Car Servicing ला देण्याआधी या गोष्टींकडे नक्की लक्ष द्या, नाहीतर तुम्हाला ते महागात पडू शकतं

सर्व्हिसिंग दरम्यान तुम्हाला कोणत्या गोष्टी माहित असणे आवश्यक आहे? ते जाणून घ्या

Updated: Aug 1, 2021, 08:16 PM IST
Car Servicing ला देण्याआधी या गोष्टींकडे नक्की लक्ष द्या, नाहीतर तुम्हाला ते महागात पडू शकतं

मुंबई : नवीन कार खरेदी करणे हा सर्वसामान्य किंवा मध्यमवर्गीयांसाठी एक मोठा निर्णय आहे. परंतु कार खरेदी करणं जितकं कठीण आहे, त्यापेक्षा जास्त कठीण आहे कारचं मेंटेनन्स. कारण कोणती ही वस्तू म्हटली की, त्याची काळजी घेण्याची तितकीच आवशकता आहे. त्यामुळे आपल्या कारला दर दोन ते तिन महिन्यानंतर सर्विसींग करणे गरजेचे आहे. परंतु त्यासाठी सर्व्हिस सेंटरच्या लोकांवर कधीही आंधळेपणाने विश्वास ठेवू नका, कारण तुम्ही काळजी घेतली नाही तर यात तुमची फसवणूक होऊ शकते

अशा परिस्थितीत आज आम्ही तुम्हाला अशाच काही गोष्टीबद्दल सांगणार आहोत ज्यावर तुम्हाला सर्व्हिसिंग दरम्यान सर्वाधिक लक्षात ठेवण्याची गरज आहे. सर्व्हिसिंग दरम्यान तुम्हाला कोणत्या गोष्टी माहित असणे आवश्यक आहे? ते जाणून घ्या

इंजिन ऑईल

इंजिन ऑईल हे एक महत्त्वाचे लुब्रिकंट आहे, जे आपले इंजिन सुरळीत चालण्यास मदत करते. नवीन कारमध्ये, इंजिन ऑईल बदलणे आवश्यक आहे. कारण तेलात इंजिनची अशुद्धता मिसळली जाते. त्यामुळे तुमच्या नवीन कारला सर्विसींगला आणि दिल्यानंतर तुमच्या कारच्या ऑईलचा रंग तपासा. कारण यात तुमची फसवणूक होण्याची शक्यता आहे.

कूलंट

आपल्या कारचे इंजिन सुरळीत चालण्यासाठी कूलंटची आवश्यकता असते कारण ते कारच्या संपूर्ण प्रणालीचे तापमान थंड ठेवण्यात मदत करते. काही हजार किलोमीटर नंतर ते बदलले गेले पाहिजे कारण कालांतराने त्याचे गुणधर्म बदलतात ज्यामुळे तुमच्या कारचे नुकसान होऊ शकते. त्यामुळे कार सर्विसिंगला देण्यापूर्वी आणि दिल्यानंतर कूलंट बददले गेले की, नाही हे नक्की तपासा.

एअर फिल्टर

तुमचे इंजिन एअर फिल्टर तुमच्या इंजिनमध्ये वाहणाऱ्या हवेचे प्रमाण नियंत्रित करते. ते स्वच्छ ठेवणे महत्वाचे आहे. त्यामुळे स्वच्छ हवा फिल्टरसह, आपण आपले मायलेज सुधारू शकता आणि आपल्या इंजिनचे दीर्घ आयुष्य सुनिश्चित करण्यात मदत करू शकता. परंतु तुमचे एअर फिल्टर खराब किंवा बंद झालेले असेल तर तुमच्या कारच्या इंजिनवर याचा परिणाम होऊ शकतो. त्यामुळे कार सर्विसिंगला दिल्यानंतर हे नक्की तपासा की, ते साफ केलं गेलं आहे की, नाही.

ओडोमीटर रीडिंग

सर्व्हिसिंगसाठी आपली कार देण्यापूर्वी आपले ओडोमीटर रीडिंग लक्षात घेणे महत्वाचे आहे. तुमच्या पाठीमागे कारचा गैरवापर झाला आहे का? हे यामुळे तुम्हाला माहित पडू शकते. परंतु हे लक्षात घ्या की, सर्विसिंग नंतर कारच्या टेस्ट ड्रायव्हिंगसाठी देखील कार नेली जाते त्यामुळे साधारण  1 ते 2 किलोमीटरचा फरक तुम्हाला दिसु शकतो, जे सामान्य आहे.

टायर

टायर तुमच्या गाडीचे खूप महत्वाचा भाग आहेत, तरीही अनेकदा आपण त्याकडे फारसे लक्ष देत नाही. परंतु तुमच्या कारमध्ये योग्य टायर प्रेशर भरणे आवश्यक आहे आणि नियमितपणे ट्रेड डेप्थ तपासा. व्यवस्थित देखभाल केलेले टायर सुरक्षित आणि चांगले मायलेज देतात. त्यामुळे कुठेही जाण्यापूर्वी टायर तपासा.