तुमचा Smartphone सतत गरम होतो का? मग या Tricks वापरुन पाहा, लगेच फायदा होईल

बऱ्याच लोकांना त्यांचा फोन गरम होत असल्याची समस्या आहे आणि लोकं याबद्दल बोलत असलेलं तुम्ही ऐकले देखील असेल.

Updated: Jul 22, 2021, 09:17 PM IST
तुमचा Smartphone सतत गरम होतो का? मग या Tricks वापरुन पाहा, लगेच फायदा होईल

मुंबई : बऱ्याच लोकांना त्यांचा फोन गरम होत असल्याची समस्या आहे आणि लोकं याबद्दल बोलत असलेलं तुम्ही ऐकले देखील असेल. यावर काही लोकांचे असे म्हणणे असते की, उन्हाळ्यात ही समस्या अधिक असते. फोन गरम झाल्यामुळे आपण फोनवर जास्त काळ बोलू शकत नाही, तसेच आपल्या मेसेज करणे देखील खूप अवघड होते. इतकेच नव्हे तर बर्‍याच ते धोकादायकही ठरू शकते. त्यामुळे काही लोकांना त्यांचा फोन बंद करुन ठेवावा लागतो. तसे पाहाता यावर कायम स्वरुपाचा तोडगा तर नाही, कारण तो एक इलेक्ट्रॉनी वस्तू आहे, ज्यामध्ये कधीही काहीही बिघाड होऊ शकतात. परंतु आम्ही तुम्हाला काही असे उपाय सांगणार आहोत, ज्याच्या मदतीने तुम्ही तात्पूरता यावर उपाय करु शकता.

उष्णतेपासून संरक्षण करा

उष्ण हवामानात उष्णतेपासून फोनचा बचाव करा, यासाठी त्याला शक्य तितक्या सावलीत ठेवा. त्याला थेट सूर्यप्रकाशात आणणे टाळा. कारण सूर्यप्रकाशामुळे तो त्वरीत तापू शकतो.

त्यामुळे तुम्ही घरी असल्यास मोबाईलला खिडकीजवळ ठेवू नका. त्याचप्रमाणे, त्याला तुमच्या चादरी खाली किंवा गोधडी खाली देखील ठेऊ नका. त्याचप्रमाणे कारमध्येही उन्हात त्याला ठेऊ नका.

कव्हर काढा

जर तुमच्या फोनला कव्हर असेल, तर ते हिवाळ्यातील महिन्यांमध्ये चांगले असते. परंतु उन्हाळ्यात ते ठेऊ नका. यात काही शंका नाही की, हे कव्हर तुमच्या फोनची सुरक्षा करते. परंतु जर तुम्ही घरी असाल किंवा मोबाइलवर तुमचे फारसे काही काम नसल्यास तुम्ही ते काढू ठेवा आणि फोनला थोडी हवा लागू द्या.

फोन सेटिंग्ज बदला

तुमच्या फोनचा ब्राईटनेस शक्य तितका कमी करा. यामुळे तुमची बॅटरी कमी वापरली जाईल, ज्यामुळे डिव्हाइस कमी गरम होईल. जर तुमच्या फोनमध्ये बाहेरील वातावरणाप्रमाणे बदलणारा ब्राईटनेस असल्याल, त्याला लगेच बंद करा.

डेटा नियंत्रित करा

फोनचा डेटा थोड्यावेळासाठी बंद करा. तसेच आपल्याला काही काळ लोकांशी बोलण्याची आवश्यकता नसल्यास तुम्ही डिव्हाइस एअरप्लेन मोडमध्ये देखील ठेऊ शकता. स्क्रीन ब्राइटनेस प्रमाणे ही वैशिष्ट्ये बंद केल्यास बॅटरीची बचत होऊ शकते आणि फोन देखील गरम होणार नाही.

गेमिंग फोन

काही फोनमध्ये, विशेषत: गेमिंग फोनमध्ये ओव्हरक्लोक मोड असतात ज्यामुळे फोनची कार्यक्षमता वाढते. आपल्या फोनमध्ये असा मोड आहे की, नाही हे आपल्याला माहिती नसल्यास ते तपासा आणि त्याला ऑन करा.

या गोष्टींकडेही लक्ष द्या

वेगवान खेळ खेळणे, व्हिडीओ किंवा फोटो संपादन करणे किंवा वेगवान चार्जिंगसाठी प्लग इन करणे फोनला गरम करू शकते. त्यामुळे ते टाळा. चार्जींगला लावून फोन देखील वापरु नका.

या ठिकाणी ठेवू नका

तुमचा फोन कोणत्याही घट्ट कपड्यात किंवा शर्टच्या खिशात ठेऊ नका. त्यापैक्षा कोट किंवा जाकेटच्या लूझ खिशात तुम्ही तो ठेऊ शकता. या शिवाय तुमचा फोन बॅगमध्ये ठेवणे चांगले आहे. तुम्ही एका ठिकाणी बसून असाल, तर आपले डिव्हाइस खिशातून काढून घ्या.

पंखाखाली फोन ठेवा

घरात पंख्याखाली फोन ठेवा. तो तुमच्या फोनला हळूहळू थंड करेल, ज्यामुळे फोनला कोणतीही हानी होणार नाही.