WhatsApp च्या फीचर्ससाठी मोजावे लागणार पैसे? घ्यावं लागणार subscription
WhatsApp launches paid subscription : आता व्हॉट्सअप युजर्संना मोजावे लागणार पैसे.
मुंबई : आजपर्यंत आपण Whatsapp मोफत वापरत होते. पण पुढे जावून काही फीचर्ससाठी तुम्हाला पैसे मोजावे लागू शकतात. इन्स्टंट मेसेजिंग प्लॅटफॉर्म WhatsApp ची प्रीमियम सबस्क्रिप्शन योजना अद्याप लॉन्च झालेली नसली तरी भविष्यात त्यासाठी पैसे मोजावे लागू शकतात. कंपनीने सध्या हे फीचर बीटा टेस्टर्ससाठी उपलब्ध करून दिले आहे. पण नंतर युजर्सला ही सेवा वापरण्यासाठी पैसे खर्च करावे लागणार आहेत. (WhatsApp premium subscription service)
WABetaInfo दिलेल्या माहितीनुसार, याचं सबस्क्रीप्शन भविष्यात घ्यावे लागणार आहे. जेणेकरुन स्पेशल फीचरचा लाभ त्यांना मिळणार आहे. हे फीचर सध्या बिझनेस अकाऊंटसाठी असणार आहे.
रिपोर्टनुसार, हे फीचर सध्या सामान्य यूजर्ससाठी उपलब्ध नाही. हे व्हॉट्सअॅप बिझनेस बीटा (WhatsApp beta program) युजर्ससाठी उपलब्ध करून देण्यात आले आहे. म्हणजेच जर तुम्ही व्हॉट्सअॅप वापरत असाल तर तुम्हाला त्याची काळजी करण्याची गरज नाही. रिपोर्टनुसार, यूजर्सना प्रीमियम अकाऊंटमधून कस्टमाइज करण्यायोग्य कॉन्टॅक्ट लिंक्सचा पर्याय मिळेल.
ग्राहकांना आता व्यवसाय शोधण्यासाठी फोन नंबरऐवजी फक्त नाव टाइप करावे लागेल. टेलीग्राममध्येही अशी सुविधा देण्यात आली आहे. युजर्स थेट संपर्क लिंक इतरांशी शेअर करू शकतात.
रिपोर्टमध्ये असेही सांगण्यात आले आहे की, अॅपच्या सशुल्क व्हर्जनसह युजर्स एकाच वेळी 10 डिव्हाइसेसवर समान खाते वापरण्यास सक्षम असतील. यासह, युजर्स त्यांचे बिझनेस अकाऊंट योग्यरित्या व्यवस्थापित करण्यास सक्षम असतील. याशिवाय या युजर्सना एका वेळी 32 लोकांना व्हिडिओ कॉल करता येणार आहे.