12000 Indian Lost Job By One Email: कॉर्परेट आणि आयटी क्षेत्रामध्ये मागील अनेक आठवड्यांपासून ज्या गोष्टीची भीती व्यक्त केली जात होती तीच आता घडली असून 'ओरॅकल' या मल्टीनॅशनल कंपनीने मोठ्या प्रमाणावर कर्मचारी कपात (layoffs) करण्यास सुरुवात केली आहे. धक्कादायक बाब म्हणजे याचा भारतातील कर्मचाऱ्यांवर मोठा प्रमाणात परिणाम होणार असून अनेकांच्या नोकऱ्या जाणार आहेत. 'ओरॅकल' मध्ये काम करणाऱ्या विविध विभागांमधील कर्मचाऱ्यांना सकाळी 5 ते 6 वाजण्याच्या सुमारास नोकरीवरुन काढून टाकण्यात आल्याचे ईमेल्स आले आहेत. या ईमेल्समध्ये कर्मचाऱ्यांना तुम्ही ज्या पदावर काम करत आहात ते पद कंपनीने या क्षणापासून काढून टाकलं असून तुम्हाला नोकरीमधून कमी करण्यात येत आहे, असं कळवलं आहे.
पीटीआय या वृत्तसंस्थेनं दिलेल्या वृत्तानुसार, अमेरिकेतील आयटी क्षेत्रातील आघाडीची कंपनी असलेल्या 'ओरॅकल'ने भारतातील सुमारे 12 हजार कर्मचाऱ्यांना असे ईमेल्स पाठवले असून त्यांना तात्काळ प्रभावाने कामावरून कमी केले आहे. या कपातीचा फटका बसलेल्या कर्मचाऱ्यांनी दिलेल्या माहितीच्या आधारेच पीटीआयने हे वृत्त दिले आहे. याहून अधिक मोठी बातमी म्हणजे ही नोकरकपात अशी थांबणार नसून 'ओरॅकल'कडून पुढील महिन्यात नोकरकपातीची दुसरी फेरी होऊ शकते. अनेक देशांमध्ये सक्रीय असलेल्या 'ओरॅकल' कंपनीने जगभरात 30 हजार कर्मचाऱ्यांना कमावरुन काढून टाकण्याचा निर्णय घेतला आहे.
'ओरॅकल'मधील कर्मचारी कपातीचा फटका बसलेल्यांमध्ये एचआर विभागातील कर्मचाऱ्यांचाही समावेश आहे. भारतामध्ये 'ओरॅकल'ने कामावरुन काढून टाकलेल्या कर्मचाऱ्यांची संख्या जगातील इतर कोणत्याही देशात झालेल्या कपातीपेक्षा अधिक असल्याचं सांगितलं जात आहे. 'ओरॅकल'ने केलेल्या कपातीचे पूर्ण स्वरूप आणि सविस्तर तपशील अद्याप समोर आलेलं नाही. मात्र 'ओरॅकल'मधील अनेक कर्मचाऱ्यांनी मंगळवारी 'लिंक्डइन' या प्रोफेश्नल सोशल नेटवर्किंग साईटवर आपल्याला नोकरीवरुन काढून टाकण्यात आल्याचं जाहीर केलं आहे.
या नोकरकपातीसंदर्भात 'ओरॅकल'ने कर्मचाऱ्यांना कोणतीही पूर्वकल्पना दिली नव्हती. मिळालेल्या माहितीनुसार, कर्मचाऱ्यांना कोणतीही पूर्वसूचना न देता, भारतीय प्रमाणवेळेनुसार सकाळी पाच ते सहा वाजण्याच्या सुमारास अनेकांना थेट कंपनीच्या ऑनलाइन सिस्टीममधून बाहेर काढण्यात आलं. अनेकांनी सिस्टीममधील बॅकएण्ड लॉगइन करता येत नव्हतं. त्यावेळेस मेल पाहिला असता आपल्याला नोकरीवरुन काढून टाकण्यात आल्याचं या कर्मचाऱ्यांच्या लक्षात आलं.
"कंपनीने एका व्यापक संघटनात्मक बदलाचा भाग म्हणून काही पदे रद्द करण्याचा निर्णय़ घेतला आहे. त्यामुळेच हा तुमच्या कामाचा शेवटचा दिवस आहे," असं 'ओरॅकल लीडरशिप'कडून पाठवलेल्या ईमेलमध्ये म्हटलं आहे. आपली नोकरी जाणार आहे याची कोणतीही पूर्वसूचना कर्मचाऱ्यांना देण्यात आली नव्हती तसेच त्यांना एचआरकडूनही कोणत्याच प्रकार संपर्क करण्यात आला नाही. स्थानिक स्तरावरील मॅनेजर्सलाही याची काहीच कल्पना नव्हती. अचानक ज्या लोकांना कामावरुन कमी करायचं आहे त्यांना ईमेल्स पाठवून नोकरीवरुन काढून टाकण्यात आलं.
ही नोकरकपात प्रामुख्याने भारत आणि मॅक्सिकोसहीत इतर देशांमध्ये करण्यात आली असून आपल्या एकूण कर्मचारी संख्येपैकी 18 टक्के म्हणजेच 30 हजार कर्मचारी कंपनीने कामावरुन कमी केले आहेत. मात्र याची अधिकृत आकडेवारी समोर आलेली नाही.
स्वप्निल घंगाळे हे मागील 12 वर्षांहून अधिक काळापासून डिजिटल पत्रकारितेमध्ये सक्रीय आहेत. 'महाराष्ट्र टाइम्स', 'लोकसत्ता' यासारख्या नामांकित कंपन्यांमध्ये त्यांनी यापूर्वी काम केलेलं आहे. राजकीय बातम्यांबरोबरच ताज्या घडामोडी, ट्रेण्डींग/ व्हायरल, टेक्नोलॉजी, क्रीडा, मनोरंजन अशा सर्वच क्षेत्रातील बातम्यांमध्ये हातखंडा आहे. अवांतर वाचनाबरोबरच बातम्यांव्यतिरिक्त सोशल मीडियावर लिहायची आवड आहे. फावल्या वेळात चित्रपट पाहणे, भटकंती करायला आवडतं. बातमी अचूक असावी असा त्यांचा कटाक्षाने प्रयत्न असतो. सध्या ते 'झी 24 तास'मध्ये 'डेप्युटी न्यूज एडिटर' म्हणून कार्यरत आहेत.
...Read More|
RCB
(20 ov) 250/3
|
VS |
CSK
207(19.4 ov)
|
| Royal Challengers Bengaluru beat Chennai Super Kings by 43 runs | ||
| Full Scorecard → | ||
|
SRH
(20 ov) 156/9
|
VS |
LSG
160/5(19.5 ov)
|
| Lucknow Super Giants beat Sunrisers Hyderabad by 5 wickets | ||
| Full Scorecard → | ||
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.