Top 10 Cars In India: तुम्ही गाडी घेण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. कारण देशात सर्वाधिक पसंती असलेल्या टॉप 10 गाड्यांची माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत. जून महिन्यात कारप्रेमींना या गाड्यांना सर्वाधिक पसंती दिली आहे. टाटा मोटर्सच्या नेक्सॉनने जून 2022 मध्ये प्रवासी वाहनांच्या विक्रीत ह्युंदाई क्रेटाला मागे टाकले आहे. असं असलं तरी सर्वाधिक विक्री होणारे मॉडेलमध्ये मारुती सुझुकीच आघाडीवर आहे. जूनमध्ये भारतात सर्वाधिक विकल्या गेलेल्या दहा कारपैकी सहा मॉडेल्स मारुती सुझुकीच्या आहेत. त्याचबरोबर या यादीत ह्युंदाई आणि टाटा मोटर्स यांचे प्रत्येकी दोन मॉडेल आहेत. मारुती सुझुकी जून 2022 मध्ये प्रवासी वाहनं विक्रीच्या यादीत आघाडीवर आहे. 'वॅगन आर'ला ग्राहकांची सर्वाधिक पसंती आहे. जून महिन्यात एकूण 19,190 युनिट्सची विक्री झाली आहे. यानंतर दुसऱ्या क्रमांकावर मारुती सुझुकी स्विफ्ट असून 16,213 कार विकल्या आहेत. तिसऱ्या क्रमांकावर मारुती सुझुकी बलेनो असून 16,103 युनिट्स विकल्या आहेत. टॉप 3 विकल्या जाणाऱ्या कारपैकी, फक्त बलेनोच्या विक्रीत वार्षिक 10 टक्के वाढ झाली आहे, तर वॅगन आर आणि स्विफ्टच्या विक्रीत अनुक्रमे 1 आणि 9 टक्क्यांनी घट झाली आहे.
टाटा मोटर्स आणि ह्युंदाई यांच्यात विक्रीची लढाई सुरू आहे. टाटाने एसयूव्ही विक्रीत ह्युंदाईला मागे टाकले आहे. नेक्सॉनने क्रेटाला मागे टाकले आहे. टाटा मोटर्सने नेक्सॉनच्या 14,295 युनिट्सची विक्री केली आहे. त्याच्या विक्रीत वार्षिक आधारावर 78 टक्क्यांची वाढ झाली आहे. तर, ह्युंदाई क्रेटाच्या 13,790 युनिट्सची विक्री झाली असून, तिच्या विक्रीत वार्षिक 39 टक्के वाढ नोंदवली आहे. यादीत नेक्सॉन चौथ्या क्रमांकावर आणि क्रेटा पाचव्या क्रमांकावर आहे.
त्यानंतर सहाव्या, सातव्या आणि आठव्या क्रमांकावर मारुती सुझुकी अल्टो, डिझायर आणि एर्टिगा यांचा क्रमांक लागतो. त्यांनी अनुक्रमे 13,790 युनिट्स, 12,597 युनिट्स आणि 10,423 युनिट्सची विक्री झाली आहे. अल्टोने वार्षिक 10 टक्के आणि एर्टिगाने 5 टक्के वाढ नोंदवली आहे, तर डिझायरच्या विक्रीत 0.3 टक्के घट झाली आहे. नवव्या आणि दहाव्या स्थानावर पुन्हा टाटा मोटर्स आणि ह्युंदाई यांच्यात लढत आहे. जून 2022 मध्ये 10,414 युनिट्सची विक्री करून टाटा पंच नवव्या स्थानावर आहे. त्याच वेळी, वेन्यूचे 10,321 युनिट्स विकले असून दहाव्या क्रमांकावर आहे.
जून 2022 मध्ये सर्वाधिक विक्री होणाऱ्या कारची यादी