WhatsApp Premium Feature Going To Be Unlock?: फ्री चॅटिंसाठी जगभराची पसंती असलेले अॅप म्हणजे व्हॉट्सअॅप. लोक सकाळ-संध्याकाळ लहान-लहान कामांसाठी या अॅपचा वापर करतात. या अॅपमधून फक्त चॅटिंगसाठीच नाही तर, ऑनलाईन पद्धतीने पैशांची देवाण-घेवाणही करता येते. पण आता व्हॉट्सअॅप वापरकर्त्यांसाठी एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. एका अधिकृत वेबसाईटवरून ही बातमी समोर आली आहे. फ्रीमध्ये उपलब्ध असलेल्या व्हॉट्सअॅपसाठी आता पैसे मोजावे लागणार आहेत. हे फिचर ऑप्शनल असणार आहे, पण ज्यांच्याकडे व्हॉट्सअॅपचे सब्सक्रिप्शन नसेल त्यांना काही विशिष्ट आणि नवे फिचर वापरता येणार नाहीत.
ज्यांचे काम पूर्णपणे व्हॉट्सअॅपच्या मदतीने होते त्यांना आणि विशेषतः प्रेमीयुगलांना आता संवाद साधण्यासाठी व्हॉट्सअॅप प्रीमियम घ्यावे लागणार आहे. ज्यामध्ये काही अॅडव्हान्स फिचर्स उपलब्ध होणार आहेत. व्हॉट्सअॅपने काही युजर्ससाठी एक वेटलिस्ट काढली आहे. ज्यांना या प्रीमियम सुविधेचा लाभ घ्यायचा आहे ते या यादीत त्यांचे नाव नोंदवू शकतात.
जर तुम्ही व्हॉट्सअॅपचे प्रीमियर पॅकेज घेतले तर, तुम्ही तुमच्या उद्योगाचे ऑनलाईन पद्धतीने प्रमोशन करणे अधिक सोपे जाईल. प्रीमियम फिचरच्या मदतीने तुम्ही तुमच्या ब्रँडची युनिक लिंक बनवू शकता. सोबतच एकाच खात्याचे व्हॉट्सअॅप तुम्हाला इतर 10 पेक्षा अधिक डिवाईजवरही वापरता येईल. तसेच मोठ्या फाइल्स शेअर करण्यासाठी आणि डेटाचा बॅकअप घेण्यासाठी अतिरिक्त स्टोरेज देखील मिळणार आहे. विनाप्रीमियमच्या व्हॉट्सअॅपर फक्त 3 चॅट्स पिन करता येतात. पण प्रीमियम प्लॅनमध्ये तुम्ही 3 पेक्षा अधिक चॅट पिन करू शकता. तसेच मेसेज शेड्युल करणे, प्रोफाइल कस्टमाइज करणे यांसारखे पर्यायही उपलब्ध असतील.
पण सामान्यांसाठी दिलासादायक बाब म्हणजे प्रीमियम फिचर घेणे किंवा न घेणे हे वापरकर्त्याला निवडता येईल. ज्यांना प्रीमियमची गरज वाटत नाही त्यांनी ते नाही घेतले तरी चालणार आहे. व्हॉट्सअॅपचे इतर सामान्य फिचर प्रीमियमशिवायही वापरता येतील. मेटा प्लॅटफॉर्म आता व्हॉट्सअॅपमधून पैसे कमावण्याची योजना आखत आहे. जर तुम्हाला प्रीमियम व्हॉट्सअॅपसाठी वेटलिस्टचा पर्याय दिसला आणि तुम्हाला नवीन फिचर वापरून पाहायचे असतील तर तुम्ही त्यात नोंदणी करू शकता. तात्पुरत्या काळासाठी प्रीमियम फिचर वापरू शकता. मात्र, सब्सस्क्रिप्शन प्लॅन सुरू झाल्यानंतर तुमच्याकडून शुल्क आकारला जाईल.
सध्या 'झी 24 तास डिजिटल'मध्ये कॉन्टे्ट रायटर म्हणून इंटर्नशिप करत आहे. याआधी 'सकाळ मीडिया' ग्रुपमध्ये (जानेवारी २०२४ - एप्रिल २०२४) एंटरटेनमेंट बीटचा भाग म्हणून इंटर्नशिप केली आहे, जिथे मराठी मनोरंजन बातम्या, सेलिब्रिटी अपडेट्स आणि डिजिटल प्लॅटफॉर्मसाठी जीवनशैली सेक्शनमध्ये कॉन्टेन्ट रायटर म्हणून काम केले आहे. नंतर, 'साम टीव्ही मराठी'मध्ये (जुलै २०२५ - सप्टेंबर २०२५) डिजिटल न्यूजरूम (लाइफस्टाइल बीट) मध्ये देखील इंटर्नशिप केली, जिथे मराठीमध्ये आकर्षक जीवनशैली कॉन्टेन्ट तयार केले, CMS आणि Google Workspace सह काम करायला शिकले आणि डिजिटल सामग्री वर्कफ्लोमध्ये अनुभव मिळवला.
...Read More|
LES
(20 ov) 81/8
|
VS |
BOT
83/4(12.3 ov)
|
| Botswana beat Lesotho by 6 wickets | ||
| Full Scorecard → | ||
|
MAS
(19 ov) 131/7
|
VS |
BRN
135/3(17.1 ov)
|
| Bahrain beat Malaysia by 7 wickets (DLS method) | ||
| Full Scorecard → | ||
|
OMA
(19 ov) 131/7
|
VS |
NEP
135/3(17.1 ov)
|
| Match Postponed | ||
| Full Scorecard → | ||
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.