जुनं ते सोनं! 105 वर्षे जुना ट्रॅक्टर, मुलं भंगार समजून त्यावर खेळायची, मालक रातोरात झाला कोट्यधीश!

Old tractor: हा ट्रॅक्टर 12 हॉर्सपॉवरचा सिंगल सिलिंडर 'हॉट बल्ब इंजिन' चा असून तो सुरू करण्यासाठी इंजिन गरम करावे लागते. कमी वेगातही खूप काम करतो. 

प्रविण दाभोळकर | Updated: Feb 26, 2026, 05:03 PM IST
जुनं ते सोनं! 105 वर्षे जुना ट्रॅक्टर, मुलं भंगार समजून त्यावर खेळायची, मालक रातोरात झाला कोट्यधीश!
ट्रॅक्टर

Old tractor: जालंधरमध्ये भंगार समजलेला 105 वर्ष जुना जर्मन 'लांझ बुलडॉग एचएल-12' ट्रॅक्टर 1.25 कोटी रुपयांना विकला गेलाय. हा ट्रॅक्टर 1921 मध्ये जर्मनीच्या मॅनहाइम येथे हेनरिक लांझ कंपनीने बनवला होता. अमेरिकेतील एका खरेदीदाराने तो विकत घेतला आहे. आता हा ट्रॅक्टर कॅलिफोर्नियातील एका प्रसिद्ध कृषी संग्रहालयात प्रदर्शनासाठी जाणार आहे. लोकांना भंगार वाटणारी ही वस्तू आज जगभर चर्चेचा विषय बनली आहे. व्हायरल व्हिडिओमुळे ही बातमी सर्वत्र पसरली.

Add Zee News as a Preferred Source

ट्रॅक्टरचे वैशिष्ट्य काय? 

हा ट्रॅक्टर 12 हॉर्सपॉवरचा सिंगल सिलिंडर 'हॉट बल्ब इंजिन' चा असून तो सुरू करण्यासाठी इंजिन गरम करावे लागते. कमी वेगातही खूप काम करतो. शेत नांगरणे, पाणी पंप करणे, गिरणी चालवणे असे अनेक कामे तो करायचा. 1921 ते 1950 पर्यंत बनवलेल्या या मालिकेतील ट्रॅक्टर जगात खूप दुर्मीळ आणि मौल्यवान आहेत. जर्मन शेती तंत्रज्ञानाचे प्रतीक मानले जातात. मूळतः ब्रिटिशांकडे असलेला हा ट्रॅक्टर नंतर पंजाबच्या एका शेतकऱ्याकडे आला.

जालंधरमधील भंगाराची कहाणी 

शहीद भगत सिंह चौकाजवळील एका जुन्या इमारतीत दशकानुदशके हा ट्रॅक्टर गंजलेल्या अवस्थेत पडला होता. लोक त्याला भंगार समजायची, मुले त्यावर खेळायची. त्याचा मालक 40 वर्षांपूर्वी अमेरिकेत स्थायिक झाला होता. त्यामुळे इथे कोणीही त्याची किंमत ओळखली नाही. स्थानिक लोकांसाठी तो ट्रॅक्टर म्हणजे फक्त जुनी वस्तू होती. पण ट्रॅक्टर प्रेमींसाठी तो खजिना होता!

हेही वाचा: 10 वीची परीक्षा देताना विद्यार्थीनी बनली आई, गणिताचा पेपर अर्ध्यात सोडून वॉशरुममध्ये दिला बाळाला जन्म

व्हायरल व्हिडिओनंतर लागली बोली

सुमारे अडीच महिने आधी एक इन्स्टाग्राम influencer ने व्हिडिओ टाकला आणि तो व्हायरल झाला. जालंधरचे स्थानिक काउन्सिलर पुनीत वढेरा यांनीही व्हिडिओ बनवले. मुंबईतील एका कंपनीने सुरुवातीला 2 लाख मग 28 लाख रुपये ऑफर केले. पण मालकाने नाकारले. 17 फेब्रुवारी 2026 रोजी अमेरिकेतील खरेदीदाराशी व्हिडिओ कॉलवर बोलून 1.25 कोटी रुपयांत विक्री झाली. जगभरातील विंटेज ट्रॅक्टर संग्राहकांनी ही बातमी पसरवली.

वाहतूक आणि नवे घर

18 फेब्रुवारीला क्रेनने ट्रॅक्टर उचलून ट्रकने मुंबई बंदरावर नेला. तेथून जहाजाने कॅलिफोर्नियाला पाठवण्यात आला आहे. आता तो कॅलिफोर्निया कृषी संग्रहालयात (हेड्रिक ट्रॅक्टर कलेक्शन) मुख्य आकर्षण बनणार आहे. आपल्याला जे भंगार वाटत होते ती वस्तू कोट्यधीश बनवणारी ठरली, याचे जालंधरच्या लोकांना आश्चर्य वाटते. जुन्या वस्तूंची किंमत ओळखणे किती महत्त्वाचे आहे, हे या घटनेतून दिसते.

About the Author

Pravin Dabholkar

"प्रवीण सुरेश दाभोळकर हे 'झी 24 तास' डिजिटलमध्ये चीफ सब एडीटर पदावर कार्यरत आहेत त्यांना मीडिया क्षेत्राचा 14 वर्षांचा अनुभव आहे. वयाच्या 21 व्या वर्षी त्यांनी प्रिंट मीडियातून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली. तिथे त्यांना लेखन आणि रिपोर्टिंगचा मौल्यवान अनुभव मिळाला. तेव्हापासून त्यांनी प्रिंट, टीव्ही आणि डिजिटल मीडियासह विविध माध्यमांमध्ये काम केले आहे. संशोधनात्मक अहवाल आणि फिचर रायटिंगकडे त्यांचा कल आहे. वाचकांना माहिती नसलेल्या कथा लोकांसमोर आणण्याची त्यांना आवड आहे. हे करीत असताना सविस्तर तपशील आणि अचूकतेकडे त्यांची कटाक्षाने नजर असते. फावल्या वेळात प्रविण आपल्या आनंदासाठी फिरणे, नवीन गोष्टी आत्मसात करणे आणि सामाजिक कार्यात गुंतलेले असतात. त्यांचे लेखन अनेकदा सामाजिक न्यायाच्या समस्यांबद्दलची त्यांची उत्कटता दर्शवते. तसेच आपल्या लेखणीच्या माध्यमातून समाजात सकारात्मक प्रभाव पाडण्यासाठी ते नेहमी प्रयत्नशील असतात."

...Read More