व्हॉट्सअॅपचं नवं फीचर, तुमची समस्या होणार दूर
तुमची समस्या झाली दूर... व्हॉट्सअॅपने आणलं नवं फीचर
मुंबई : सोशल मीडियाबाबत बोलायचं झालं तर व्हॉट्सअॅप असं अॅप आहे ज्यावर लोकं सर्वाधिक वेळ असतात. व्हॉट्सअॅपवर कॉलेज मित्रांचे, ऑफिसमधल्या मित्रांचे काही कामासाठी असे वेगवेगळ्या विषयांचे ग्रुप बनतात. दिवसभर या ग्रुपमध्ये फोटो आणि व्हिडिओ शेअर होत असतात. जे तुमच्या स्मार्टफोनच्या गॅलरीमध्ये एकत्र दिसतात. अनेकदा तुम्ही ते सार्वजनिक ठिकाणी उघडता ज्यामुळे तुमचे ते फोटो आणि व्हिडिओ इकरांना दिसतात. जे तुम्हाला इतरांना दिसू द्यायचे नसतात.
व्हॉट्सअॅपमध्ये येणार नवं फीचर
यूजर्सची ही समस्या लक्षात घेऊनत आता कंपनीने व्हॉट्सअॅप अपडेट करत एक खास फीचर आणलं आहे. याचं नाव आहे Media visibility. या फीचरच्या मदतीने तुम्ही व्हॉट्सअॅपवर येणारे फोटो, व्हिडिओ आणि इतर गोष्टी रेगुलेट करुन ठेवू शकता. ज्यामुळे या गोष्टी तुमच्या गॅलरीमध्ये दिसणार नाहीत. जर तुम्हाला वाटतं की या ग्रुपवर येणारा डेटा इतका महत्त्वाचा नाही किंवा हाईड करुन ठेवण्याची गरज नाही तर तुम्ही तो कंटेट डिसअॅबल करु शकता.
Gallery मध्ये कोणतीही फाईल शोधणं सोपं होणार आहे. जर तुम्ही त्या ग्रुपचं मीडिया कंटेंट नंतर देखील पाहू इच्छित असाल तर व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये जाऊन मीडिया फाइल्स तुम्ही बघू शकता. ग्रुपमधील सर्व डेटा गॅलरीमध्ये सेव्ह न होता 'व्हॉट्सअॅप'च्या एका वेगळ्या फोल्डरमध्ये सेव्ह होईल. तुम्ही ते कधीही अॅक्सेस करु शकता.