Samsung कडून 5 कॅमेरावाला जबरदस्त फोन लाँच, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स

Samsung M सीरिजच्या यशानंतर आता 5 कॅमेरा आणि जबरदस्त बॅटरी देणारा हा फोन लाँच केलाय, किंमत किती जाणून घ्या

Updated: Aug 13, 2021, 06:03 PM IST
Samsung कडून 5 कॅमेरावाला जबरदस्त फोन लाँच, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स title=

मुंबई: Samsung Galaxy A12 फेब्रुवारी महिन्यात  Galaxy A11 सक्सेसर स्वरुपात भारतात लाँच करण्यात आला होता. आता त्यावर कंपनीने भारतात त्यापेक्षा अधिक एडव्हान्स व्हर्जन आणण्यात येणार आहे. मॉडल मीडियाटेक SoC ऐवजी Exynos 850 चिपसेट सोबत आता नवीन व्हर्जन आणण्यात आलं आहे. 

Samsung Galaxy A12 Nacho स्वरुपात नवीन फोन लाँच करण्यात आला आहे. यामध्ये 6.5-इंच डिस्प्ले Android 11 OS, 15W फास्ट चार्जर आणि 5 हजार mAh बॅटरी मिळणार आहे. याशिवाय 48 MP प्रायमरी कॅमेरा देण्यात आला आहे. या फोनची किंमत आणि फीचर्स नेमके काय आहेत जाणून घेऊया.

Samsung Galaxy A12 मोबाईल दोन व्हेरिएन्टमध्ये उपलब्ध आहे. 4/64 स्टोरेज असलेल्या मॉडेलची किंमत 13,999 आणि 6/128 स्टोरेज असलेल्या मॉडेलची किंमत 16,499 रुपये आहे. निळा, पांढरा आणि काळा अशा तीन रंगात हा फोन उपलब्ध होणार आहे. साधारण 15 हजारापर्यंत जर चांगला फोन पाहात असाल तर हा फोन उत्तम असल्याचा दावा कंपनीकडून करण्यात आला आहे. 

Samsung Galaxy A12 चे काय आहेत फीचर्स?

Samsung Galaxy A12 Exynos मॉडल मध्ये 6.5-इंच HD+ Infinity V PLS TFT डिस्प्ले आहे.यामध्ये वॉटरड्रॉप नॉच देखील मिळतो. 720×1,600, 20:9 डिस्प्ले पिक्सल रेझोल्यूशन देखील यामध्ये मिळतं. 1TB पर्यं मायक्रोएसडी कार्डद्वारे याची मेमरी वाढवता येणार आहे. 4G, LTE, वायफाय, ब्लूटूथ  5.0, जीपीएस/ए-जीपीएस, 3.5 एमएम ऑडियो जॅक एसबी टाइप-सी पोर्ट मिळणार आहे. 

जास्त काळ चालणारी बॅटरी, सुपर कॅमेरा Vivoच्या नव्या फोनचे फीचर्स लीक

कॅमेऱ्याचा विचार करायचा झाला तर या फोनमध्ये 48 MP प्रायमरी सेंसर कॅमेरा मिळणार आहे. (f / 2.0 अपर्चर), 5MP अल्ट्रा-वाइड-एंगल लेंस आणि पोर्ट्रेट शॉट्ससाठी 2 MP डेप्थ सेंसर कॅमेरा देण्यात आला आहे. सेल्फी कॅमेरा 8 MP चा आहे. तर फोनला 15 व्हॅटचा चार्जर देण्यात आला आहे. या फोनची बॅटरी 5,000mAh आहे. म्हणजे M 31 इतकाच हा जबरदस्त आहे. कमी किमतीत पण चांगला फोन आहे. याशिवाय या फोनमध्ये ग्राहकांना Android 11 वापरण्यासाठी मिळणार आहे.