नवी दिल्ली : स्मार्टफोन आज आपल्या आयुष्यातील एक महत्वाचा घटक बनला आहे. मात्र, हा स्मार्टफोन चार्ज करताना युजर काही चुका करतात आणि त्यामुळे निर्माण होते बॅटरीची समस्या.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

चुकीच्या पद्धतीने स्मार्टफोन चार्ज केल्यास त्याचा परिणाम बॅटरीवर होतो. कारमध्ये ट्रॅव्हल करणा-यांकडे कार चार्जर असतो. मात्र, या चार्जरने फोन चार्ज करत असताना अशा काही चुका होतात की ज्यामुळे फोन चार्ज होण्यास खूप वेळ लागतो. इतकेच नाही तर यामुळे फोनच्या बॅटरीलाही नुकसान होतं. आज आम्ही तुम्हाला याच संदर्भात काही खास टिप्स देणार आहोत. 


चार्ज होण्यास लागतो अधिक वेळ


जर तुम्ही स्मार्टफोनचा वापर करता-करता फोन चार्ज करत असाल तर बॅटरी चार्ज होण्यास अधिक वेळ लागतो. तसेच अनेक फोन्समध्ये जीपीएस, ब्लूटूथ सारखे फीचर्स चालूच असतात. त्यामुळेही फोन चार्ज होण्यास अधिक वेळ लागतो.


गरज असेल तेव्हाच करा चार्ज


लक्षात ठेवा की, कार चार्जरने प्रत्येक दिवशी फोन चार्ज करु नका. यामुळे फोनच्या बॅटरीवर परिणाम होतो. जर तुम्ही कार चार्जरने फोन चार्ज करत असाल तर फोन चार्ज होताच तो चार्जरपासून डिस्कनेक्ट करा.


चांगल्या चार्जरचा करा वापर


कार चार्जरची क्वॉलिटी नेहमी चांगली असावी. फोन चार्ज करण्यासाठी चांगला चार्जर असल्यास फोन लवकर चार्ज होतो आणि बॅटरीही चांगली राहते. म्हणजेच जर तुम्ही घरी आहात तर ओरिजनल चार्जरनेच फोन चार्ज करा.