वोडाफोनच्या या प्लानमध्ये मिळणार दररोज १.४ जीबी डेटा
टेलिकॉम सेक्टरमध्ये जिओ आणि एअरटेल यांच्यात मुकाबला सुरु असताना वोडाफोनने १९८ रुपयांच्या प्लानमध्ये बदल केलेत.
मुंबई : टेलिकॉम सेक्टरमध्ये जिओ आणि एअरटेल यांच्यात मुकाबला सुरु असताना वोडाफोनने १९८ रुपयांच्या प्लानमध्ये बदल केलेत.
या सुविधा मिळणार
या प्रीपेड प्लानमध्ये दिवसाला १.४ जीबी डेटा दिला जाणार आहे. यासोबतच या प्लानमध्ये तुम्हाला अनलिमिटेड लोकल आणि एसटीडी कॉल, रोमिंग कॉल आणि दिवसाला १०० एसएमएस फ्री मिळणार आहेत.
२८ दिवसांची व्हॅलिडिटी
या प्लानची व्हॅलिडिटी २८ दिवसांची आहे. या प्लानचा मुकाबला एअरटेलच्या १९९ रुपये आणि जिओच्या १४९ रुपयांच्या प्लानशी आहे.
वोडाफोनच्या १९८ रुपयांच्या प्लानमध्ये आधी ग्राहकांना दिवसाला १ जीबी डेटा मिळत होता. तसेच अनलिमिटेड व्हॉईस कॉल आणि दिवसाला १०० मेसेजेस फ्री दिले होते. दरम्यान यामध्ये कॉलसाठी दिवसाला २५० मिनिटे आणि आठवड्याला १००० मिनिटांची लिमिट ठरवण्यात आली होती.