CNG मध्ये सर्वाधिक मायलेज देणाऱ्या कार, कमी किंमतही मिळणार शानदार लूक
आज आम्ही तुम्हाला अशाच काही कार बद्दल सांगणार आहोत. ज्या CNG कार तुम्हाला बजेटमध्ये मिळतील.
मुंबई : इंधनाचे वाढते दर पाहाता, आता प्रत्येक जण CNG कारकडे वळले आहेत. जर तुम्ही इंधन खर्च कमी करण्यासाठी CNG कार खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर तुमचा निर्णय योग्य असू शकतो. बाजारात अशा काही निवडक कंपन्या आहेत, ज्या तुमच्या बजेटमध्ये सर्वोत्तम मायलेजच्या CNG कार विकत आहेत. येथे तुम्ही हॅचबॅक, मध्यम आकाराची सेडान किंवा छोटी कार यापैकी एक निवडू शकता. ज्यामुळे तुम्हाला अगदी कमी पैशाच चांगली आणि खर्च वाचवणारी कार घरी आणणे शक्य होईल. आज आम्ही तुम्हाला अशाच काही कार बद्दल सांगणार आहोत. ज्या CNG कार तुम्हाला बजेटमध्ये मिळतील. आम्ही या लेखात दिलेल्या माहितीमुळे तुम्हाला या कारचं मायलेज आणि बऱ्याच गोष्टी कंपेअर करुन तुमच्या आवडीची आणि बजेटमधील कार विकत घेण्यात मदत होईल.
टाटा टियागो आईसीएनजी
Tata Motors ने अलीकडेच Tata Tiago iCNG लाँच केले आहे, जो त्यांच्या Tiago मॉडेलचा CNG प्रकार आहे. ही कार CNG वर 26.49 किमी/किलो मायलेज देते. तुम्ही ही कार 6 लाख 09 हजार 900 रुपयात त्याच्या एक्स-शोरूम किमतीत खरेदी करू शकता. या कारमध्ये स्वयंचलित इंधन शिफ्ट तंत्रज्ञान देखील आहे.
मारुति सुजुकी वैगनआर
मारुती सुझुकी वॅगनआरची BS VI S-CNG आवृत्ती देखील एक चांगला पर्याय आहे. CNG मध्ये मारुती WagonR चे मायलेज 32.52 kmpl आहे. या कारची दिल्ली एक्स-शोरूम किंमत 5.83 लाख रुपये आहे. कंपनीने आपले दोन मॉडेल सादर केले आहेत - WagonR S-CNG Lxi आणि WagonR S-CNG Lxi (O). यात 998cc, 3 सिलेंडर इंजिन आहे.
टाटा टिगोर आईसीएनजी
Tata Motors ने Tigor (पेट्रोल आणि CNG इंधन प्रणाली एकत्र) TATA Tigor iCNG ची CNG आवृत्ती गेल्या महिन्यातच लॉन्च केली आहे. कारची एक्स-शोरूम किंमत 7 लाख 69 हजार 900 रुपये आहे. हे XZ आणि XZ+ या दोन प्रकारांमध्ये सादर करण्यात आली आहे. XZ+ व्हेरियंटची एक्स-शोरूम किंमत 8 लाख 29 हजार 900 रुपये आहे.
Hyundai सैंट्रो
ह्युंदाईची फॅक्टरी फिटेड सीएनजी कार सँट्रो हाही एक चांगला पर्याय आहे. तुम्ही ही कार 1.1L द्वि-इंधन (CNG सह पेट्रोल) पर्यायामध्ये खरेदी करू शकता. या कारचे मायलेज 30.4 किमी/किलो आहे. सीएनजी प्रकारातील कारची सुरुवातीची किंमत 6 लाख 09 हजार 900 रुपये आहे.
मारुति ऑल्टो
सीएनजीमध्ये उत्तम मायलेज देणाऱ्या कारमध्ये मारुतीच्या अल्टोचे नावही समाविष्ट आहे. CNG प्रकारातील अल्टोचे मायलेज 31.5 kmpl आहे. कारमध्ये 796 cc, 3 सिलेंडर्स F8D इंजिन आहे. CNG प्रकारातील कारची दिल्ली एक्स-शोरूम किंमत 4.76 लाख रुपये आहे.
Hyundai ऑरा
सीएनजी प्रकारातील AURA ही Hyundai ची सेडान देखील खरेदी करू शकते. या CNG कारची किंमत दिल्ली एक्स-शोरूम 7.67 रुपये आहे. त्याचे मायलेज 28 किमी/किलो आहे.
मारुति एर्टिगा सीएनजी
तुम्ही मारुतीची MPV कार Ertiga देखील CNG मध्ये खरेदी करू शकता. त्याचे CNG मायलेज 26.08 kmpl आहे. या कारच्या CNG प्रकाराची सुरुवातीची एक्स-शोरूम किंमत 9 लाख 66 हजार 500 रुपये आहे.
मारुति एस-प्रेसो
मारुती सुझुकीची दुसरी कार S-Presso आहे. ही कार CNG मध्ये 31.2 kmpl चा मायलेज देखील देते. CNG प्रकारातील या कारची दिल्ली एक्स-शोरूम किंमत 5 लाख 17 हजार 500 रुपये आहे.