Android malware NoVoice : तंत्रज्ञान जितकं झपाट्यानं पुढे जात आहे, तितक्याच वेगानं या तंत्रज्ञानाला सुरुंग लावण्यासाठीचे मार्गही शोधले जात आहेत. हातात असणारा स्मार्टफोन एका क्लिकवर असंख्य कामं करण्यासाठीची मदत करतोय खरा, पण क्षणोक्षणी तुमची गोपनीय माहिती कुठंतरी दुसरीकडे पोहोचवली जातेय असं कोणी सांगितलं तर? थोडं हैराण झालात ना? नुकताच अँड्रॉईड फोन वापरणाऱ्यांसाठी एक धोक्याचा इशारा जारी करण्यात आला आहे. ज्यामध्ये एका अशा व्हायरसची चर्चा सुरू आहे, जो अनेक अँटीव्हायरसवरही मात करत आहे.
आतापर्यंत कोणतंही अॅप डाऊनलोड करायचं झाल्यास ते App Store वरूनच करण्याचा सल्ला दिला जात होता. मात्र, एक नवा मालवेअर वापरकर्त्यांच्या विश्वासाला धक्का पोहोचवत आहे. एका अहवालानुसार 50 हून अधिक अॅपमध्ये हा मालवेअर लपला असून, ते अॅप अनेकांनीच डाऊनलोड करणयात आले आहेत. हे मालवेअर सामान्य व्हायरस नसून, ते इतकं Advanced आहे की, फोन फॅक्ट्री रिसेट केला तरीही मोबाईलमधून नाहीसं होत नाहीय.
NoVoice असं या मालवेअरचं नाव असून, McAfee या सायबर सिक्युरिटी कंपनीनं ते शोधलं आहे. अहवालांनुसार हा मालवेअर अशा अॅपमध्ये आहे, जे सिस्टीम क्लीनर, गेम आणि फोटो गॅलरीशी संबंधित आहेत. या मालवेअरसोबतच अॅप अगदी योग्यरित्या काम करतात. मात्र, नकळतच मालवेअरही त्याचं काम करत असतं, जिथं मोबाईलमधून काही गोष्टींचा फायदा ते घेतं.
फोनमध्ये मालवेअरला रूट अॅक्सेस मिळाल्यास संपूर्ण फोन या व्हायरसच्या नियंत्रणात येण्याचा धोका असतो. ज्यामुळं संवेदनशील माहिती, युजरनेम, पासवर्ड, बँकिंग अॅप, डेटा आणि इतर सर्व प्रकारच्या माहितीचा अॅक्सेस मालवेअरला मिळतो. काही महत्त्वाचे अॅप हा मालवेअर डिलीटही करतो आणि मोबाईल सिस्टीममध्ये नजरेआडच राहतो.
सहसा एखाद्या फोनमध्ये व्हायरस जातो, तेव्हा मोबाईल फॅक्ट्री रिसेट करण्याचाच पर्याय अनेकजण निवडतात. मात्र नोव्हॉईस मालवेअरपुढं हे तंत्रसुद्धा फिकं पडतं. कारण, हा व्हायरस फोनच्या मूळ यंत्रणेपर्यंत शिरलेला असतो. युजरच्या आर्थिक आणि खासगी तपशीलावर या मालवेअरचा डोळा असल्यानं तो अधिक घातक समजला जात आहे. अहवालातील माहितीनुसार मे 2021 नंतर अपडेट झालेले मोबाईल या मालवेअलपासून सुरक्षित आहेत. म्हणजेच फोन अपडेट असेल तर त्याचा धोका कमी. प्राथमिक स्वरुपात गुगलनं प्ले स्टोअरवरून असा धोका असणारे अनेक अॅप डिलीट केले असून, मोबाईल युजरनाही फोन अपडेट करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. याशिवाय गरज नसणारे आणि कल्पना नसणारे App डाऊनलोड न करण्याचा सल्लाही देण्यात आला आहे.
सायली पाटील या 'झी 24 तास डिजीटल'मध्ये सिनियर सब एडिटर पदावर कार्यरत असून, त्यांना पत्रकारिता क्षेत्रातील 11 वर्षांचा अनुभव आहे. त्यांनी 'लोकमत', 'लोकसत्ता' या वृत्तपत्रांसाठी काम केलं. 'लोकसत्ता'मधील 'VIVA' या जीवनशैली विषयावर आधारित पुरवणीसाठी त्यांनी लिखाण केलं पुढे त्यांनी लोकसत्ता डिजीटलसाठी काम केलं. त्यांनी 'एबीपी माझा' च्या डिजीटल टीमसोबत कामाचा अनुभव घेत 2021 मध्ये पुन्हा एकदा 'झी 24 तास डिजीटल'मध्ये रुजू होत विविध विषयांवरील बातम्यांमध्ये योगदान दिलं. मनोरंजन आणि Lifestyle विषयांतील सुरुवातीचा अनुभव आणि त्यानंतर राजकारण, आरोग्य, प्रवास, राज्यस्तरीय बातम्यांमध्येही त्यांचा हातखंड आहे. सिनेमांचं समीक्षण, राष्ट्रीय स्तरावरील वृत्त, जागतिक स्तरावरील घडामोडी, हवामान वृत्त आणि खगोलशास्त्राश, पुरातत्त्वं विभागाच्या संशोधनासंदर्भातील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रुची आहे. भटकंती, सिनेमा, विज्ञान, खाद्यसंस्कृती हे त्यांच्या विशेष आवडीचे विषय आहेत.
...Read More|
RR
(11 ov) 150/3
|
VS |
MI
123/9(11 ov)
|
| Rajasthan Royals beat Mumbai Indians by 27 runs | ||
| Full Scorecard → | ||
|
RCB
(20 ov) 250/3
|
VS |
CSK
207(19.4 ov)
|
| Royal Challengers Bengaluru beat Chennai Super Kings by 43 runs | ||
| Full Scorecard → | ||
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.