)
Samsung Galaxy S25 Edge Price : दिवाळीचे मजेचे आणि खूप साऱ्य भेटवस्तू देण्याघेण्याचे दिवस आता संपले असले तरीही काही बड्या ब्रँडकडून दिल्या जाणाऱ्या ऑफर अद्यापही सुरू असल्या कारणानं ही दिवाळी आताही सुरु आहे की काय? हाच प्रश्न पडत आहे. लॅपटॉप असो, मोबाईल असो किंवा अगदी वाहनं असो. कंपन्यांकडून अद्यापही काही दमदार ऑफर दिल्या जात आहेत. ज्यामध्ये सॅमसंगही मागे नाही.
सँमसंगच्या Galaxy S25 Edge या मॉडेलवर कंपनीनं मोठी सवलत देण्यास सुरुवात केली आहे. मे महिन्यात लाँच झालेल्या या फोनची किंमत आता हजारोंनी कमी झाल्यानं जणू कंपनी तो फुकटात विकणार का? असा विनोदी प्रश्नही ग्राहक विचारत आहेत. कमाल फिचर्स, स्लिम डिझाईन असणारा Samsung Galaxy S25 Edge फ्लिपकार्ट (Flipkart) या ई कॉमर्स वेबसाईटवरून खरेदी करु शकता.
सॅमसंगचे फोन हे त्यांच्या फिचर आणि बॅटरीसोबतच त्यांच्यातील प्रोसेसर आणि कॅमेरासाठी ओळखले जातात. राहिला प्रशअन गॅलेक्सी एस25 एजचा, तर त्यावरकमाल सवलत दिली जात आहे. Qualcomm Snapdragon 8 Elite प्रोसेसर असणाऱ्या या फोनला 200MP प्रायमरी रिअर कॅमेरा दिला असून, हा सॅमसंगच्या गॅलेक्सी ब्रँडचा सर्वात कमी जाडीचा प्लॅन आहे. जो कंपनीनं 1,09,999 रुपये इतक्या किमतीला लाँच केला होता. फोनच्या 12GB RAM + 256GB स्टोरेज व्हेरिएंटसाठी इतकी किंमत मोजावी लागत होती. फ्लिपकार्टवर मात्र हाच फोन 89,999 रुपयांना लिस्ट आहे. म्हणजेच थेट त्यावर 20 हजारांची सवलत मिळत आहे.
सॅमसंगच्या या फोनवर विविध कार्डवर 4000ची सवलत मिळत असून, ग्राहकांना हा फोन खरेदी करताना एकूण 24000ची थेट सूट मिळत आहे. याच म़ॉडेलमध्ये 512जीबी स्टोरेज असणारा फोनही विक्रीसाठी उपलब्ध असून, त्याची किंमत 1,01,999 रुपये इतकी आहे. या फोनवरही चांगली सवलत दिली जात आहे.
अनेकांच्याच पसंतीस उतरणारा हा फोन अर्थात Samsung Galaxy S25 Edge 5G मध्ये 6.7-inch चा LTPO AMOLED सह 120Hz रिफ्रेश रेट सपोर्ट सोबत विक्रीसाठी उपलब्ध आहे. स्क्रीन प्रोटेक्शनसाठी त्याला गोरिल्ला ग्लास सिरॅमिक 2 वर्जन देण्यात आलं आहं. आहे. स्मार्टफोन Android 15 वप आधारित OneUI 7 सह उपलब्ध आहे. हा फोन Qualcomm Snapdragon 8 Elite वर काम करत असून, त्याचा कॅमेरा 12MP अल्ट्रा वाईड अँगल लेंसनं फोटो टीपण्याची मुभा देतो. तर या फोनला 3900mAh इतकी बॅटरी देण्यात आली असून, 25W चं वायर्ड चार्जिंग आणि 15W चं वायरलेस चार्जिंग मिळतं. काय मग, कधी हा फोन खरेदी करण्याचा बेत आखताय?