Pulsar 150 चा नवा दमदार लूक...
पल्सर ही तरुणाईत अत्यंत लोकप्रिय असलेली बाईक आहे
नवी दिल्ली : हिरो कंपनीने नव्या लूकमधील सुपर स्पलेंडर, पॅशन प्रो आणि पॅशन एक्स प्रो लॉन्च केल्यानंतर आता बजाज टू-व्हीलरने दमदार बाईक पल्सरचा नवा लूक लॉन्च करण्यासाठी सज्ज झाली आहे. पल्सर ही तरुणाईत अत्यंत लोकप्रिय असलेली बाईक आहे. २०१० मध्ये कंपनीने या बाईचे चौथे जनरेशन मॉडल लॉन्च केले होते. त्यानंतर या बाईकमध्ये कोणताही बदल झाला नाही. आता कंपनी बजाज पल्सर १५० मध्ये काही नवे बदल करणार आहे. टेस्टिंग दरम्यान नवी पल्सर स्पॉट करण्यात आली.
काय केले बदल?
नव्या पल्सरमध्ये कॉस्मेटिक चेंजेस केले आहेत. 2018 Pulsar 150 ग्राफीक्ससोबत येईल. यात नवा एग्जॉस्ट मफलर देखील देण्यात आला आहे. नवीन Bajaj Pulsar 150 मध्ये 37 एमएम फ्रंट टेलिस्कोपिक फॉर्क्स आहेत. सुरक्षेचा विचार करुन याचे ब्रेकींग अपडेट केले आहेत. आता रिअर डिक्स ब्रेकसोबत येईल. नव्या मॉडलमध्ये अंटी ब्रेकींग सिस्टम (ABS)नाही आहे. मॉडलच्या नव्या मॉडलमध्ये 17 इंचाचा एलॉय व्हील आहे.
इतकी आहे किंमत
मीडिया रिपोर्टनुसार, पल्सरच्या नव्या मॉडल इंजिनचे फिचर्स पूर्वीसारखेच असतील. १४९ सीसीच्या सिंगल सिलिंडर इंजिनमध्ये 2 वॉल्व आहेत. 8000 RPM वर 13.8 bhp पावर आणि 6000 RPM वर 13.4 न्यूटन मीटरचे टॉर्क जनरेट करता येईल. या बाईकची किंमत राजधानी दिल्लीपेक्षा एक्स शोरूम किंमत 73,626 रुपये आहे. नवीन मॉडलची किंमत २००० रुपयांहुन अधिक असू शकते.
या बाईकची किंमत केली कमी
यापूर्वी बजाजने आपल्या एट्री लेव्हल बाईक सीटी १०० ची किंमतही कमी केली आहे. 39,885 रुपयांची ही बाईक आता फक्त 31,802 रुपयांना उपलब्ध आहे. म्हणजे याची किंमत सुमारे 6,835 रुपयांनी कमी झाली आहे.