कचऱ्यात फेकताय पार्सल बॉक्स? मिनिटांत खाली होईल बॅंक अकाऊंट; नवा स्कॅम आला समोर

Parcel Boxes Scame: तुम्ही कचऱ्यात टाकलेले पार्सलचे बॉक्स घोटाळेबाजांसाठी खूप उपयुक्त ठरतंय.

प्रविण दाभोळकर | Updated: Jan 20, 2025, 07:39 PM IST
कचऱ्यात फेकताय पार्सल बॉक्स? मिनिटांत खाली होईल बॅंक अकाऊंट; नवा स्कॅम आला समोर
ई कॉमर्स

Parcel Boxes Scame: सध्या ई कॉमर्स साइटवरुन वस्तू मागण्याचा ट्रेण्ड वाढलाय. खाण्यापिण्यापासून ते जीवनापयोगी सर्वच गोष्टी ईकॉमर्स वेबसाइटवरुन मागवल्या जातात. यात वेळेची बचत होते आणि पाहिजे तेव्हा पाहिजे ती वस्तू घरबसल्या मिळते. पण या सर्वात तुमच्याकडून कळत नकळत झालेली एक चूक तुमचे बॅंक अकाऊंट रिकामी करु शकते तुम्हाला माहिती आहे का? बाजारात एक नवा फ्रॉड सध्या सुरु आहे. याबद्दल तुम्हाला माहिती असणे आवश्यक आहे. 

Add Zee News as a Preferred Source

आजकाल लोक ई-कॉमर्स साइट्सवरून वेगवेगळ्या वस्तू ऑर्डर करतात. या वस्तू खूप चांगल्या पद्धतीने पॅकेजिंग केलेल्या असतात. ज्या पार्सल बॉक्समध्ये वस्तू पॅक केल्या जातात तो बहुतेकदा कचऱ्यात फेकला जातो. जर तुम्हीही असे काही करत असाल तर तुम्ही आतापासून सावधगिरी बाळगा. कारण कचऱ्यात टाकलेले पार्सलचे बॉक्स घोटाळेबाजांसाठी खूप उपयुक्त ठरतंय. याचा गैरफायदा घेऊन घोटाळेबाज तुमची लाखो रुपयांची फसवणूक करू शकतात.

पार्सल बॉक्सवर महत्त्वाची माहिती 

तुमच्याशी संबंधित अनेक महत्त्वाची माहिती पार्सल बॉक्सवर नोंदवलेली असते. ई-कॉमर्स कंपनी वस्तू पॅक करते आणि तुम्हाला पाठवते. त्यावेळी बॉक्सवर तुमचे पूर्ण नाव, घराचा पत्ता, मोबाईल नंबर आणि ऑर्डर नंबर देखीला नोंदवलेला असतो. पार्सल घरी आल्यावर आपल्याला ते उघडून वस्तू पाहण्याची घाई असते. तेव्हा या बॉक्सकडे तुमचे दुर्लक्ष होते. हा बॉक्स कचऱ्यात कुठे गेला हेही तुम्हाला कळत नाही. पण हा बॉक्स टाकून देण्यापुर्वी तुम्हाला माहितीचा स्टिकर काढून फाडायला हवा. जर तुम्ही पार्सल बॉक्स कचऱ्यात असाच फेकला तर तुम्ही स्वतःसाठी संकटाला आमंत्रण देत आहात.

जर तुम्ही तुमचा पार्सल बॉक्स नष्ट न करता कचऱ्यात फेकून दिला असेल आणि तो एखाद्या घोटाळ्याबाजाच्या हाती लागला तर तुमचे बॅंक अकाऊंट रिकामी व्हायला वेळ लागणार नाही. पॅकेजवर लिहिलेल्या ऑर्डर नंबरवर तुमचे नाव, पत्ता, तुमचा मोबाईल नंबर आणि बँकिंग तपशीलांसह अनेक महत्त्वाची माहिती घोटाळेबाजांना मिळते. तुमचे खाते रिकामे करायला स्कॅमर्सना एवढी माहिती पुरेशी असते. या माहितीचा वापर करून हे स्कॅमर तुमचे खाते क्षणार्धात रिकामे करू शकतात.

हे घोटाळेबाज प्रथम तुमच्या पार्सल बॉक्सच्या मदतीने तुमची गोपनीय माहिती चोरतात. यांनंतर ते तुम्हाला कोणत्या ना कोणत्या बहाण्याने भेटतात आणि कोणत्याही प्रकारे तुमच्या ओळखीच्या व्यक्तीला कॉल करण्यास सांगतात. पेमेंट गेटवेवर तुमची गोपनीय माहिती भरल्यानंतर दुसऱ्या बाजूला स्कॅमर तयार असतो. तर त्याचा ओटीपी तुमच्या मोबाईलवर येताच तो ओटीपी तुमच्या नकळत त्याच्यासोबत शेअर करतो आणि क्षणार्धात तुमचे खाते पूर्णपणे रिकामे होते.

About the Author

Pravin Dabholkar

"प्रवीण सुरेश दाभोळकर हे 'झी 24 तास' डिजिटलमध्ये चीफ सब एडीटर पदावर कार्यरत आहेत त्यांना मीडिया क्षेत्राचा 14 वर्षांचा अनुभव आहे. वयाच्या 21 व्या वर्षी त्यांनी प्रिंट मीडियातून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली. तिथे त्यांना लेखन आणि रिपोर्टिंगचा मौल्यवान अनुभव मिळाला. तेव्हापासून त्यांनी प्रिंट, टीव्ही आणि डिजिटल मीडियासह विविध माध्यमांमध्ये काम केले आहे. संशोधनात्मक अहवाल आणि फिचर रायटिंगकडे त्यांचा कल आहे. वाचकांना माहिती नसलेल्या कथा लोकांसमोर आणण्याची त्यांना आवड आहे. हे करीत असताना सविस्तर तपशील आणि अचूकतेकडे त्यांची कटाक्षाने नजर असते. फावल्या वेळात प्रविण आपल्या आनंदासाठी फिरणे, नवीन गोष्टी आत्मसात करणे आणि सामाजिक कार्यात गुंतलेले असतात. त्यांचे लेखन अनेकदा सामाजिक न्यायाच्या समस्यांबद्दलची त्यांची उत्कटता दर्शवते. तसेच आपल्या लेखणीच्या माध्यमातून समाजात सकारात्मक प्रभाव पाडण्यासाठी ते नेहमी प्रयत्नशील असतात."

...Read More