी क्षीरसागर झी 24 डिजीटलमध्ये सब एडिटर म्हणून कार्यरत आहेत. त्यांन मीडिया क्षेत्राचा 9 वर्षांचा अनुभव आहे. महाराष्ट्रा टाइम डिजीटल या वृत्तसंस्थेपासून कारकिर्दीची सुरुवात केली. राजकीय, मनोरंजन आणि अर्थ (infrastructure) या विषयात विशेष रुची आहे. त्याचबरोबर, बातमीमागची बातमी म्हणजेच घडामोडींचा विश्लेषणात्मक कव्हरेज करण्याची विशेष आवड. इन्फ्रास्ट्रक्चर आणि गुन्हे या बातम्यांमध्ये हातखंडा.
...Read MoreBy accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.