)
Viral Video: सोशल मीडियावर रोज नवनवे व्हिडीओ व्हायरल होत असतात. यातील काही व्हिडीओ आपल्याला प्रेरणा देणारे, तर काही व्हिडीओ जागरुक करणारे असतात. असाच एक व्हिडीओ सध्या व्हायरल झाला आहे, जो पाहिल्यानंतर प्रत्येकाला अतीघाई केल्यास जीव किती संकटात टाकतो याची शिकवण मिळवत आहे. फक्त काही मिनिटांसाठी तरुणाने आपला जीव गमावल्याचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे, तरुणाचा फक्त इतकाच प्रयत्न होता की, एक्स्प्रेस येत असल्याने रेल्वे क्रॉसिंग बंद होण्याआधी आपण ट्रॅक ओलांडावा. ट्रेनने धडक दिल्यानंतर तरुणाने जागीच आपला जीव गमावला आहे.
ग्रेटन नोएडा येथे एका तरुणाचा लग्नाच्या एक महिना आधी ट्रेनच्या खाली आल्याने मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. ट्रेन तरुणाला चिरडताना कॅमेऱ्यात कैद झाली आहे. व्हिडीओत दिसत आहे की, रविवारी संध्याकाळी दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास एक तरुण दादरीच्या बोडाकी रेल्वे फाटकाजवळ वेगाने बाईक चालवत पोहोचतो.
ग्रेटर नोएडा में आज । करिश्मा से कम नहीं इसका बचना। वैसे गेट कैसे खुला था?
— Narendra Nath Mishra (@iamnarendranath) October 13, 2025
pic.twitter.com/IepoRq7LcG
एक्स्प्रेस येत असल्याचं पाहिल्यानंतर तो आपण तिच्या आधी निघावं यासाठी बाईकचा वेग वाढवतो. मात्र ट्रॅकजवळ येताच त्याची बाईक घसरते आणि ट्रॅकवर कोसळते. यानंतर तो आपली बाईक उचलण्याचा प्रयत्न करतो. पण बाईक उचलली जात नाही. एक्स्प्रेस जवळ आल्याने तो बाईक सोडून पळत असतानाच ट्रेन त्याला धडक देते.
ट्रेनची धडक इतकी जोरदार होती की, तुषारचा घटनास्थळीच मृत्यू झाला. 19 वर्षांचा तुषार दतावली गावाचा रहिवासी होता. त्याने याचवर्षी बारावाची परीक्षा उत्तीर्ण केली होती. त्याने अद्याप कोठेही प्रवेश घेतला नव्हता. दोन भावांमध्ये तो मोठा होता. कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार, 22 नोव्हेंबरला तुषारचं लग्न होणार होतं. त्याची तयारीही सुरु होती. पण त्याआधीच कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.
दादरीचे आरपीएफ अधिकारी सुशील वर्मा यांनी सांगितलं की, "एका तरुणाचा ट्रेनखाली येऊन मृत्यू झाल्याची माहिती मिळाली होती. स्थानिक पोलिसांच्या मदतीने तरुणाचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. पुढील कायदेशीर कारवाई केली जात आहे".