AI च्या शर्यतीत ChatGPTची उंच भरारी; लवकरच मिळणार व्हिडिओ जनरेट करण्याचा पर्याय

OpenAI ने त्याचा लोकप्रिय चॅटबॉट ChatGPT सुरू करून जगभरात मोठी क्रांती घडवली होती. आता कंपनी यामध्ये आणखी एक भन्नाट फीचर जोडण्याच्या तयारीत आहे. लवकरच ChatGPT मध्ये व्हिडिओ जनरेट करण्याचा पर्याय मिळू शकतो. म्हणजेच, वापरकर्ते फक्त टेक्स्ट प्रॉम्प्ट (म्हणजे मजकूराच्या आधारावर) टाकून हवा तसा व्हिडिओ तयार करू शकतील.

Updated: Mar 3, 2025, 05:43 PM IST
AI च्या शर्यतीत ChatGPTची उंच भरारी; लवकरच मिळणार व्हिडिओ जनरेट करण्याचा पर्याय

ओपन एआयकडून मोठी तयारी

ओपन एआयने आधीच Sora नावाचा एक टेक्स्ट-टू-व्हिडिओ मॉडेल लाँच केला आहे, जो सध्या त्याच्या अधिकृत वेबसाइटवर उपलब्ध आहे. मात्र, आता कंपनी हा सोरा मॉडेल थेट ChatGPT मध्ये आणण्याच्या तयारीत आहे. त्यामुळे युजर्सना केवळ चॅटबॉटकडून उत्तर मिळवण्याऐवजी थेट व्हिडिओ जनरेट करण्याची सुविधाही मिळू शकते.

ओपन एआय अधिकाऱ्यांचे वक्तव्य

ओपन एआय च्या Sora प्रोडक्टचे प्रमुख रोहन सहाय यांनी याबाबत एक मोठा संकेत दिला आहे. त्यांनी सांगितले की, सोरा मॉडेलला ChatGPT मध्ये समाविष्ट करण्याच्या दिशेने काम सुरू आहे. मात्र, याबाबत कोणतीही तारीख नक्की झालेली नाही. सहाय म्हणाले की, ChatGPT मधील सोरा व्हर्जनमध्ये वापरकर्त्यांना मूळ वेबसाइटच्या तुलनेत कमी कंट्रोल मिळू शकतो. म्हणजेच, स्वतंत्र Sora वेबसाइटवर अधिक सखोल सेटिंग्ज व पर्याय असतील, तर ChatGPT मध्ये त्याचे थोडे साधे व्हर्जन असेल.

Sora स्वतंत्र का लाँच करण्यात आला?

रोहन सहाय यांनी स्पष्ट केले की, 'ChatGPT मध्ये आणखी फीचर्स जोडल्याने तो जास्त अवघड होईल, त्यामुळेच Sora ला स्वतंत्र ठेवण्यात आले होते. मात्र, आता AI क्षेत्रातील स्पर्धा झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे OpenAI व्हिडिओ जनरेशन फीचरचा ChatGPT मध्ये समावेश करून इतर स्पर्धकांपेक्षा एक पाऊल पुढे येण्याच्या तयारीत आहे'.

चीनच्या कंपन्यांमुळे वाढलेली स्पर्धा

गेल्या काही महिन्यांत चिनी एआय कंपन्यांनी अनेक अत्याधुनिक मॉडेल्स लाँच केली आहेत, ज्यामुळे अमेरिकी कंपन्यांसमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे. विशेषतः DeepSeek नावाच्या चिनी स्टार्टअपने अतिशय स्वस्त आणि प्रभावी एआय मॉडेल आणून मोठा धमाका केला. त्यामुळे OpenAI आणि इतर कंपन्यांवर जास्तीत जास्त फीचर्स आणण्याचा दबाव वाढला आहे.

हे ही वाचाः iphone पेक्षा कमाल? चंद्राचा अगदी स्पष्ट फोटो काढणारा 200 मेगापिक्सल कॅमेराचा 'हा' स्मार्टफोन भारतात कधी होणार लाँच?

ChatGPT मध्ये जर व्हिडिओ जनरेशन या फीचरचा समावेश झाला, तर हे एआय क्षेत्रातील मोठं पाऊल ठरेल, यात काही शंका नाही. सध्याच्या काळात ओपन एआय त्याच्या Sora मॉडेलला ChatGPT मध्ये आणण्याच्या दिशेत काम करत आहे. यामुळे वापरकर्त्यांना अधिक सहज आणि सोपी व्हिडिओ जनरेशन सेवा मिळू शकते. मात्र, ओपन एआय या फीचरची अधिकृत घोषणा कधी करेल आणि त्यात काय काय सुविधा असतील? हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.