TATA ने लाँच केल्या जबरदस्त क्षमता असलेल्या तीन गाड्या, किंमत आणि फीचर्सबाबत जाणून घ्या
देशातील आघाडीची वाहन उत्पादक कंपनी टाटा मोटर्स पॅसेंजर वाहनांसह कमर्शियल सेगमेंटमध्येही लोकप्रिय आहे. टाटाने सोमवारी तीन नवीन वाहने लाँच केली आहेत.
Tata Motors Pickup Trucks: देशातील आघाडीची वाहन उत्पादक कंपनी टाटा मोटर्स पॅसेंजर वाहनांसह कमर्शियल सेगमेंटमध्येही लोकप्रिय आहे. टाटाने सोमवारी तीन नवीन वाहने लाँच केली आहेत. तिन्ही कंपनीची कमर्शियल वाहने आहेत. कंपनीने एकाच वेळी नवीन पिकअप ट्रक - Yodha 2.0, Intra V20 bi-fuel आणि Intra V50 लाँच केले आहेत. टाटा कंपनीच्या म्हणण्यानुसार, या गाड्या भारतीय बाजारपेठेच्या गरजा लक्षात घेऊन तयार केले गेले आहेत आणि मजबूत लोड क्षमता, सर्वात मोठी डेक लांबी आणि सर्वात लांब रेंज देतात. लाँचिंगसोबतच कंपनीने देशात 750 युनिट्सही डिलिव्हरी केल्या आहेत.
टाटा योद्धा 2.0: टाटा मोटर्सचा योद्धा 2.0 पिकअप ट्रक या विभागात सर्वाधिक पेलोड क्षमता (2,000 किलो) प्रदान करतो. यात 2.2 लीटर डिझेल इंजिन आहे, जे 250 Nm टॉर्क जनरेट करते. यात 30 टक्के ग्रेडेबिलिटी, मेटॅलिक बंपर आणि फेंडर्स देण्यात आले आहेत. कंपनीने Yodha 2.0 ला भारतीय बाजारात 9.99 लाख रुपये (एक्स-शोरूम) किंमतीसह लाँच केले आहे.
टाटा इंट्रा V50: टाटा इंट्रा V50 मध्ये 1.5 टन इतकी मजबूत पेलोड क्षमता आहे. यात 2.5L डिझेल इंजिन आहे, जे 220 Nm टॉर्क जनरेट करते. लोडिंग क्षमता आणखी वाढवण्यासाठी, त्याला 2,960 मिमीची सर्वात लांब लोड बॉडी आहे. किमतींबद्दल बोलायचे झाले तर, इंट्रा V50 ची एक्स-शोरूम किंमत 8.67 लाख रुपये आहे.
टाटा इंट्रा V20 bi-fuel: टाटा इंट्राला bi-fuel इंजिन दिले आहेत. हे इंजिन 1.2-लिटर समर्थित आहे, जे 160 Nm टॉर्क जनरेट करते. टाटा इंट्रा V20 bi-fuel 1,000 किलोचा पेलोड वाहून नेण्यास सक्षम करते.